[कविता' २०२०] - बरसती धारा
बरसती धारा

बरसती धारा सरसर झरझर
साजण भेटीला निघे साजणी भरभर
नाद हा करिती चुकार पैंजण
टिपत असेल हा नाद तो साजण
नव प्रेमाची मनी नवीच थरथर
बरसती धारा सरसर झरझर
धारांचा पडदा काही दिसेना
कुठे शोधू मी काही कळेना
काय करावे कसे मिटेल अंतर
बरसती धारा सरसर झरझर
ओल्या देही अशी शिरशिरी
वाऱ्याची मस्ती चाले भिरभिरी
अंतरी प्रेमाच्या लहरी नवथर
बरसती धारा सरसर झरझर
कुठे असेल तो आतुर साजण
झाडामागे तो चतुर साजण
आता उबेला ती मिठीच कणखर
नको दुरावा आता क्षणभर
बरसती धारा सरसर झरझर
साजण भेटीला निघे साजणी भरभर
बरसती धारा सरसर झरझर

वाचने
12247
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
+1
+१
इतक्या वेळा झरझर वाचले
कविता आवडली.
In reply to कविता आवडली. by गणेशा
माझा येथे +1 होता
मस्त आहे. +१
+१
नादरम्य कविता. आवडली.
मी जर विद्यापिठाच्या पुस्तक
प्रतिसादकांचे खूप आभार
पाषाणभेद
पाषाणभेद