Skip to main content

मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 13/05/2025 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप https://youtu.be/oq35bx7ktEM?si=SHdxD8Kmglr2iXD5 माझी उत्तरे प्रश्न १ - समझौत्याची घोषणा भारत आणि पाक यांच्या ऐवजी त्रयस्थ पक्षाने करणे केव्हाही हितावह. जो पक्ष समझौत्याची भाषा करतो तो कमकुवत मानला जाऊ शकतो. भारताने अशी घोषणा केली असती तर पाकला आयते कोलीत मिळाले असते. प्रश्न २ भारताच्या परराष्ट्र नीतीची कोणतीही अडचण झाली असे मला वाटत नाही. कोणत्याही युद्धात सन्मान्य माघार विजया इतकीच महत्त्वाची असते. ती कशी घ्यायची हेही अगोदरच ठरलेले असते. प्रश्न ३ - अशा मोठ्या घटनांमध्ये पडद्यामागे काय चालू आहे, ते सामान्य बुद्धीमत्तेच्या जनतेला कळणे अपेक्षित नसते. सिमला करार गुंडाळल्याची घोषणा पाकीस्तानने केली असल्याने ट्रंपच्या मध्यस्थीला सिमला कराराच्या आधारावर आक्षेप घेणे हास्यास्पद आहे. प्रश्न ४ - अमेरीकेची व्यापार थांबविण्याची धमकी पोकळ होती. ते अमेरीकेला परवडणारे नाही. ती धमकी त्यांनी का दिली यावर मोदींनी भाष्य करावे अशी मी पण अपेक्षा करणार नाही. ही धमकी दिखाउ असायची शक्यता खूप वाटते. कालच्या मोदींच्या भाषणानंतर भारत अशा धमकीपुढे नमेल असे वाटत नाही. प्रश्न ५ ट्रंप यांनी शस्त्रसंधीचे क्रेडीट घेण्याने भारताचे कसलेही नुकसान झालेले नाही. भारताचे उद्दीष्ट साध्य झालेले असल्याने, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत बसणे हे सामर्थ्यवान व्यक्तीचे लक्षण नाही.उलट ट्रंपला अनुल्लेखाने मारले हे मला अतिशय आवडले
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4492
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया