[शशक' २०२०] - अग्निदिव्य
अग्निदिव्य

आज परत एकदा तो दारू पिऊन आला आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या वयात येणाऱ्या मुलासमोर तिची साडी फेडायला लागला.
"सोड मला. काय करतोस? मुलगा मोठा झालाय माझा."
"ऐ बये... नाटकं नको करुस. रावणाच्या लंकेत राहून पातिव्रत्याचा आव आणायला तू काही खरी सीता नव्हेस. सोड म्हणतो ना साडी..."
स्वतःला सोडवून घेत ती स्वयंपाकघराकडे पळाली आणि तिने आतली कडी लावून घेतली. त्याने शिव्या देत स्वयंपाकघराच्या दारावर धडका मारायला सुरुवात केली. त्याकडे दुर्लक्ष करून अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या पदराच्या दिशेने पेटती काडी नेताना जान्हवीच्या मनात एकच विचार होता...
सितेने अग्निदिव्य स्वीकारले ते रामाची जनमानसातील लाज राखायला... माझं अग्निदिव्य मोठ्या होणाऱ्या मुलासमोर स्वतःची लाज राखायला!!

वाचने
4559
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
+१
+1
इतरही मार्ग असू शकतात
-1
बाप्रे!
त्यापेक्षा
In reply to त्यापेक्षा by संजय क्षीरसागर
माहेर नसेल तर?
In reply to त्यापेक्षा by संजय क्षीरसागर
माहेरी गेल्यावर ही असलीच
+१
In reply to +१ by गणेशा
बऱ्याच कथा पुन्हा वाचल्या..
+१
+1