ये,बैस ना जराशी,कर बात चांदण्याची
दररोज येत नाही ही रात चांदण्याची!
हिणवून काल मजला,गेलाय चंद्र रात्री
दे दाखवून त्याच्या औकात चांदण्याची!
कळतेय ना मलाही,होतो उशीर आहे
कवळून जा उराशी तादात चांदण्याची!
येतेस तू अताशा,स्वप्नात रोज माझ्या
स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची!
स्वप्नांत चांदण्याच्या,गेल्या कितीक राती
घेवून रात ये तू दारात चांदण्याची!
आलीस ना छतावर झटकून केस ओले?
शहरात होत आहे बरसात चांदण्याची!
—सत्यजित
वाह !
In reply to वाह ! by सस्नेह
धन्यवाद!
आवडली! सुरेख!
आहा!
क्या बात...! जबरीच.
तनू-तनू तहानली सहाण वाटते
In reply to तनू-तनू तहानली सहाण वाटते by एस
हुस्नेमतला!
In reply to हुस्नेमतला! by सत्यजित...
"सये तुझ्या तनूवरी उगाळ
चांदवा
+१११
अप्रतिम....
खूपच सुरेख
मस्तच. नेहमीप्रमाणे सुरेख.
In reply to मस्तच. नेहमीप्रमाणे सुरेख. by दुर्गविहारी
धन्यवाद!
अप्रतिम
अप्रतिम खरोखरच. फार आवडली.
छान...!
सुरेख!
शाली,प्राची,प्रचेतस,पद्मश्री
सत्यजित साहेब , आपल्या कविता
मस्तच !!!
सुरेख
मी सहसा या विभागात चक्कर मारत
फारच छान