सूर्य आणी कावळे.
महादेववाडीतील सूर्योदय
ही चित्रफीत घरातूनच काढली आहे.
उगवता आणी मावळता सुर्य बघणे एक अद्भुत अनुभव मिपाखरांनी घेतला असेल यात संदेह नाही.कन्याकुमारी, गणपतीपुळे, हिमालय व अगरतला येथून हा अद्भुत अनुभव मी घेतला आहे. काचंनसंध्येला हाच अद्भुत अनुभव जर घरातून दिसत असेल तर काय बोलावे.दुधात साखर आणी साय, दुग्धशर्करा पेक्षा मोठा योग. सकाळी बाल्कनीत बसून सकाळचा चहा आणी संध्याकाळी पाॅपकाॅर्न सोबत गेली बारा वर्षांपासून हा अद्भुत अनुभव घेत आहे. घरासमोरील ढगाई माता टेकडीवर सूर्योदय होतो तर पश्चिमेस अनंदवन राखीव जंगलात सुर्यास्त
सकाळ संध्याकाळ कावळे मोठ्या संख्येने पूर्वेकडे व सुर्यास्तापुर्वी पश्र्चिमेकडे धाव घेताना दररोज दिसतात.असे का?,अभ्यासून बघता कळाले की कावळ्यांना रात्रीचे अंधारात दिसत नाही.
माऊलींनी ही गोष्ट ज्ञानेश्वरीमधे नमूद केली आहे..
पै चंद्रोदया आरौतें।
जयांचे डोळे फुटती असते।
ते काऊळे केवीं चंद्रातें।
वोळखती ॥
अ.४,ज्ञानसंन्यासयोग,ओवी २४
In summary, while crows can see in low light, they are not nocturnal and rely on daylight to navigate and forage.Their vision is not adapted for complete darkness, and they tend to roost when it gets dark.
अद्भुत.
मिपाखरांसाठी मुद्दाम काढलेली चित्रफीत वर ढकलली आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
विटपान्तरलच्छायायां निस्सृतं
पण आमचं वाचन फक्त " बगळ्यांची
अर्थ
विटपान्तरलच्छायायां निस्सृतं रश्मिरञ्जनम्| आविर्भवति भास्वानिव मणिगर्भे रुचिरद्युति:||पानांच्या छायेतून जसा सूर्यकिरणांचा लालसर रंग निसटतो तसा तसा तो जणू एखाद्या रत्नरुपी गर्भातून तेजोमय होत आहे.चित्रविथ्यां न दृश्यं तं साक्षात् काव्यविभूषणम् | सेवते यो 'तपस्वी' स तु काव्यर्षिभिः सम: ||केवळ चित्ररुपातच नव्हे तर तर काव्यरुपातही शोभणारे असे दृश्य साकारतो असा तपस्वी काव्यऋषींसमान आहे.धन्यवाद प्रचेतस भाऊ, तुसी ग्रेट हो..
मला येत नाही याची खंत वाटते.
मला येत नाही याची खंत वाटते.संस्कृत शिकणे इतके अवघड नाहीये कर्नलसाहेब. १० वी पर्यंत पाया बर्यापैकी तयार झालेला असतो. शालेय अभ्यासक्रमातले संस्कृत नवनीत पुस्तक आणणे आणि https://learnsanskrit.cc/ वर थोडा अभ्यास केला तर संस्कृत शिकणे सहज शक्य आहे. निदान शब्दार्थ समजणे तर काहीच अवघड नाही. वाक्यरचना करता येणे मात्र थोडे कठीण आहे मात्र त्याची गरज फारशी पडत नाही.दहावी अकरावीपर्यंत मीही शिकलो
शतपर्णी
चला, या निमित्ताने "मिपा
अप्रतिमच ! सुर्योदय पाहताना
@चौथा कोनाडा भाऊ....
वा !