Skip to main content

[कविता' २०२०] - एकटेपण

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 10/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.

एकटेपण




जमव जमव जमवले भांडी, गॅस, बेड, कपाट, कपडे, टिव्ही. पुस्तके आणि काॅप्युटरसुद्धा. माणसं सुद्धा मिळाली जन्माने, काही जमवली निष्फळ शेवटी उरले निर्जीव एकटेपण. जीव लावला इथुन तिथुन, अगदी गॅस पुसायच्या फडक्याला दिवसभर हाती असणार्या माऊसला आॅफिसातल्या डेस्कला समजत राहीले हे माझेपण शेवटी उरले निर्जीव एकटेपण जपत गेले छंद मजेने झाडं लावली, पुस्तकं आणली वाचली कागदावरची निर्जीव माणसं जीवंत माणसं वाचायची राहीली उमजत गेले गर्दिचे फोलपण शेवटी उरले निर्जीव एकटेपण अपेक्षाही वाढवुन घेतल्या पुर्णत्वाची आस लावली जीव जाळुन घेतला मोहमायेच्या गर्तेत खोल उतरले उमजत गेले मायेचे रितेपण शेवटी उरले निर्जीव एकटेपण शेवटी रुतले गाळात गाळ मला रुतवत चाललाय अगदी खोल खोल आता लक्षात आलय माझ्या बाहेर पडणे अवघड शेवटी उरणार नाही काहीच नुसत्या शुन्याशिवाय


वाचने 15113
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

+१

मस्त

व्हाटस अप आणि फेसबुक्च्या आभसी गर्दीचे फोलपण जाणवुन देणारी वर्तमानाची कविता

जमव जमव जमवले.....शेवटी उरले निर्जीव एकटेपण. अप्रतिम. कशा कशात जीव अडकत असतो हे कळत नाही, बरोबर काही न्यायचे नसते हे माहित असते तरिहि ते सोडवत नाही.

In reply to by बरखा

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


In reply to by आगाऊ म्हादया......

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


+१ जीव लावला इथुन तिथुन, अगदी गॅस पुसायच्या फडक्याला दिवसभर हाती असणार्या माऊसला आॅफिसातल्या डेस्कला समजत राहीले हे माझेपण शेवटी उरले निर्जीव एकटेपण हे "गॅस पुसायच्या फडक्यापासून ते आॅफीसमधल्या डेस्क पर्यंत मोहमायेचं चित्रण खास आवडलं. :)

आयुष्य अकाउंटिंग सारखं असतं. ताळेबंद होऊन शेवटी बाकी शून्य!

+१

+१

शेवटी उरले निर्जीव एकटेपण
क्या बीता, क्या रख्खा! ही गुलजार यांची रचना एकदा वाचून पहा असे सुचवतो. सं - दी - प

+१ हे खासच आवडले -
उमजत गेले गर्दिचे फोलपण

In reply to by पाषाणभेद

माझी कविता एकटेपणाकडे जाणार्या प्रवासाची आहे तर अडगळ घरातल्या सामानावर आहे. सर्वाचें मनापासुन धन्यवाद!