आता बदनाम झालो

आता बदनाम झालो आहे,काय ते पाहून गेले
कुणी कुत्सित हसून गेले, कुणी जहरी चावून गेले.
याच वाटेवरती कधी,फुले मी वेचली होती
तिथेच शब्दांचे काटे, आज ठेच लावून गेले
माती सोबत इमानाचे,या हातावर घट्टे आहे
कणसातल्या पिकाला का,हे मोकाट खाऊन गेले
कधी त्यांना गर्व होता, माझ्या शब्दात जोर होता
हुंदक्याचा बहर आला,का सारेच दार लावून गेले
तुझ्या कोवळ्या उन्हाचे मी इंद्रधनू पाहिले होते
सुखाने ही बरसलो मी जीवन सारेच न्हाऊन गेले
तू नदी अवखळ वाहते सागराला जरूर भेटशील
या किनारी घर होतें एका पावसात वाहून गेले
दिल्या घेतल्या जखमांचा हिशोब सारा चोख आहे
जगणे सोबत जगणे होतें तेच मात्र राहून गेले

वाचने
7249
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
+/-
+१
+१
+1
5.
In reply to +1 by गणेशा
धन्यवाद सर...
In reply to +1 by गणेशा
+१
In reply to धन्यवाद सर... by तुषार काळभोर
सहमत आहे. कविता स्पर्धेत हे
In reply to +१ by चांदणे संदीप
+१ खूपच छान
लिहीत रहा!