मकई कोफ्ता - पालक

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in अन्न हे पूर्णब्रह्म
10 Oct 2012 - 2:48 am

साहित्य कोफ्त्यांसाठी:

१ वाटी उकडलेले मक्याचे दाणे
१ वाटी किसलेले पनीर
२-३ ब्रेड स्लाईस कडा कापून घेणे (व्हाईट ब्रेड चांगला लागतो ह्या कोफ्त्यांसाठी)
१/२ टीस्पून जीरे
१-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१/४ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
३-४ टेस्पून मैदा (तांदळाचे पिठ, ब्रेडक्रम्ब्स ही वापरू शकता)

.

कृती:

ब्रेड स्लाईस पाण्यात बुडवून, घट्ट पिळून घेणे.
त्यात उकडलेले मक्याचे दाणे व पनीर (थोडे बाजूला काढून बाकी सगळे घेणे), जीरे, मीठ, बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथींबीर, गरम-मसाला घालून एकत्र करावे.
तयार मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे बनवून कोरड्या मैदामध्ये घोळवून घेणे व डीप फ्राय करावे.
मी कमीत-कमी तेलात तळायचे म्हणून इथे आप्पेपात्राचा वापर केला आहे.
आप्पेपात्राच्या प्रत्येक गोलात तेल गरम करून कोफ्ते तळून घ्यावे व टिश्यु पेपरवर काढणे.

.

साहित्य ग्रेव्हीसाठी:

१ जूडी पालक स्वच्छ करून, धुवून उकळत्या पाण्यात ३-४ मिनिटे घालून ठेवावा व लगेच काढून गार पाण्यात घालावा.
गार झाला की त्याची मिक्सरवर प्युरी करून घ्यावी.

२ टोमॅटोंची प्युरी
१ कांदा बारीक चिरलेला
थोडेसे उकडलेले मक्याचे दाणे
थोडेसे किसलेले पनीर
दीड टेस्पून आले+लसूण+हिरवी मिरची पेस्ट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून जीरे
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीनुसार
२ टेस्पून बटर किंवा तेल

.

कृती:

पॅनमध्ये बटर किंवा तेल गरम करून जीर्‍याची फोडणी करून घ्यावी.
त्यात आले+लसूण+हिरवी मिरची पेस्ट घालून परतून घ्यावी.
मग त्यात चिरलेला कांदा घालावा व मऊसर होईपर्यंत परतावा.
त्यात टोमॅटोंची प्युरी,उकडलेले मक्याचे दाणे, मीठ, धणेपूड, गरम-मसाला घालून तेलसुटेपर्यंत परतावे.
त्यात पालकाची प्युरी घालावी व आवश्यकतेनुसार पाणी घालून ग्रेव्हीला उकळी काढावी.
ग्रेव्ही चांगली उकळली की गॅस थोडा बारीक करुन ३-४ मिनिटे शिजु द्यावी.

.

सर्व्हींग डिशमध्ये ग्रेव्ही काढून घ्यावी व त्यावर तयार कोफ्ते घालावे.
किसलेल्या पनीरने सजवावे व लगेच गरमा-गरम पोळ्या, फुलक्यांबरोबर खायला द्यावे.

.

नोटः

कोफ्ते ग्रेव्हीमध्ये घालून एखादी उकळी काढून लगेच सर्व्ह करता ही येईल फक्त कोफ्ते फुटणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी.
जर का कोफ्ते बनवायचे नसल्यास नुसते उकडलेले मक्याचे दाणे घालून वरील पद्धतीने मकई-पालक बनवता येते.

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

10 Oct 2012 - 3:52 am | श्रीरंग_जोशी

डोळ्याचे पारणे फिटले.
क्या बात है!!

याचप्रकारे व्हेज भूना या डिश ची पाककृती मिळावी हि प्रार्थना.

बहुगुणी's picture

10 Oct 2012 - 4:57 am | बहुगुणी

मुळीच वाट पहायला न लागता नयनरम्य पाककृती हजर!

ती अखेरची कढईतली कोफ्त्यांभोवती कांद्याचे काप घालून तयार केलेली पुष्पाकृती अफलातूनच! तशीच आवडली कमी तेलात कोफ्ते तळण्यासाठी आप्पेपात्राची आयडिया.

प्रशांत's picture

10 Oct 2012 - 1:22 pm | प्रशांत

ती अखेरची कढईतली कोफ्त्यांभोवती कांद्याचे काप घालून तयार केलेली पुष्पाकृती अफलातूनच! तशीच आवडली कमी तेलात कोफ्ते तळण्यासाठी आप्पेपात्राची आयडिया.

