Skip to main content

[शशक' २०२०] - मुक्ती

लेखक बबन ताम्बे यांनी शुक्रवार, 17/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.

मुक्ती




रंग्याच्या गुंडगीरी,बाहेरख्यालीपणाला कंटाळून त्याच्या बायकोने छळामुळे केस लावली होती. तीन वर्ष जेलमधे काटून रंग्या घरी आला. आल्याक्षणी गावात हीराला शोधायला लागला. हीरा त्याने ठेवलेली. तो जेलमधे गेल्यानंतर तिने दुसरा आश्रयदाता शोधला. रंग्या तिला हाणूनमारून घरी घेऊन आला. रात्री तो भुकेल्या श्वापदासारखा हीरावर तुटून पडला. तो झोपल्यानंतर हीरा उठली. घरात ढेकणांनी छ्ळ मांडलेला. शेजारी रॉकेलची चिमणी जळत होती. ती घेऊन भिंतीवरचे ढेकुण चिमणीच्या वातीच्या चटक्याने मारत असताना अचानक हातातून चिमणी अंथरुणावर पडली. क्षणार्धात भडका उडून रंग्याला ज्वाळांनी वेढले. हीराने तुच्छतेने पाहिले. "मर मुडद्या" म्हणत बाहेरून कडी लावून झपझप चालत ती गावाबाहेर पडली. दुरपर्यंत रंग्याच्या किंकाळ्या रात्रीच्या अंधाराला चिरत जात होत्या.


वाचने 4637
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

मस्त !

+१

मस्त

+१, वरच्या पहिल्या प्रतिक्रियेशीसुद्धा सहमत.

+१

.

+१

+1

+१ आवडली!

+१ वर म्हटल्याप्रमाणे ट्विस्ट नव्हता तरी आवडली.

+1