Skip to main content

[शशक' २०२०] - फत्ते

लेखक ऋतु हिरवा यांनी बुधवार, 22/04/2020 20:45 या दिवशी प्रकाशित केले.

फत्ते




फिरून फिरून ती तिथेच येत होती, पण त्या चौघांची तिच्यावर कडक नजर होती. तिची अस्वस्थता वाढत होती. ते मागे हटायला तयार नव्हते. तिची घालमेल मी दुरूनच न्याहाळत होते. त्यांना हुलकावणी देणे खूपच कठीण होते. पण तिला तिथपर्यंत पोचायचेच होते. ती अधीर झाली होती. तिचे काम होऊ दे अशी मी देवाला विनवणी करत होते. आता ते जरा कंटाळले, इकडे तिकडे हलले. ती संधीची वाटच पहात होती. क्षणार्धात त्या चौघांना आपली चूक कळली, त्यांनी तिच्यावर हल्ला केला. मी भयभीत झाले. त्यांनी तिला जमिनीवर लोळवले. पण शिताफीने ती निसटली आणि मी सुटकेचा नि:श्वास सोडला. कावळ्याच्या घरट्यात अंडी घालण्याचे कोकिळेचे काम फत्ते झाले होते.


वाचने 8004
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

+१ मस्तच, सुखांत शेवटामुळे जास्तच आवडली

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

+९ मास्त जमली आहे कथा

मस्त रंगवली आहे!!&#128079

+1

+1

चालू वसंतात असे काही दिसले व त्यावरून सुचले असे वाटतय .

उत्तम लिहिली आहे. शेवट तर मस्तच

+१

+१

+१

+१

+१

+1 मस्त वेगळीच

छान जमलीय.

+१

+१

+१

छान कलाटणी

+१

+१

वा वा! काय निसर्गाची कमाल आहे पहा! अचूक टिपलीय कथेत कोकिळेचे प्रयत्न. आवडली.

+१ आवडली!

+1

आवडली.