Skip to main content
लेखक सरपंच यांनी बुधवार, 29/03/2017 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, येथे केलेल्या घोषणेनुसार मिपावर येणार्‍या नवनवीन सदस्यांना लिहायला सुरुवातीच्या काळात खूप अडचणी येतात, त्यांना लेखन करण्याच्या प्रयत्नात काही अडचण आल्यास ती सोडविण्याकरिता 'साहित्य संपादक' नावाची नवीन रचना मिसळपाव व्यवस्थापनाने सुरू केली. सदस्यांना मदत करण्याव्यतिरिक्त गेल्या दोन वर्षात साहित्य संपादकांनी पुढाकार घेऊन सुनियोजित पद्धतीने मिपा पुस्तके, विविध लेखमालिका आणि विशेषांक यांच्या प्रकाशनात अतिशय महत्त्वाचे योगदान दिले आहे. गेल्या दोन वर्षात मिपावरील सर्वच उपक्रमांमध्ये त्यांचा उत्साही सहभाग राहिला आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. मिपावरील लिखाणाच्या व्यवस्थापनात अधिकाधिक सदस्यांचा सहभाग असावा, या धोरणानुसार आता यातील काही साहित्य संपादक थांबत आहेत आणि त्यांच्या जागी नवे साहित्य संपादक येत आहेत. मात्र आता थांबत असलेले साहित्य संपादक यापुढेही मिपाच्या वाटचालीत तेवढ्याच उत्साहाने सहभागी असतील, अशी आशा बाळगतो. सध्या थांबत असलेले साहित्य संपादक अजया स्नेहांकिता किसन शिंदे श्रीरंग जोशी मधुरा देशपांडे स्रुजा मिसळलेला काव्यप्रेमी सतिश गावडे अन्या दातार विशाखा पाटील यापुढेही कुठल्याही प्रकारचे लेखन करताना तुम्हाला काहीही अडचण आल्यास तुम्ही कार्यरत असलेल्या साहित्य संपादकांकडे मदत मागू शकता. तसेच एकदा प्रकाशित झालेल्या लेखनात काही बदल करायचे असतील किंवा फोटो, व्हिडिओ जोडण्याबाबत काही अडचण असेल, तरी हे साहित्य संपादक मदत करतील. मिसळपावच्या साहित्याची रचना, नवीन प्रकार आदिबाबत साहित्य संपादकांना वेगवेगळे अधिकार आहेत. वेळोवेळी निघणारे मिसळपाव विशेषांक किंवा साहित्याचे व्यवस्थापन आदी कामांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असेल. तुम्ही लिहिते व्हावे आणि तुमचा लिहिण्याचा अनुभव सुखद व्हावा, यासाठी आपल्यातीलच काही लोक स्वतःहून तुम्हाला मदत करताहेत हे आनंददायक आहे. त्यांच्या मदतीचा लाभ घ्यावा. नवीन साहित्य संपादकांचे अभिनंदन आणि आधीच्या साहित्य संपादक टीमप्रमाणेच उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा! पुढे त्यांची नावे देत आहे. आदूबाळ वेल्लाभट कॅप्टन जॅक स्पॅरो एस अभ्या.. जव्हेरगंज पैलवान मंदार भालेराव पद्मावति नीलमोहर

वाचने 28025
प्रतिक्रिया 56

प्रतिक्रिया

उगवत्या सासं चे अभिनंदन आणि शुभेच्छा ! गेले वर्ष दीड वर्ष जुन्या टीम बरोबर काम करणे हा अतिशय आनंददायी अनुभव होता. सर्वांच्या योगदानातून किती सुरेख निर्मिती होऊ शकते आणि तिला किती विविध पैलू पडतात हे बघणे फार सुखद होते. सर्व जुन्या टीमला काँप्लिमेंट्स आणि आभार !

जुन्या सा सं बरोबर थोडस का होईना काम करण्याची संधी मिळाली. सतीश राजवाडेंची मुलाखत घेणे हा एक वेगळाच अनुभव होता. त्यात परत ती संकलित करताना अडचणी आल्या आणि त्यातून स्रुजाशी दोस्ती झाली. मिपा बद्दल अजून जास्त आपुलकी निर्माण झाली. हीच दोस्ती नवीन सा सं शी होईल याची खात्री आहे. वेगवेगळे उपक्रम राबवल्याबद्दल जुन्याचे आभार आणि नवीन सदस्यांना हार्दिक शुभेच्छा!