मराठी भाषा दिन २०१७: फोनाफोनी (वर्‍हाडी)

चिनार's picture
चिनार in लेखमाला
25 Feb 2017 - 6:33 am

1
.
"हालो ... बापूसायब बोलून ऱ्हायले का जी?"
"हा मंग... कोन बोलून ऱ्हायलं?"
"आहो मी.... मी पद्मा बोलून ऱ्हायली."
"पद्मा?" बापूसायबाले कायबी टोटल लागेना.
"वळखलं नाय का?"
"आवाज वळखीचा हाय, पन आठवू नाय ऱ्हायला."
"अवं मी भौसायबाची सून.. तुमी नाय का त्या दिवशी घरी आल्ते?"
"हा हा... बोला सुनबाई .. आत्ता आलं ध्यानात."

आता भौसायबाची सून आपल्याला कायले फोन करू ऱ्हायली ते बापूसायबाले कळेना..

"बापूसाहेब येक अडचण व्हती. मदत करसान का?"
"सांगा की सुनबाई. अवं हक्क हायं तुमचा. भौसायबाची सून म्हंजे आमचीबी सून."
"आता काय सांगावं.. मामंजी अन हे गेले गावाले हप्ताभरासाठी. अन हिकडं आम्ही अडचणींत पडलो."
"कायची अडचण? सांगा तं येक डाव."
"आवं म्या घरी येकलीच हायं. अन हे सारे वावरातले मजूर आले हिथं पैसे मागाले."
"काह्यचे पैसे?"
"आवं ते कायतरी नोटबंदी केली म्हन्ते ना सरकारनी. या मजुराईले त्याईचे पैसे पायजे म्हन्ते सारे. आता मी कुटून देनार. पन्नास हजार हायेत साऱ्यायचे मिळून."
"बरं मंग आता?"
"मले तं कैच समजू नाही ऱ्हायलं? ह्यांले फोन केल्ता तं म्हने तुमाले फोन करून मागून घे सद्याचे. ते वापस आले की बातचं देतील म्हने तुमचे पैसे. येवढी मदत करान का बापूसायब? लागनं तं हे फोन करतीनं तुमाले."

बापूसायब विचार करू लागले. अन येकदमच त्येच्या चेहऱ्यावर खुशी झळकू लागली. दोन दिवसापासून बापूसायब चिंतेत व्हते. नोटबंदीच्यान त्यायच्या बी खुट्या लटकेल व्हत्या. वाड्यातले धा लाख कुठं ठेवावं त्यांले समजत नव्हतं. त्यातल्या पन्नास हजाराची सोय झाली व्हती.

"आवं काय सुनबाई.. हे काय विचारनं झालं? आपलंच घर हायं हे. पैसे घ्यायले येता की मानुस पाठवू तेव्हढं सांगा फकस्त."
"लय उपकार झाले बापूसायब. म्या पाठवते मानसाले."
"काह्यचे उपकार सुनबाई.. भौसायब आमचे दोस्त!! त्याईले नाही तं कोनाले मदत करनार? पाठवा मानसाले. अन ते पैसे परत द्यायचं का न्हाय ते मी अन भौसायब पाहू. तुमी नका टेन्शन घेऊ."

बापूसायबानी फोन ठिवला. त्यांले जरा बरं वाटू लागलं. आता अशेच दोन-तीन बकरे सापडले का त्यांचं काम व्हनार व्हतं. दोन मिनिटात फोन परत वाजू लागला. मगाचाच नंबर व्हता.

"हालो"
"हालो बापूसायब.. मी पद्मा बोलू ऱ्हायली"
"हा बोला सुनबाई.. काय झालं?"
"ह्यांले फोन केल्ता बापूसायब.. त्यायनं लयडाव आभार मानले तुमचे."
"आवं काय सुनबाई."
"बापुसायब.. त्याईनं तुम्चावाला तो बॅंकेतला नंबर असते का न्हाई, तो मागायले सांगतला. आल्यावर चेक फाडून देतो म्हने लगेच."
"आवं राहूद्या सुनबाई. मी बोलन नंतर भौसायबाशी."
"आवं बापूसायब.. मी बायमानूस काय बोलनार त्येंच्यासमोर? तुमी देऊन टाका जी मले नंबर. नायतर चिल्लावंतीन मायावर."
"बरं. मी देतो तुमाले. मॅसेज पाठवू काय तुमच्या फोनवर?"
"ते मले नाय ना समजत.. तुमी पाठवा, म्या देईल त्यांले आल्यावर."
"बरं.. पन मले सांगतल्याशिवाय चेक फाडू नका म्हना त्याले."
"हांव"

बापूसायबानी फोन ठिवला अन मॅसेज पाठवून देल्ला अकाऊंट नंबरचा.
सातेक मिनिटं झाले असतीनं तं फोन परत वाजला.

