प्रथम क्रमांक स्पर्धा विजेता कविता
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?
किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे
कधी भाट होई सख्या चेहर्यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?
"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे
जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?
कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...!
.
गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------
मुटे जी, अत्यंत सुंदर मांडली
ह्म्म्म्म.
मुटेजी.... वोह सुबहा कभि तो
सुंदर गझल. मनातली कळकळ
की तसा शब्द मुद्दाम वापरला
मुटेकाका एकदम मनातील गोष्ट
+१
मुटेजी कविता छान.
झकास
धन्यवाद
आजच्या काळासाठी समर्पक कविता !
वाह!
शिर्षक वाचुन एकदम " जिन्हे
हे कडवे
अभिनन्दन -
हे
जरा गंध नाही मुळी झोपडीला,
अभिनंदन
मुटेजी! सुंदर कविता
मुटेजी- खूप खूप मनापासून
ही गझल प्रथम क्रमांक पारितोषक विजेता ठरली आहे -