टी.सी.
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
काल ट्रेनच्या परतीच्या प्रवासात एक किस्सा घडला, वेस्टर्न लाईनला आता लोकल्स डहाणु पर्यंत झाल्या आहेत आणि तेव्हापासुन इथे लोकल मध्ये लेडीज डब्यात लेडीज टी.सी. दिसते. पालघर या स्टेशनापासुन डहाणु हे तिसरे आणी शेवटचे स्टेशन असल्याने लोकल तशी रीकामीच होती त्यामुळे बर्याच बायका सीटवर पहुडल्या होत्या. ती टी.सी पालघरहुन चढली व एकेक करुन तिकीटे चेक करु लागली. माझ्या मागच्या सीटवर एक काकु झोपल्या होत्या त्यांना तीने उठवले व तिकिट मागितले. त्या म्हणाल्या गाडी सुटली होती घाई-घाईत पकडली म्हणुन तिकिट नाही काढलं , टी.सी म्हणाली तुम्हाला फाईन भरावा लागेल, त्या काकु लगेचच गयावया करु लागल्या, पाय दुखत होता, गाडी सुटली म्हणुन मी तिकीट नाही काढलं , २० रु घे, कशाला रीसीप्ट फाडतेस त्यावर टी.सी. म्हणाली हे २० रु वगैरे असलं मी काही घेत नाही आणि बोलता बोलता तिने रीसीप्ट त्या काकुच्या हातात दिली आणी पैसे घेउन सुट्टे पैसे तिला परत केले. काकु धडधडीत खोटं बोलत होत्या हे सर्वांनाच माहीत होतं कारण लोकल एकदा सुटली की लगेच स्पीड पकडते त्यामुळे इथल्या लोकांना लोकल मधे चढणं शक्य नाही , बाकीच्या शटल्स , पॅसेंजर्स लगेचच स्पीड पकडत नाही त्यामुळे एकवेळ त्या गाडीत माणसं चढतात. चालत्या गाडीत चढणे हे चुकच आहे तरीही बर्याचदा असे होते कारण इथे सध्यातरी दुपारनंतर १ -२ तासांच्या अंतरावर गाड्या आहेत.
माझ्यासहीत बाकीच्या बायका त्या काकुला समजवायला लागल्या की तिकीट काढलंच पाहिजे आता पाहा २५ - ३० रु वाचवायला गेलात पण २७० रुपयांचा फटका बसला ना, आणि तसंही त्यावेळी दर १०-१५ मिनिटांनी अशा ३ -४ गाड्या होत्या ही गाडी सुटली तरीही दुसरी मिळाली असती. त्यावर त्या काकु म्हणाला जाउ दे तिला खाउ दे पैसे , त्यावर आम्ही सर्वांनी सांगितले ते पैसे ती खाणार नाहीये तिला खायचे असते तर तिने रीसीप्ट फाडलीच नसती आमचे हे सर्व संभाषण ती दरवाज्याजवळ उभे राहुन ऐकत होती. थोड्यावेळाने आली आणि सांगायला लागली की काय करणार हो लोकं तिकिटं काढत नाहीत , आमचं तर रोजचं आहे हे पण मी पैसे घेत नाही , आम्हाला चांगला पगार मिळतो, असे लोकांचे पैसे घ्या आणि तेच पैसे डॉक्टर कडे घालवा त्यापेक्षा मी कुणाकडुनही पैसे घेत नाही आणि अशा कीती लोकांना सोडणार बर्याच जणांकडे रीसीप्ट एवढे ही पैसे नसतात तर केव्हा केव्हा त्यांना सोडुन देते.
मला त्या टी.सी. चे कौतुक वाटले कारण टी.सी म्हंटले की कुणी विश्वासच ठेवत नाही की ते पैसे घेत नाही पण मी अशी प्रामाणिक टी.सी. पहिल्यांदाच पाहीली.
प्रतिक्रिया
-
ग्रेट्
+२
प्रामाणिकपणाचं कौतुक आहेच
मुंबऱ्याला एखाद्या बाईला
पण टीसी
.
असे सरकारी कर्मचारी कमी आहेत.
टीसीचे कौतुक आहे. लय भारी.
मला टी सी मराठी होती याचं
नाही
असो!
>>>>ती टी.सी. मुसलमान होती...
मुस्लिम हा शब्द केवळ लिहून
दृष्टीकोनात बदल व्हावा....
सहमत.
दृष्टीकोनात बदल व्हावा....
अवांतर : अनेक हिंदुंना
>>>निदान सुशिक्षितांनी तरी,
सुशिक्षितानी तिच्या
प्रामाणिकपणा किमान मला तरी
असो.
हम्म !
मी एकदा टीसीची गंमत केली होती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!च्च च्च..टीसीची नोक्री म्हणजे
असे लोकांचे पैसे घ्या आणि तेच
मराठी भाषा.
पेठकरजी
प्रामाणिकपणा...
हायला!
त्यावर एवढा कीस पाडायची गरज
+१
दोन्ही वाक्यात फरक आहे.
पेठकरजी
त्या प्यारेला नाय काम.