बापूसायबानी फोन हातात घेतला तं बँकेचा मॅसेज आल्ता.
"प्रिया ग्राहक, तुमच्या xxxxxxxxxxxxxxxxx या खात्यामध्ये रु. ५००००० नगद जमा झाली आहे."

बापूसायबाले काहीच समजेना. थोडं शुद्धीत आल्यावर त्याईनं भौसायबले फोन लावला.

"हे काय केलं भौसायब तुमीनं?"
"काय झालं बापूसायब?"
"आवं तुमच्या सुनबाईचा फोन आल्ता मले आत्ता पैसे मागायला. अन आता...."
"आमच्या सुनबाईचा??... कायतरी गलती होत आसन बापूसायब. आमच्या सुनबाई माहेरी हायेत बाळंतपणासाठी. त्या कायले तुमाले फोन करतीनं??"

बापूसायब गपकनं जमिनीवर बसले.
.
1

प्रतिक्रिया

पैसा's picture

25 Feb 2017 - 6:38 am | पैसा

=)) =)) धमाल किस्सा!

रुपी's picture

25 Feb 2017 - 7:06 am | रुपी

हा हा... मजेशीर.. =)

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Feb 2017 - 8:04 am | कैलासवासी सोन्याबापु

आम्ही बापूसाहेब असूनही आमच्याकडे वाडा नाही का दहालाख रुपये पण नाही, =))

बाकी ह्याले म्हणतेत किस्सा चिनार भाऊ, नैले पे दैला, अन ह्यालेच म्हणतेत ठसन सब्बन वऱ्हाडी ठसन

चिनार's picture

27 Feb 2017 - 10:14 am | चिनार

धन्यवाद बापू !!
बराबर बापू..हे तुमी नव्हे !! आमच्या घराजवळ एक वेगळे बापूसाहेब रायतेत.

झक्कास किस्सा... हे असे खरेंच घडले आहे..?? :O

प्राची अश्विनी's picture

25 Feb 2017 - 9:29 am | प्राची अश्विनी

;)छानच!!

इडली डोसा's picture

25 Feb 2017 - 11:17 am | इडली डोसा

वर्‍हाडी सुनबाई लै भारी आहेत...

बबन ताम्बे's picture

25 Feb 2017 - 11:17 am | बबन ताम्बे

मस्त कथा .

सस्नेह's picture

25 Feb 2017 - 11:46 am | सस्नेह

पद्माले आमच्या खात्याचाबी नंबर द्या हो चिनारभौ =))

पद्मावति's picture

25 Feb 2017 - 3:08 pm | पद्मावति

=)) मस्तच

एस's picture

25 Feb 2017 - 3:17 pm | एस

गपाक! हा हा हा!

नंबर एक गोष्ट चिनूभाऊ !
फोनवर SMS ची रिंगटोन वाजली की की बापूसाहेबांच्या SMS चा प्रसंग आठवतो :-)

चिनार's picture

27 Feb 2017 - 9:36 am | चिनार

धन्यवाद !!

खेडूत's picture

27 Feb 2017 - 9:52 am | खेडूत

:))

मस्त. अजून मोठ्ठं लिवा काईतर...

अॅस्ट्रोनाट विनय's picture

27 Feb 2017 - 10:54 am | अॅस्ट्रोनाट विनय

मपला बी नंबर द्या भो पद्माबाईले

चिगो's picture

27 Feb 2017 - 1:14 pm | चिगो

एक नंबर किस्सा, भऊ.. इच्याभना, आमाले कोणी नंबर नाही मागतला खात्याचा.. आमी देल्ला असता बापा..

संदीप डांगे's picture

27 Feb 2017 - 5:38 pm | संदीप डांगे

आराबाप्पो! बेज्या धिंगाना घालू र्‍हायले बापा तुमीतं... चीमैबिन... !

सविता००१'s picture

27 Feb 2017 - 6:06 pm | सविता००१

किस्सा आहे. :))

नूतन सावंत's picture

27 Feb 2017 - 6:17 pm | नूतन सावंत

वऱ्हाडी सुनबाई लय भारी.

मित्रहो's picture

27 Feb 2017 - 9:57 pm | मित्रहो

लय मस्त
सूनबाइ जोरात आन बापूसाहेब कोमात

भिंगरी's picture

28 Feb 2017 - 12:12 am | भिंगरी

सुनबाई नं. १

एमी's picture

25 Mar 2017 - 11:36 pm | एमी

Lol :-D

मपला बी नंबर द्या भो पद्माबाईले >> +1