Skip to main content

[कविता' २०२०] - उत्कंठा

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/05/2020 14:58 या दिवशी प्रकाशित केले.

उत्कंठा




बोले आता ती एक थेंब नाही, असाही दिवस येतो. आठवण येतेच मधून आज, शायर दोस्त मैफलांची. एक एक दिवस मोजले, सोसले सर्व काही आज बातमी येते उत्साहाची, पण तुजही आठवण येते सांग वाटते कसे आयुष्य उजाड, ताळेबंदीत गुंतला श्वास. बदनाम जन मज करी, पचवतो अपमान रांगेत आज. दोन दीस ग्रीन झोन झाले, दोन दीस स्वप्नता गेले. खिडकीत याद आली, चांदणी मज खु़णवून गेली.. कसे जगलो दिवस कळले नाही, आनंद थोडे आले. वाटते आयुष्य सारे, लॉकडाऊन कायम झाले. पाहता तुज आता, शहारुन मन आज आले. स्पर्श सुगंध रुप दर्शन, मज मोक्ष मिळवून गेले.


वाचने 5274
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

दारु साठी काय पण....

पचवतो अपमान रांगेत आज
रांगेत उभे राहून कविता लिहली असावी.

स्पर्श सुगंध रुप दर्शन, मज मोक्ष मिळवून गेले.
कळस!! शब्दा शब्दातून विरह सांडतोय..

विषय तर भन्नाट निवडला पण शब्दांची निवड चुकली. हलकी फुलकी पाहिजे होती कविता. मजा नाही आली. सं - दी - प