Skip to main content

[कविता' २०२०] - उन्मादसोहळा

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 05/05/2020 09:58 या दिवशी प्रकाशित केले.

उन्मादसोहळा




तुम्ही आता गप ऐकून घ्यावे काव्यरसात थोडे डुंबून घ्यावे माझ्या कवितेला फुटतात पालवी मनाची त्यात थोडे तुम्ही रंगून जावे चैत्राच्या उन्हात घामाच्या धारात माझी कविता ठसते उरात थोडे गोड मानून घ्यावे बीज अंकुरते जाणून घ्यावे आता कुठे ही सुरुवात झाली जमल्यास इथेच ताणून द्यावे निबिड अरण्यात पठारांच्या शोधात माझी कविता गवताळ प्रदेशात ही चिंब भिजली रे गारठून सजली रे माझी कविता लाजून थिजली रे गोड गोड भात दह्यामध्ये ताक माझी कविता साखरेचा भात मध्यानीच्या सुर्याने आता तापून घ्यावे धरत्रीच्या लेकरांनी थोडे रापून घ्यावे माझी कविता आता शस्त्र उचलत आहे मायबाप श्रोत्यांनी डोळे झाकून घ्यावे ही नाच नाचते रे डेडाळ काटते रे माझी कविता तलवार छाटते रे जुलमाचे शिकारी भयभीत कट्यारी माझी कविता जन्माची विखारी ही क्षुब्ध झोपडी जणू रांड भाबडी माझी कविता भलतीच नागडी आवडली तर तसे सांगून जावे रसभंग झाला तर भांडून जावे माझ्या कवितेला फुटतात पालवी मनाची त्यात थोडे तुम्ही रंगून जावे


वाचने 7164
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

+१ वाह! मस्तच

कडक काही ओळी पार आत घुसल्या.

+1

आवडली. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

अजून नीटनेटकी करता आली असती. पण मला आवडली. +१ सं - दी - प

सुंदर कविता सोपे शब्द पण मनाला भिडणारे कवितेची असंख्य रूपे पण छान उमटलेली

धन्यवाद मंडळी!!! अजूनही आम्ही (खुद्द) कवितांमध्ये कच्चेच आहोत च्यामारी :((