भेट

त्या शरीरी वीज अचपळ
कोंडिली होती जरी
स्पर्शिले दिव्यत्व तरिही
पाय त्याचे भूवरी
हिंडला दिक्काल सहजी
भासला तो स्थिर जरी
दृष्टी व्योमापार त्याची
नेत्र मिटलेले जरी
माहिती होते जरी की
काजवा मी, तो रवि
कोणत्या कैफात वेड्या
थुंकलो त्याच्यावरी
भेट घडता आमुची, मी
थिजुनी गेलो क्षणभरी
माझिया हातात शस्त्रे...
....कमलदल त्याच्या करी

वाचने
7441
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१.
+१
अप्रतिम
+१ सुरेख
+१
+१
वीजही अचपळ असावीशी त्या
In reply to +१ by चांदणे संदीप
+१
+१