Skip to main content

[शशक' २०२०] - लक्ष

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी रविवार, 26/04/2020 16:09 या दिवशी प्रकाशित केले.

लक्ष




"खाड खाड खाड, इतके दिवस गिरक्या घेतोय. ह्या जुन्या घरात, इतकी वर्षे. कुणी लक्ष ही देऊ नये?" आवाज इतका वाढलाय, नट ढिला झालाय, दोन आटे राहिलेत फक्त, हे जास्त दिवस चालणार नाही, मोजून दोन आठवडे." "प्रत्येक यंत्र माणसाशी बोलत असते, वेगवेगळ्या माध्यमातून संदेश देत असते. पण माणूस लक्ष देईल तेव्हा ना? नेहमीपेक्षा वेगळा आवाज आला की मशीन मध्ये बिघाल झालाय हे लक्षात यायला हवे. दुर्लक्ष केलं की दुर्घटना घडते.काही वेळा छोट्या चुकीची मोठी शिक्षा मिळते" एम्ब्युलन्स येऊन थांबली. रक्ताळलेलं डोकं डॉक्टरांनी तपासलं आणी जाहीर केलं. शेवटची कुजबुज "वेळीच लक्ष दिलं असतं तर डोक्यात छताचा पंखा पडून जीव गेला नसता".


वाचने 4480
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

कथा संकल्पना आवडली म्हणून +1

कथा संकल्पना आवडली म्हणून +1

+१

खरी गोष्ट आहे.

ओह

+१

+१

+१

+१

+१

लाईक