नेहमीप्रमाणे सादरीकरण कलात्मक झाले आहे.मध्यंतरी आप्पेपात्रात दहीवड्याचे वडे तळलेले पाहिले होते, आता कोफ्ते तळलेले पाहून ग्रेटच वाटले. बाकी पाकृही नेत्रसुखद झाली आहे. पाकृंचे पुस्तक निघाल्यावर एक कॉपी आम्हासाठी राखून ठेवावी ही विनंती. (आता किती वेगवेगळे शब्द शोधून प्रतिसाद द्यायचा?):)

स्पंदना's picture

10 Oct 2012 - 9:46 am | स्पंदना

म श त! इतक तोंडाला पाणी सुटल की बस.
आप्पे पात्राचा तेल बचाव उपयोग नंबरी.

सानिका नेहेमीप्रमाणे मस्त !

आता देवाकडे साकडे घालणार आहे मी तुझ्यासाठी..
ह्या जन्मी नाहि शक्य पण पूढच्या जन्मी स्वप्निल ला डच्चु द्यायचा आटोकाट प्रयत्न करणार !

पन पुजा पवार हा स्वप्निलचा डुआयडी हाये.

मैत्र's picture

10 Oct 2012 - 6:10 pm | मैत्र

डुरक्याबद्दल सांगायचं तर
हिरितला गाळ काढला तर आतमध्ये जिवंत झरा हाय..

:)

जेनी...'s picture

10 Oct 2012 - 6:24 pm | जेनी...

इरसाल राव,

एवढ कुठलं नशिब आमचं :(

:D

प्रचेतस's picture

10 Oct 2012 - 10:11 am | प्रचेतस

खल्लास.

मोदक's picture

10 Oct 2012 - 11:01 am | मोदक

भारी...

पियुशा's picture

10 Oct 2012 - 11:11 am | पियुशा

hi
हायला जबरदस्त !!!!जीव गेला भुकेने ;)

अक्षया's picture

10 Oct 2012 - 11:12 am | अक्षया

+११

सह्ही...मस्स्त पाकृ!! नक्की करून बघणार.
बाकी..फोटो एकदम कातील!!

प्रभो's picture

10 Oct 2012 - 11:49 am | प्रभो

भारी!!

सविता००१'s picture

10 Oct 2012 - 12:04 pm | सविता००१

सानिका, पाकृ आणि फोटोबद्दल काहीही बोलणार नाही मी. काय (सुंदर) छळवाद मांडला आहेस ग!!!!!!! :)

वेताळ's picture

10 Oct 2012 - 12:18 pm | वेताळ

दिल मेरा भर गया.
मस्त...सारिका ताई

मी_आहे_ना's picture

10 Oct 2012 - 12:40 pm | मी_आहे_ना

-^- -^- -^- -^- -^-
जबरा सादरीकरण !

डोळे अन पोट तृप्त करणारी पाकृ.
शॅलो फ्रायसाठी अप्पे-पात्र वापरण्याची युक्ती आवडली. लक्षात ठेवीन. तळण्याला चांगला पर्याय..!

गणपा's picture

10 Oct 2012 - 1:15 pm | गणपा

भारी दिसतायत कोफ्ते.
आणि आप्पे पात्राचा असाही उपयोग होऊ शकतो हे नव्याने कळाले. :)
मस्तच.

ऋषिकेश's picture

10 Oct 2012 - 1:21 pm | ऋषिकेश

तुमचे, गणपाचे आणि पेठकरकाकांचे प्रमाण आणि स्टेप्स अगदी अचुक - काहिहि न गाळता- दिल्या असतात याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. तेव्हा ही पाकृदेखील जशीच्या तशी करून बघणार आहे. :)
यावेळी फटु काढायचा प्रयत्न केला जाईल

मेघवेडा's picture

10 Oct 2012 - 1:33 pm | मेघवेडा

तंतोतंत

क्लास!

प्रभाकर पेठकर's picture

10 Oct 2012 - 4:52 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद ऋषिकेश आणि मेघवेडा.

नीलकांत's picture

10 Oct 2012 - 1:23 pm | नीलकांत

एकदम झकास... काय सांगू ? सादरीकरण तर भारीच...

- नीलकांत

कच्चा पापड पक्का पापड's picture

10 Oct 2012 - 1:25 pm | कच्चा पापड पक्क...

एकदम भारी ............

सहीच.... नक्की करुन बघेल..... मस्त.. :)

गोमटेश पाटिल's picture

10 Oct 2012 - 2:10 pm | गोमटेश पाटिल

aghadi tondala pani sutalay ......

