क्वार्टर मिळवाया डोकं..

मिळेल कधी ठावंना..
पिल्या बिगर राहवंना..
बुजलीया गल्याची भोकं
नं.. खाजवाकी..
जरा खाजवाकी..
तुम्ही खाजवाकी..
क्वार्टर मिळवाया डोकं..
नं.. खाजवाकी..
क्वार्टर मिळवाया डोकं.. || १ ||
माझ्या बापाच्या.. बापाची
पिण्याची....
पिढीजात खोड..
आता लॉकडाउन मुळे..
कुठे गांवना.. सगळे
सांगत्याती दारू सोडं ..
पण पिल्या बिगर राहवंना..
दारू काही सोडवंना
बुजलीया गल्याची भोकं..
नं.. खाजवाकी..
जरा खाजवाकी..
तुम्ही खाजवाकी..
क्वार्टर मिळवाया डोकं..
नं.. खाजवाकी..
क्वार्टर मिळवाया डोकं..|| २||
टीप: शाहीर दादा कोंडके यांच्या चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावर आधारित.

वाचने
3935
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
खुमासदार विडंबन!
फक्कड!! +१