Skip to main content

[शशक' २०२०] - रिटायर

लेखक मोहन यांनी रविवार, 26/04/2020 16:01 या दिवशी प्रकाशित केले.

रिटायर




"बाबारे तू रिटायर झाल्यावर काय करणार आहेस ? काही नियोजन केले की नाहीस ?" " मला करण्यासारखे काहीच दिसत नाही. आयुष्यात नोकरी शिवाय मी काहीच केल नाही. " " जेमतेम दोन महिने राहिले आहेत. जरा काहीतरी विचार कर" " सुचेल ग काहीतरी, काळजी करू नकोस." --------------------------------------------------------- "सर, सेंड ऑफ पार्टीमे मझा आया. आगे क्या सोचा है?" " कुछ नही, घर बैठेंगे|" --------------------------------------------------------- "मी तुला सांगतो, कुठलातरी छंद वगैरे लावून घे." "माझा मित्र म्हणवतोस आणि मलाच काय घाबरवतोस. ओढून ताणून पेटी - तबला किंवा तत्सम प्रकार बडवत सगळ्यांना वात का आणायचा? " --------------------------------------------------------------- "मित्रों अगली चौबिस तारीखसे सारे देशमे एक्कीस दिनोंतक संपूर्ण लॉकडाउन रहेगा ......" "बघ आता सगळेच घरी बसले ना धुणीभांडी - स्वयंपाक करीत. "


वाचने 2735
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

+१ हा ... हा... हा.... ! यानं बरोबर ओळखलं !

+१

+१

मस्त