स्मिता.'s picture

10 Oct 2012 - 2:22 pm | स्मिता.

नेहमी तेच तेच काय बोलायचं म्हणून फक्त वाचल्याची पोच ;)

कच्ची कैरी's picture

10 Oct 2012 - 2:51 pm | कच्ची कैरी

सानिका नेहमीप्रमाणेच एकदम झक्कास पाककृती आणि सादरिकरण !!! आणि आप्पेपात्राचा मस्त वापर :)

हीसुद्धा रेशिपी पाह्यल्याची पोच, नेहमी तेच तेच काय लिहायचं !! ;)

Pearl's picture

10 Oct 2012 - 7:05 pm | Pearl

पाकृ चे साहित्य सुटसुटीत. सोपी पा.कृ. मस्त सजावट. शेवटचा फोटो सुरेखच.
आप्पेपात्रात कोफ्ते तळण्याची आयडिया आवडली.
पाकृ करून पहाण्यात येईल.

पिलीयन रायडर's picture

10 Oct 2012 - 7:30 pm | पिलीयन रायडर

त्रास आहे नुसता जीवाला.....

पैसा's picture

10 Oct 2012 - 7:40 pm | पैसा

नेहमीची प्रतिक्रिया लिहिली आहे असं समजून चालावे. आप्पेपात्राचा वेगळा उपयोग आवडला.

ते कोफ्ते करताना ब्रेड टाळुन दुसरं काय वापरता येईल? ब्रेडच्या ऐवजी तांदळाची पिठी चालेल का बेसन?
पालकची ग्रेव्ही करुन बघते.

सानिकास्वप्निल's picture

11 Oct 2012 - 5:37 pm | सानिकास्वप्निल

पर्याय१ : ब्रेड ऐवजी उकडलेला बटाटा वापरु शकतो. बटाटा कुस्करुन मिश्रणात घालायचा व त्यात बाईंडिंग साठी मैदा किंवा कॉर्नफ्लॉअर किंवा बेसन घालून कोफ्ते तयार करता येतात. कोरड्या मैद्यात घोळवायची गरज नाही.

पर्याय २: उकडलेल्या बटाटा कुस्करुन त्यात मैदा घालायचा व छोटी पारी करुन त्यात मिश्रण भरुन ही कोफ्ते तयार करता येतात.

ब्रेडचे कोफ्ते खाताना जड वाटत नाही, हलके वाटतात.

मराठे's picture

10 Oct 2012 - 8:43 pm | मराठे

namaskar

अहो असे का झोपलायत रस्त्यावर ?? :(

सानिकातैंना साष्टांग नमस्कार घातलेला आहे.

चिंतामणी's picture

10 Oct 2012 - 9:53 pm | चिंतामणी

बाकी काय लिहीणार .

नेहमीचीच प्रतिक्रीया समजून घेशीलच.

असो.

तुझा आणि तुझ्या हातांचा विमा काढला असशीलच.

(वरच्या बायांपैकी) कोणितरी म्हणेल तुला " ये हात मुझे दे दे सानीका"

स्वाती दिनेश's picture

10 Oct 2012 - 9:57 pm | स्वाती दिनेश

मस्तच दिसत आहे ग कोफ्ता पालक!
(माझा आधी दिलेला प्रतिसाद गायबला, :( )
स्वाती

अत्रुप्त आत्मा's picture

11 Oct 2012 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/hungry.gif

लाळेर्‍याची स्मायली पाजये बॉ आता :)

धनुअमिता's picture

11 Oct 2012 - 2:27 pm | धनुअमिता

सानिकातैं तुला साष्टांग नमस्कार.आप्पेपात्राचा वेगळा उपयोग आवडला.रेसिपी करुन बघेन.

खुशि's picture

11 Oct 2012 - 3:42 pm | खुशि

करुन बघते मग कळवते.आप्पे पात्राचा हा उपयोग मस्त.

जाई.'s picture

11 Oct 2012 - 8:57 pm | जाई.

वाह !!!!!!!!

हसरी's picture

12 Oct 2012 - 5:19 pm | हसरी

सुंदर!!!

पालक आणि टोमॅटो एकत्र करू नये म्हणतात ना?

विकांताला हा बेत प्रमाण्केवळ बरीच मंडळी जेवायला असल्याने प्रमाण बरोब्बर दुप्पट घेतले. सुप्पर हिट!
फोटो काढ्ला आहे. लवकरच चढवतो

सानिका यांचे अनेक आभार!

प्राजक्ता पवार's picture

18 Oct 2012 - 8:32 pm | प्राजक्ता पवार

कमी तेलात कोफ्ते तळण्यासाठी आप्पेपात्राची आयडिया आवडली .