Skip to main content

[शशक' २०२०] - वाटेकरी

लेखक पलाश यांनी मंगळवार, 21/04/2020 17:34 या दिवशी प्रकाशित केले.

वाटेकरी




कन्यारत्न छोट्या गटात गेलं. तिच्या दादाला रोज शाळेत जाताना पहात होती त्यामुळे रडारड न करता निर्विघ्नपणे शाळेत जाऊ लागली. मी संध्याकाळी कामावरून घरी आले की दोन्ही मुलं दिवसभराचं साचलेलं बोलू लागायची. एक दिवस कन्या त्यादिवशी शिकलेलं म्हणून दाखवत होती, "ऊssभा १, आडssवे २,..." शाळेतल्या बाईंनी अंक तोंडी म्हणायला शिकवायला सुरवात केलेली होती. लक्ष देऊन ऐकायला लागले. आठापर्यंत नीट चाललं होतं. पण.. "संध्येssची पssळी मssऊ" ऐकल्यावर "अगं काहीपण काय म्हणतेस. नऊ आहे ते!!" असं म्हणाले. त्यावर "आमच्या बाईंनी अस्संच सांगितलंय!!!" उत्तर अगदीच जोरात मिळालं. जोरावरूनच कळलं. हिच्या मनातली आईनं व्यापलेली भलीमोठी जागा वाटून घेण्याची सुरवात आता शाळेतल्या बाईंपासूनच करायला लागणार आहे.


वाचने 3115
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

+१

:)

+1

+1

+१