Skip to main content

[शशक' २०२०] - प्रसाद

लेखक मायमराठी यांनी बुधवार, 15/04/2020 10:07 या दिवशी प्रकाशित केले.

प्रसाद




आत मूर्तीचं मनासारखं दर्शन आणि बाहेर आपल्या शाबूत चपला, यापेक्षा सच्च्या भक्तांना देवळांत काय हवं असतं? दोन्ही मिळालं होतं. आता भूक आणि ऊन यांच्या निराकरणासाठी समाधानी भक्तगणांचे पाय सरसावले होते. एक भिकारी त्यांच्या बाजूने चालत होता. मागितलं तर काहीच नव्हतं तरीही हातात फळांची पिशवी असलेल्याला दया आली. काही फळं त्याच्या हातात ठेवली गेली. गाडीजवळ पोचल्यावर कोणाला तरी तो फळांच्या दुकानात दिसला. पुनर्विक्रीची सोपी अर्थनीती उमगून सगळयांच्या जिभांनी जागीच यथेच्छ गोळीबार झाडला. हातात ताट घेऊन तो काचेवर टकटक करत होता. काच किंचित खाली झाल्यावर आमच्या खवचटपणाच्या उद्रेकाला वाव न देताच म्हणाला, " घाईत जनू? तुमास्नी फोडी करून आनल्यात. घ्या परसाद. संपवा समदं."


वाचने 39213
प्रतिक्रिया 62

प्रतिक्रिया

+१

+१

+ १

In reply to by अभिजीत अवलिया

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.


In reply to by अभिजीत अवलिया

आवडली कथा. (प्लस वन, नंतरच्या प्रतिसादात लिहितो. सध्या केवळ पोच) -दिलीप बिरुटे

+१

वाह! मस्त. :-)

+१ अप्रतिम शशक पेशन्स कमी होऊन समोरच्याला चटकन आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करायची मानसिकता हल्ली फारच वाढली आहे

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सौंदाळा, खरंय तुमचं म्हणणं. तुम्ही हे लिहिल्यावर दुसऱ्याच दिवशी तारिक १६ रोजी पालघर जिल्ह्यात गडचिंचले गावे दोन साधू व त्यांच्या गाडीचा चालक यांना संतप्त जमावाने केवळ संशयामुळे ठेचून ठार मारलं. सोबत पोलीस होते व संचारबंदी असली तरी हे तिघे अधिकृतरीत्या प्रवासात होते. बापरे! खूपंच वास्तववादी आहे म्हणून कथेला +१. :-( आ.न., -गा.पै.

+१


+१

+१

आवडली +१

+१

+1

पण पूर्ण कळली नाही. म्हणजे भिकारी चालत का होता मग त्यानेच यांना प्रसाद का दिला अस्ले टुकार प्रश्न. शिवाय सध्याच्या काळात त्याने हात आणि फळं ठेवली का ही मर्मबंधातली ठेवही ;) असो. +१ :)

In reply to by मीअपर्णा

वरती हात आणि फळं धुवून ठेवली का? अवांतर - एकदा टाकला प्रतिसाद की काळ्या दगडावरची रेघ का?

+१

+1

+१

+1 खूप छान

अप्रतिम

+१

+१

आवडली पैजारबुवा,

+१

कथा आवडली.

+१

+१

.

+१

+१

+१

+१

In reply to by संजय क्षीरसागर

हो. ते माणूस ओळखायला चुकले शिवाय त्यांनी प्रसाद खाल्ला की नाही याचा उल्लेख नाही.

In reply to by जव्हेरगंज

पण भिकाऱ्यानी भीक परत आणून देणं आणि तेही प्रसाद म्हणून हे काहीच्या काहीच. शिवाय असा प्रकार खाणारे कोण ?

In reply to by संजय क्षीरसागर

तुमचे प्रतिसाद भारी आहेत, मजा आली.. कथेचे म्हणाल तर मला ही हेच वाटाले होते.. फक्त मनात मी एक केले वाचताना.. की तो भिकारी नव्हता, गावाकडचा साधा , सरळ माणुस होता, गाडीत बसलेल्या व्यक्तीला तो भिकारी वाटला होता. कदाचीत कथाकाराला असेच लिहायचे असेल, पण फळांच्या पिशवी वाल्याने त्याच्या हातात फळे ठेवायची ओळ ही सगळ्यात चुकीची ओळ वाटली मला या कथेत, म्हणुन पुन्हा पुन्हा वाचली कथा, पण ह्या ओळी मुळे मी +१ नाही दिला बहुतेक तरीही या कथेला सर्वात जास्त वोट्स आहेत असे मला वाटते,, ( मजेने : विजयी झाल्यावर कथाकाराणे मला इतरत्र शब्दांचा प्रसाद देवु नये असे मला मना पासुन वाटते :) )

In reply to by गणेशा

> एक भिकारी त्यांच्या बाजूने चालत होता. आता वोटींगचं म्हणाल तर बऱ्याच लोकांना मतदानानंतर; जरा नीट विचार करायला हवा होता असं वाटतं !