Skip to main content

[कविता' २०२०] - बहुरूपी

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.

बहुरूपी




बोबडी अंगाईकविता कोवळीशी बालकविता अस्फुटाची मुग्धकविता हुरहुरीची प्रेमकविता मायपाखर स्निग्धकविता सातमजली हास्यकविता नवरसांच्या विभ्रमांनी विनटलेली भावकविता विफलतेची दग्धकविता शृंखलांना तोडणारी अग्निगर्भी क्रांतिकविता गृहितकांना छेदणारी इंद्रजाली गूढकविता पैलतीरावरून रात्री अथक हाका मारणारी, क्लांत जीवी श्रांत गात्री प्राणफुंकर घालणारी, सर्वव्यापी,सर्वसाक्षी, शब्दविरहित आदिकविता


वाचने 6538
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

+ १ कवितेची येव्हडी रुपे पाहुन मज्जा आली.. छान लिहिली आहे कविता

खुप छान!

यातली एकतरी कविता लिहायची होती. ;) सं - दी - प

पैलतीरावरून रात्री अथक हाका मारणारी, क्लांत जीवी श्रांत गात्री प्राणफुंकर घालणारी, सर्वव्यापी,सर्वसाक्षी, शब्दविरहित आदिकविता