Skip to main content

[शशक' २०२०] - दुर्लक्ष

लेखक शा वि कु यांनी सोमवार, 20/04/2020 18:03 या दिवशी प्रकाशित केले.

दुर्लक्ष




महेंद्र चहासाठी हाक आल्यावर उठला. डोळ्यांच्या कोपऱ्यातून येणाऱ्या कटाक्षांकडे दुर्लक्ष करत त्याने दात घासले. विनिता आणि आई बाबा आपल्या काळजीत आहे का त्याला माहित नाही ? इतक्या दिवसांनी तिच्यासोबत आणि निशीसोबत मोकळा वेळ मिळत होता. तर हा माणूस असा दुर्मुखलेला का असतो ? किती दिवसांनी मुंबईच्या गर्दीपासून लांब गावात निवांत राहता आलं. बाळासोबत तर खेळणे पहिल्या दोन महिन्यांनंतर मिळालेच नव्हते. आईबाबांसोबत व्हरांड्यात बसून चहा, निशीची बडबड, बाळासोबत विमान-विमान, विनिताची कातीव मान... यात का नाही रमतेस तू ? अशी कुठली शक्यता आहे त्याचा विचार करायला सुद्धा घाबरतोयस ? बेसिनमध्ये कफ थुंकून,साबणाने हात धुऊन महेंद्र स्वयंपाकघराकडे वळला. काही गोष्टी शब्दात पकडल्या तर खऱ्या होतात.


वाचने 2622
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

.

+१ मन चिंती ते वैरी न चिंती!! अशा या मनातल्या कफापासून थेट कोरोनापर्यंत जाणार्‍या विचारांकडे दुर्लक्ष करून त्यांना शब्दरूपातही न आणण्याचा प्रयत्न चांगला वाटला.

+१

+१