Skip to main content

[कविता' २०२०] - पोहे मात्र सुरेख झाले

[कविता' २०२०] - पोहे मात्र सुरेख झाले

Published on रवीवार, 17/05/2020 प्रकाशित

पोहे मात्र सुरेख झाले




(प्रस्तावना: पती पत्नीच्या दैनंदिन "सुसंवादातून" आपल्या सर्वांसाठी हे शब्दांचे खमंग पोहे) शेंगदाणे तळायचे विसरलीस, म्हणून काय झालं पोहे मात्र सुरेख झाले हळद जास्त झाली, म्हणून काय झालं पोहे मात्र सुरेख झाले कांदा बारीक केला नाही, म्हणून काय झालं पोहे मात्र सुरेख झाले कोथिंबीर फोडणीत टाकली नाही, म्हणून काय झालं पोहे मात्र सुरेख झाले तेलाचं प्रमाण चुकलं, म्हणून काय झालं पोहे मात्र सुरेख झाले दोन वेळेस जेवणासाठी पुरतील आता पोहे, म्हणून काय झालं पोहे मात्र सुरेख झाले काय म्हणतेस? चहा ठेवू का? नको नको पोहे मात्र सुरेख झाले बाकी ही स्वयंपाकात अगदी हुशार...आता विश्वास बसणार नाही तुमचा, म्हणून काय झालं पोहे मात्र...


याद्या 12358
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

+१

+१

+१ अगदी साधी रचना. अगदी दैनंदिन जीवनातील संवाद पण तरीही कविता "सुरेख" झाली

शब्द साधे आहेत, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली प्रतिक्रिया कमी आहेत, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली :-)

kavita avadali. Chan ahe..

+1

+१ आवडली, म्हणूनच प्रेरणा घेऊन काही तरी खरडायचा प्रयत्न केला.