आधारकार्डाचा आधार सर्वांपर्यंत पोहोचलाय?
सरकारने आधार कार्ड सर्वच महत्त्वाच्या गोष्टींसाठी अनिवार्य केले आहे. शाळेच्या प्रवेशापासून ते गॅस कनेक्शन पर्यंत प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड अत्यावश्यक आहे. परंतु ते देशाच्या सर्व भागात उपलब्ध झाले आहे का? शहरी भागात उपलब्ध असेलही परंतु अनेक खेडेगावात अजूनही आधार कार्ड उपलब्ध नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी जेथे आधार कार्ड दिले जाते तिथेही योग्य सुविधा नाहीत. संपूर्ण दिवस घालवून नंबर लागतो. बरं, एवढा वेळ घालवून सर्व खटाटोप केला तर ते आपल्या पर्यंत वेळेत पोहोचते का?
माझे आधारकार्ड मिळायला दीड वर्ष लागले. अर्थात ते मिळाले हे ही नसे थोडके!! गॅस एजन्सीत मी ते वेळेवर देऊ शकले नाही. बय्राच शहरांतून हा गोंधळ आहे. घरातील सर्व सदस्यानी एकाचवेळी अर्ज करूनही काही जणांची कार्ड मिळाली आहेत तर काहींची अजूनही आलेली नाहीत. बाकी शहरांमध्ये काय स्थिती आहे?
ही योजना सुध्दा सरकारचे खायचे कुरण आहे असेच समजायचे का? शाळा प्रवेशासाठी आधारकार्डाची सक्ती नाही असे सरकारने घोषित केले आहे. परंतु शाळांपर्यंत हे पोहोचलेले नाही.
सर्व मह्त्त्वाच्या शासकीय कामकाजात आधारकार्ड ग्राह्य धरले जाईल की हे सरकार उलथले की संपले सारे?
हा विषय येथे लिहिण्याचे कारण माझ्या माहितीतील अनेकांना आधारकार्ड नसल्याचा चांगलाच फट्का बसला आहे. मि.पा.चे सदस्य अनेक भागांचे प्रतिनिधीत्व करतात, त्या भागांतील परिस्थिती जाणून घ्यायला आवडेल.
प्रतिक्रिया
शेवटीच माझं आधार कार्ड
Pagination