समस्यांवर विज्ञानमान्य उपाय.
घाटपांडे सरांच्या फलज्योतिषविषयक धाग्यावर बराच काथ्याकूट झाला.फलज्योतिष हे थोतांड वगैरे नेहमीचेच मुद्दे आणि शाब्दिक गुद्देही काहीजणांना मिळाले.पण चर्चा ज्या लोकांसंबंधी आहे त्यांना केंद्रस्थानी ठेवून अशा विषयावर चर्चा व्हायला हवी.वैयक्तिक माझा फलज्योतिषावर थोडा विश्वास आहे.पण फलज्योतिषावर विश्वास आहे म्हणजे विज्ञानमान्य उपाय अमान्यच आहेत असे समजण्याचे कारण नाही.शेवटी काय तर समस्या सुटणे किंवा निदान तिचे स्वरुप सौम्य होणे किंवा दाहकता कमी होणे यासाठीच जातक फलज्योतिषाकडे जात असतो.फलज्योतिष हे थोतांड आहे हे छाती पिटून वारंवार सांगूनही लोक तिकडे जातच असतील तर दोष फलज्योतिषात नव्हे तर लोकांच्या समस्या सोडवण्यात विज्ञानमान्य मार्ग कमी पडत आहेत असाच त्याचा अर्थ होत नाही का? हे अन्य मार्ग कोणते? ते समस्यानिवारणात/सौम्य करण्यात का कमी पडत आहेत हे पाहिले पाहिजे.त्यासाठीच हा धाग्याचा खटाटोप.
आता आधी आपण पाहूया की फलज्योतिषाकडे नक्की कोण जातं? का जातं?
(इथे फलज्योतिषी म्हणजे जन्मवेळ+जन्मठिकाण+जन्मतारीख या तिन्हींचा उपयोग करुन पत्रिकेवरुन भाकित करणारे आणि त्यानुसार विशिष्ट पुजा,दान,होम असे भिती/किळस न वाटणारे/शारीरिक इजा न करणारे धार्मिक उपाय सुचवणारे फलज्योतिषी असा अर्थ आहे.
चेटूक/करणी काढणारे तांत्रिक बाबा सदर धाग्यात अपेक्षित नाहीत हे आधीच स्पष्ट करतो.)
तर बघूया की फलज्योतिषाकडे नक्की कोण जातं? का जातं?
१) आर्थिक स्थिती बेताची: राहत्या ठिकाणी ठिकठाक जीवनशैली जगून चार पैसे गाठीला बांधणे हे किमान जीवनसुद्धा जगणे अवघड जात असलेले लोक.यात झोपडपट्टीत राहणार्या व्यक्तीपासून राहत्या शहरात घर विकत घेणे परवडत नसल्याने भाड्याने राहणार्या लोकांपर्यंत सगळे आले.यांच्या आर्थिक समस्या या किमान गरजा भागवताना अोढाताण होणे या प्रकारातल्या असतात.
२) विवाहाला खूप विलंब होणे: यात कोणत्याही आर्थिक स्तरातील व्यक्ती असू शकते.यात स्त्री-पुरुष कोणीही असू शकतो. स्वत: अशी व्यक्ती किंवा तिचे पालक/नातलग.
३) आर्थिक परिस्थिती चांगली असणारे पण आता आहे त्याहून वरच्या आर्थिक स्तरात जाऊ इच्छिणारे.
४) नोकरी किंवा व्यवसायात मोठा आर्थिक फटका बसलेले.
५) दीर्घकाळ आजार/शारीरिक दुखणे असल्याने विलंबाला वैतागलेले लोक
६) व्यंग असणारी संतती असल्याने तिच्या पुढील आयुष्याबद्दल चिंता असणारे लोक.
७) जातकाच्या ऐपतीच्या तुलनेत महाग म्हणता येईल अशा वस्तूची खरेदी किंवा विक्री किंवा वाहन खरेदी.
८) हरवलेली/घर सोडून गेलेली व्यक्ती परत कधी येईल?
९) नोकरीच्या ठिकाणी बालंट येणे किंवा गैरव्यवहारात अडकणे/अडकवले जाणे.
१०) राहते घर लाभत नसल्याचा संशय असणारे.
११) एखादा कुटूंबीय जुगार/दारु यांचा टोकाचा व्यसनी बनल्याने आर्थिक स्थिती खालावलेले लोक.
------------------------------------------------
आता हे सगळे प्रकार किंवा समस्या वास्तवात सारांशाने कशा प्रकारचे आहेत ते पहा.(क्रमानुसार मांडलेले नाहीत)
१) चांगला बाजारभाव असणारे कोणतेही कौशल्य अंगी नसणे.
२) शिक्षणात बोर्या वाजणे+स्ट्रीट स्मार्टनेस नसणे.
३) मुळातच संयम नसणे.मला हवे तसेच सगळे घडले पाहिजे , मी नेहमी फायद्यातच असलो पाहिजे ही अवास्तव अपेक्षा करणे.
४) प्रयत्न चुकीच्या दिशेने करणे.
५) अवास्तव अपेक्षा करणे.
६) आहे ती परिस्थिती चांगली असूनही त्यात समाधानी नसणारे.काहीना काही खुपणारे.
