Skip to main content

[कविता' २०२०] - कोण आहे तिथे

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 10/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.

कोण आहे तिथे




डोंगर रांगांच्या पल्याड लपले आहे एक गाव कोण आहे तिथे , विचारु नका तुम्ही राव गावाकडची वाट कशी किर्र जंगलातुन जाते वाटेमधे लांडग्यांची फौज तुमची वाट पाहते गावाकडची वाट कशी उंच टेकड्यांतुन जाते खोल खोल काळदरी कधी तुमचा घास घेते गावाकडे जाताना वाटेत आहे एक नदी मगरी कुठे नाहीत ना , पाहुन घ्या आधी गावातल्या पडक्या वाड्यात लपला आहे खजिना पिवळाधमक राखणदार तिथे काढुन बसतो फणा चेटकिणींचा जाप चालतो रोज रात्री वाड्यात हडळींनाही कंठ फुटतो भयाण अंधारात मशाल पेटवुनी भुते नाचती ओसाड वेशीवरती भान हरपुनी बघत राहती सैतानाच्या करामती काय म्हणता खोटे सारे , या असती भय कल्पना चला जाउया आपण सारे , नको फुका वल्गना


वाचने 11164
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

+१ लैच भारी. आतापर्यंतची सर्वात जास्त आवडलेली कविता, एकदम हलकीफुलकी. विंदा आठवले.

In reply to by प्रचेतस

अजुन संस्करण हवे होते. स्पर्धेसाठी पाठवताना धीर धरवला नसावा. पण एकूण कविता आवडणेबल आहे.

आवडली

+१ व्वा, भारी !

तुम्बाडची आठवण झाली राव.

+१

+1 खुप सुंदर वर्णन.. साधे सरळ तरीही मनात भिडणारे गाव आवडले

रूपक आहेसे वाटले. बाकी धारपांची आठवण होतेय अगदी!

एकदम कडक ... स्पर्धेतील अतिशय वेगळी कविता.

बालकविताही म्हणता येईल अशी. कवितेला + १ सं - दी - प

सर्व वाचकांचे आभार . चतुरस्त्र लेखक / साहित्यकार श्री. माननीय रत्नाकर मतकरी यांना या कवितेच्या रुपात विनम्र आदरांजली .