बँक बॅलन्स

"तुला पगार किती ए?"
"तीस हजार"
"कशावरून"
"मी तुम्हाला सॅलरी स्लिप दाखवतो” असं म्हणून माझ्या सॅलरी स्लिपची सॉफ्ट कॉपी मोबाईलवरून तिच्या वडिलांना दाखवली.
"बनावट सॅलरी स्लिप्स कुठेही बनवता येतात"
"अहो खरचं ही कंपनीची ओरिजनल सॅलरी स्लिप आहे"
“नाही... मला तुमचा बँक बॅलन्स दाखवा”
मी लगेच मोबाईल वरून बँक अकाउंट मध्ये लॉग इन करून, त्यांना माझा बँक बॅलन्स दाखवला
त्यांनी बँक बॅलन्स बघितला आणि…….
….. तिच्या वडलांनी मला बाहेरचा रस्ता दाखवला.
लग्नाची बोलणी तिथेच फिस्कटली, त्यानंतर तिची आणि माझी परत कधीच भेट झाली नाही.
माझं ते पहिलं प्रेम अधुरं राहिलं कारण,
पर्सनल बँक अकाउंट दाखवण्याऐवजी चुकून पीएफ अकाउंटचा बॅलन्स दाखवला होता.

वाचने
6157
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
म्हणजे महिन्याला फक्त दोन तीन हजाराची एन्ट्री
ओह
+१.
:)
+१
-दिलीप बिरुटे
म्हणून दाखवण्यापूर्वी
बघणं महत्वाचं !
+1
+1
मोबाईल वरून बँक अकाउंट दाखवतना
मोबाईल वरून बँक अकाउंट दाखवतना बँकेचे मोबाईल APP वापरावे लागेल ना तिथे pf बॅलन्स कसा काय दिसेल? नेट बँकिंग मोबाईल वरून ऍक्सेस केले तरी बँकेचे प्रत्येक बँकेचे वेगळे नेट बँकिंग SITE आणि APP असते epf साठी epf चीच SITE लॉगिन करावी लागेल ना? मोबाईल मध्ये बँक अकाउंट च्या जागी epf अकाउंट नंबर टाकला तर एरर दाखवेल बँकेची SITE
epf ला uan नंबर असतो आणि बँकेला कस्टमर id
सही पकडा है !
In reply to मोबाईल वरून बँक अकाउंट दाखवतना by Prajakta२१
स्टोरी एकदम फेल जाते.
पीएफ ला ही बॅलन्स असावाच :)
पीएफ ला ही बॅलन्स असावाच :)
भौ...
मोबाईल वरून बँक अकाउंट मध्ये लॉग इन करून पीएफ अकाउंटचा बॅलन्स कसा पाहतात सांगा =))
+१
+१
आवरा...
आवरा...
बापानी बॅलन्स न बघता त्याचा बिनडोकपणा बघुन हाकलला बहुतेक... :-)
=))
In reply to आवरा... by नावातकायआहे
=))