अडगळ

आता खूप साचलेले
नको झाले हे सामान
जागा तेवढीच आहे
याचे राहू देत भान...
आधी आवश्यक आणि
जे जे वाटे उपयोगी
एक वस्तूही त्यांतली
नाही साठवण्याजोगी...
हौस होती, जमवल्या
काही चीजा शोभीवंत
आता फेकून देताना
किती वाटते ना खंत...
जेव्हा आलो पहिल्यांदा
डाग होते फक्त चार
ऐसपैस आणि वाटे
घर मोकळेच फार...
आधी नवीन नेटके
मग तुटके फुटके
मन अजून सांभाळे
काही जुने नि फाटके...
आता अडचण होते
सामानाची या घराला
पण रिकामे करूया
चल आधी या मनाला...

वाचने
6350
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
आधी नवीन नेटके
+१
+1
+१
+१
छान!
सुंदर कविता