Skip to main content

[शशक' २०२०] - स्त्री जन्मा तुझी कहाणी

लेखक मनस्विता यांनी रविवार, 26/04/2020 23:43 या दिवशी प्रकाशित केले.

स्त्री जन्मा तुझी कहाणी




सकाळचे साडेदहा वाजत आले होते. अलका घड्याळाकडे बघत तिची घरातील कामे उरकत होती. कामे काही संपता संपत नव्हती. घड्याळाच्या धावणाऱ्या काट्यांशी जणू तिची शर्यत लागली होती. घरातील ही कर्तव्ये काय कमी म्हणून अजून बाहेर जाऊन यायचे होते. सकाळची शाळा संपवून मुलं परतायच्या आत तिला घरी यायचे होते. शेवटी सर्व कामे आटपून आणि स्वतःचे आवरून बाहेर जाण्यासाठी तयार झाली. बाहेर अंगाची लाहीलाही करणारा वैशाख वणवा पेटला होता. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी तिने अंगात सनकोट, डोके अन् चेहरा झाकायला ओढणी आणि डोळ्यावर गॉगल असा जामानिमा केला. गाडीला किक मारून, कर्वेरस्त्यावरून गाडी हाकत ती पोचली. . . . सोनल हॉलला. खास कॉटनचे कलेक्शन असलेले प्रदर्शन पाहायला.


वाचने 6872
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

हा हा हा Good1

औघडे !

In reply to by जव्हेरगंज

> घरातील ही कर्तव्ये काय कमी म्हणून अजून बाहेर जाऊन यायचे होते. शॉपींग हे सुद्धा स्त्री जन्माचं एक कर्तव्यच आहे असा अर्थ असावा.

+१

+१

+१

छान... हौसमौज करायलाही वेळ काढायलाच हवा

+1

+1

आवडली ..

बुवा लोकांना समजायला कदाचित शंभर जन्म घ्यावे लागलीत कारण स्त्री जन्म काय हे स्त्रीलाच माहित

+१

+१