नमस्कार!!!!!!!!!!
मी मिपा वर नवीन आहे. आणि आत्ताच अनाहिता ची पण सदस्य झाले आहे. सध्या मला खालील अडचणी येत आहेत.: -
1. मला अनाहितावर टाईप करताना अडचण येत आहे. मिपा च्या मेन बोर्ड वर टाईप करताना प्रत्येक शब्द संपूर्ण टाईप झाल्यानंतर त्याचं मराठीत रूपांतर होतं. तसं अनाहिता मध्ये प्रत्येक अक्षर टाईप केलं कि लगेच त्याचं मराठीत रूपांतर झाल्यामुळे अडचण येत आहे. मी प्रत्येकवेळी मेन बोर्ड वर प्रतिक्रिया टाईप करते आणि मग ती अनाहिता च्या प्रतिक्रियेत कॉपी पेस्ट करतेय. असे केल्यामुळे चुकून प्रतिक्रिया द्यायची नसताना मेन बोर्ड वर प्रकाशित व्हायची शक्यता आहे अशी मला भीती वाटते. ह्या बाबतीत काही करता येईल का? (मी दोन्ही कडे टेक्स्ट फॉरमॅट full HTML च वापरत असताना असं का होत आहे या बद्दल काही सांगू शकाल का???
2. मला मोबाईलवरून मिसळपाव अँप ऍक्सेस करताना पण अडचण येत आहे. अर्धा स्क्रीन वर फक्त मिपा चे पेज दिसते बाकी अर्ध्या स्क्रीन वर "मिसळपाव.कॉम हे मराठी माणसाच्या अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ आहे" हा मजकूर दिसतो. खालच्या लेखांची लिस्ट दिसत नाही.
3. माझी एक छोटीशी सूचना पण आहे कि मिपा च्या मेन बोर्ड वरून अनाहिता मध्ये जाण्याची सुविधा असावी. प्रत्येक वेळी नवीन टॅब ओपन करून मिसळपाव.इन टाईप न करता अनाहिता ऍक्सेस व्हावं. आणि मोबाईल अँप वरून पण अनाहिता मध्ये जाण्याची सुविधा असावी. किंवा आधीच अशी सुविधा असेल आणि ती मला वापरता येत नसेल तर तसे मार्गदर्शन करण्याची मी आपणास विनंती करत आहे.
धन्यवाद!!!!
वाचने
214
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया