घरातल्या गोष्टी-उपयुक्तता की अडगळ ?
सध्या जिथे कोणाच्या घरी जातोय तिथे एक गोष्ट नजरेआड करूच शकत नाही.... घरातला पसारा ! दर्शनीय खोली स्वच्छ ठेवून इतर खोल्या म्हणजे डम्पिंग ग्राउंड झालेलं असतं....
हल्ली बऱ्याच घरांमध्ये गरजेच्या नावाखाली भरमसाठ गोष्टींची खरेदी झालेली असते भले त्या उपयुक्त असोत अथवा नसोत.... दिसताक्षणीच गोळ्या घालण्याच्या आदेशासारखं दिसताक्षणी विकत घेण्याचे प्रकार चालू आहेत. मग ह्या सगळ्या स्वकष्टार्जित कमाईने जमा केलेल्या गोष्टी घरातली धूळ चवीने खाऊ लागतात. बरं , ज्याने आणलंय त्यांचं मनही मोडवत नाही पण तरीही हळूहळू घरातल्या कानाकोपऱ्यात एक एक करून अनावश्यक वस्तू साठत जातात आणि घराला अडगळीच्या खोलीचे रूप प्राप्त होते. मग सणावाराला आधी साफसफाई मोहीम उघडली जाते .... मुळात माणसाला इतक्या गोष्टींचा हव्यास असतोच का? आपल्या मानसिकतेचा नियम हेच सांगतो की जोपर्यन्त एखादी गोष्ट आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंतच आपल्याला तिचे आकर्षण असते... एकदा का ती आपल्या ताब्यात आली कि तिच्याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही आणि हे सरसकट सगळ्यांनाच लागू आहे.
घरातला स्त्रीवर्ग विशेषतः ज्या गोष्टीत विशेष अडकलेला असतो ते म्हणजे जुने कपडे, भांडी, प्लास्टिकचे पदार्थ/पिशव्या आणि इतर भंगार सामान ! कधीतरी लागेल म्हणून वर्षानुवर्षे ती गोष्ट जीवापाड जपून ठेवायची ( विशेष म्हणजे ती कधीही "लागत" नाही)...या संदर्भातच मला काही प्रश्न पडले आहेत ते असे -
१) अशा जपून ठेवलेल्या गोष्टी नक्की काय आणि कधी कामाला येतात ?
२) घर सफाई मोहिमेत मध्येच घुसून घराबाहेर काढायच्या ठेवलेल्या वस्तूंवर आक्रमण करून सुरतेची लूट असल्यासारखे परत सगळे पदार्थ घराच्या आत का जातात? मग सफाई मोहिमेचे उद्दिष्ट काय असते ? फक्त धूळ हटवणे ?
३) एखादी गोष्ट आपल्याकडे होती पण आपण तिचा वापर केला नाही याची रुखरुख नेमकी किती दिवस टिकू शकते ?
४) आपले सामान ३ बीएचकेचे असून आपण १ बीएचकेमध्येच राहतो हे सत्य त्या कधी स्वीकारतात ?
५) सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे अश्या गोष्टींना ज्याला बोलीभाषेत अडगळ म्हणतात त्याच्याशी भावनिक नातं असणं म्हणजे नक्की काय?
प्रतिक्रिया
२ बॅग भरून कपड़े खाल्ले असे
२ बॅग भरून कपड़े खाल्ले असे
२ बॅग भरून कपड़े खाल्ले असे
२ बॅग भरून कपड़े खाल्ले असे
पुढची ओळ म्हणा की !
:-)))
नुकतीच घरात साफसफाईची ऑर्डर
तुझं बाकी सगळं बरं आहे... पण वाचन जssssरा कमी पडतंय....
मापं, असं नाई म्हणायचं बरका
नको नको....माफीनामा देतो....
(No subject)
लोळी आहे ना आतमध्ये?
या विषयावर घट्ट पकड दिसतेय !
खालचा प्रतिसाद टकाशेटसाठी बर्का
पकडे रहना....छोडना नहीं.....
ना वाचताच
लेखात लिहिल्याप्रमाणेच असते
हे डेटा बॅक-अप कींवा इंशुरन्स
Pagination