मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शशक' २०२०] - कमाई

चौकटराजा · · स्पर्धा

कमाई




त्वरेने स्टेशनचा जिना चढतानाही हॅटवाल्याचा पाठलाग करीत होतो. मी गस्तीवर असताना पार्सल्च्या बदल्यात मिळालेली नोटानी भरलेली बॅग त्याने उघडलेली मला दिसली . दिवसभरात मी त्याच्या मागावर होतो," याच्यावर डल्ला मारायचच !" . सगळीकडे सामसूम . जिना चढून जाताच एका झेपेत मी त्याला गाठले. तोच वीज कडाडली .साला बॅग सोडायला तयार नव्हता. . जोराने बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत मी झटापटीत त्याचे डोके पुलाच्या लोखण्डी कठड्यावर आदळले. घेरी आलेल्या अवस्थेत कोसळतच , त्याने ती बॅग खाली रूळात फेकली. त्याला बेशुद्धावस्थेत टाकून मी खाली धावलो. बॅगेतून नोटा रूळामधे विखुरल्या होत्या. पाउस चालू झाला. भिजतच बॅग उचलली. माझे खाली लक्ष गेले ." अरे देवा , पाण्याने नोटावरची शाई वाहू लागली होती." टीप : एका जुन्या इंग्लिश चित्रपटावर आधारित.


वाचने 3465 वाचनखूण प्रतिक्रिया 6

सौंदाळा Sun, 04/19/2020 - 20:02
+1