संपादक मंडळ पुनर्रचना बाबत माहिती
नमस्कार,
दर वेळे प्रमाणे यावेळीसुध्दा मिसळपावच्या संपादक मंडळात बदल करणे अपेक्षीत आहेत. सध्या असलेल्या संपादक मंडळाने अतिशय उत्तम काम केले आहे. विशेषत: गेल्या काळात मी अन्य कामांत व्यस्त असल्यामुळे किंवा अन्य कारणाने मिपास पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. अश्या वेळी मिसळपावची अतिशय उत्तम काळजी संपादक मंडळानी घेतली. खरं तर त्यांचे आभार प्रदर्शन करून त्यांना परकं न करता मी कायम त्यांचा स्नेह व मार्गदर्शन व्यक्तिश: मला मिळत रहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आज दि. २२/११/२०१५ रोजी सध्या अस्तीत्वात असलेले संपादक सदस्यं व एकूणच संपादक मंडळ आपल्या कामातून थांबतेय. यापुढे येते काही दिवस मिसळपाव वर प्रशांत आणि मी असे संपादक असू. त्यामुळे सर्व सदस्यांना सहकार्याची विशेष विनंती आहे. याकाळात सदस्यांशी संवाद साधण्यात जरा अडचण येऊ शकते. त्यामुळे सदस्यांनी मिपाच्या धोरणाप्रमाने वागणुक ठेवावी व कारवाई टाळावी अशी विनंती आहे.
काही अडचण आल्यास मला किंवा प्रशांतला व्यक्तिगत निरोपाद्वारे संपर्क साधावा.
तू घाबरू नको टका, आता संपादक मंडळच नसणार.नीलकांत कात्री घेऊन बसणार दर सोमवारी.सर्वच धाग्यांना आणि प्रतिसादांना "संपादन" बटण असणार आहे.आपणच सुधरा आठ दिवसात नाहीतर "Access denide"!पहायला व्हा तयार.
यंत्रणा आणि व्यवस्था म्हणले की नियमित कालावधीनंतर बदल हां अवश्यंभावी असतो. मिपाच्या संपादकमंडळाचा अनुभव नेहमी चांगलाच राहिलेला आहे. (एखादा अपवाद सोडल्यास "चपला घाला आणि चालु लागा" काळातही)
सो, माहितीबद्दल आभार. जुन्या संपादक मंडळाचे आभार आणि येणाऱ्या नव्या चमुचे मन:पूर्वक स्वागत, शुभेच्छा !
सर्व आजी/माजी/पा