७) सामाजिक गैरसमज किंवा समाजाची भिती.
८) संशयी किंवा उगाचच अतिरेकी चिंता करणारे.
९) आपली आर्थिक/बौद्धिक कुवत न पाहता जोखीम स्विकारणे.
१०) मनुष्यस्वभाव अोळखण्यात कमी पडणे.
-------------------------------------------------
वरील कारणे पाहता समस्या निर्माण होण्यात सर्वाधिक वाटा हा मन प्रसन्न नसणे , अवास्तव अपेक्षा , तुलना करणे , संयमाचा अभाव या मानसिक गोष्टींशी असे दिसून येईल.
त्यानंतर इंटेलेक्चुअल लेवल बेताची असण्याचा आहे.
आणि तिसरे म्हणजे समाजाचे गैरसमज.
-----------------------------------------------
आता उपाय पाहू.
१) मन प्रसन्न नसणे यावर विज्ञानमान्य उपाय दोन आहेत.
अ) मनातला कोलाहल दूर करणारे अल्पमोली उपाय म्हणजे अवास्तव अपेक्षा म्हणजे काय? ते अवास्तव का आहेत? त्यापासून नुकसान कसे होते? अवास्तव विचारांपासून दूर कसे रहावे हे सांगणारी पुस्तके/व्हिडिओ/अॉडीयो/मोफतचे किंवा अल्पमोली सेमिनार/वेबिनार इ.
ब) समस्या जटील असेल तर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेणे.
पण यात अजून काही समस्या आहेत.
A) मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेणे हे काही ठिकाणी खर्चिक असू शकते.तितके पैसे समस्याग्रस्त व्यक्तीकडे नसूही शकतात.सर्वांना परवडणार्या दरात ही सेवा उपलब्ध व्हायला हवी.
B) मानसोपचारतज्ज्ञांच्या सेवा सर्वदूर उपलब्ध नाहीत.खेड्यात अभावच आहे.
C) मानसोपचारतज्ज्ञाकडे जाणे म्हणजे वेड लागलेले असणे हा समाजातील काहीजणांचा गैरसमज असणे.त्यासाठी मोठ्या प्रमाणावर समाजप्रबोधन गरजेचे आहे.पण हे अल्पकाळात होणारे नाही.
२) बेताची असणारी इंटेलेक्चुअल लेवल/आकलनक्षमता वाढवता येणे शक्य होते का? आलीच तर कितपत? ज्यांची इंटेलेक्चुअल लेवल मुळातच चांगली आहे त्यांच्याशी स्पर्धा अटळ आहे.भारतासारख्या मागणीपेक्षा पुरवठा जास्त असणार्या देशात असेच लोक निवडले जाण्याची शक्यता अधिक नाही का? स्वस्तात अरबी घोडा मिळत असतील तर कोणी गाढव किंवा खेचर का निवडेल? गाढव/खेचराचे परिवर्तन दमदार, शर्यतीच्या अरबी घोड्यात करायचेच झाल्यास ते कितपत शक्य व्हावे?
३) सामाजिक प्रबोधन हा जनसमुदायावर केला जाणारा आणि दीर्घकालाने किंवा दीर्घप्रयत्नानेच फलद्रुप होणारा उपाय आहे.
-------------------------------------------------
आपल्याला काय वाटतं? समस्या निवारण , अवास्तव अपेक्षा, संयमाचा अभाव , बौद्धिक पातळी कमी असणे यावर अजून काय काय विज्ञानमान्य उपाय करता येतील? ते कितपत शक्य किंवा अवघड वाटताहेत? ते कुठे कमी पडत आहेत? यात दोष कोणाचे? चर्चा व्हावी.
प्रतिक्रिया
वरच्या यादीत अजुन एक ,
आपल्या हातात नसणार्या अशा
हम्म.
कारण
@ उपयोजक : सगळ्या समस्यांचं मूळ वैचारिक गोंधळ हे आहे
महाग सेवा?
मी अनुभवलेले काही ...
कसं सांगणार? कसं पटवणार?
@ उपयोजक : तुमचा वेळ जात नाहीये का ?
भन्नाट!
@ उपयोजक : ज्योतिषी विवाहेच्छुकांच्या अपेक्षा वाजवी
घाटपांडे सरांच्या
@ उपयोजक : तुम्ही प्रतिसाद वाचत नाही का ?
ऑइन्क ?
हा हा हा :))
> र अशा मध्यमवयात विवाह
साहना
व्यक्ती जेव्हा हतबल होतो
व्यक्ती जेव्हा हतबल होतो
सहमत आहे राजेश
कर्म व नशीब
<ins>चौकटराजा</ins>
निस्सीम तालेब हे गणित तद्न्य
धन्स
सहमत आहे
विज्ञानमान्य = ?
+१
+१०१
सरकारमान्य देशी दारुचे दुकान
गा.पै
विज्ञानाचे निकष
निकष
स्थूल अटी
जीवनातील प्रत्येक प्रसंगाला विज्ञान उत्तर देवू शकत नाही
जीवनात घडणाऱ्या प्रत्येक
कधीही असणार नाही ...
तुमच्या मताचा व्यत्यास
अगदी बरोबर ...
उप्योजक काही समस्या
कारण ...