Skip to main content

[कविता' २०२०] - प्रश्न उजेडाचे -- प्रश्न अंधाराचे

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 13/05/2020 15:19 या दिवशी प्रकाशित केले.

प्रश्न उजेडाचे -- प्रश्न अंधाराचे




आकाशाच्या निळाईची पडे रानभूल प्रकाशाशी जळालेले पाण्याचे अंकुर थांबावं का थोडं इथे? दिसते का माया? मरावं का कोणीं? तुझी क्षुधा शमवाया तुझे ज्ञान वाचू कितीं? ऐकू कितीं देवां? प्रत्ययाच्या दारापाशी मिळेना पुरावा पाण्याच्या या प्रवाहाला म्हणू गंगामाई म्हणून का बुडालेला माघारून येई? सामसूम झाली, चढे रात्रीचा अंमल दिसेल ते शिजवण्या पेटलेली चूल कुठवर नेशी ओझं? साध वेळ आतां नाकारून जाशी कुठं इच्छांची चाहूल? किती पहा आहे उभा सवाल सुंदर उत्तराच्या मोहापायी गेला दुर्लक्षून पडले तर पडू द्यावे तुकड़े प्रश्नाचे पहा किती उजेडाचे? किती अंधाराचे?


वाचने 9233
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

अप्रतिम कविता.. मनापासून आवडली.. दोन दोनदा वाचली... +1 खालील ओळी जास्त आवडल्या पाण्याच्या या प्रवाहाला म्हणू गंगामाई म्हणून का बुडालेला माघारून येई? पडले तर पडू द्यावे तुकड़े प्रश्नाचे पहा किती उजेडाचे? किती अंधाराचे?

एकदम हुच्च कविता. मस्त

+1

+१

Apratim

"तुझे ज्ञान वाचू कितीं? ऐकू कितीं देवां? प्रत्ययाच्या दारापाशी मिळेना पुरावा पाण्याच्या या प्रवाहाला म्हणू गंगामाई म्हणून का बुडालेला माघारून येई?" हा सवाल! वाह!

गूढकाव्य आवडले. +१ सं - दी - प

छान!

मनाला विश्वासाच्या बाजूंवर पडलेल्या प्रश्नांना,प्रत्ययांतून मिळणार्‍या उत्तरांसह समाधानही हवं असतं! ते तसं मिळत नाही,तेंव्हा उजेड-अंधाराचे प्रश्न विचारत अशी एखादी कविता उभी होत असावी! अभिनंदन!