रेखाटन

बाप ------- हवा आहे पण कशाला?

मी कोण's picture
मी कोण in जनातलं, मनातलं
10 Sep 2016 - 6:41 pm

खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!

धोरणमांडणीसमाजजीवनमानराजकारणरेखाटनप्रकटनविचारसमीक्षालेखबातमीअनुभवमतमाहितीमदत

आठवण

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जे न देखे रवी...
4 Aug 2016 - 3:59 pm

'काळोखाच्या वाटांमध्ये अंधार माझ्या सोबतीला,
पावसाळ्याच्या चिंब रात्रीमध्ये तुझ्या आठवणी माझ्या सोबतीला,
गेलेले क्षण साक्ष देतात आपल्या प्रितीची, त्या सोबत जागवलेल्या
दिर्घ रात्रीची, अबोला तुझा छळतो गं मला क्षणाक्षणाला, असा
कसा गं गुंतलो मी तुझ्यात झुगारुन सर्व बंधनांना, आज पाहिलं
डोळ्यात तुझ्या जुन्या जखमा ओल्या होतांना.....!

मुक्त कविताशृंगाररेखाटन

मनातले माझ्या

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जे न देखे रवी...
26 Jun 2016 - 10:58 pm

शांत थंड झुळूक आज खुणवते मजं नवं दिशा
मनाचे बांध तुटले अश्रृंचा पुर आला नेत्री
भान नव्हते जगाचे मन माझे गहिवरले
आयुष्याच्या कुठल्यातरी वाटेवर पुन्हा ते रेंगाळले
निशब्द मनातल्या वेदना अश्रृंनी व्यक्त होऊ
लागल्यात, आठवूनी आईची माया जाग्या झाल्या
आठवणी जुन्या भावनांच्या खोल डोहात तरंग उठले
कोणते नवे.......? अंधाराच्या मागे धावणारी मी
आज आशेचा किरण शोधु लागले.......

कविता माझीजीवनमानरेखाटन

मला त्या गावी जायचेय...

हृषिकेश पांडकर's picture
हृषिकेश पांडकर in जनातलं, मनातलं
13 Jun 2016 - 2:20 pm

शहराच्या मध्यात साठ कुटुंबांची एक चाळ असावी...
स्क्वेअर फुटाचा हिशोब नको, फक्त पाठ टेकवायला एक खोली असावी..
श्रीमंती घरात नसली तरी बेहत्तर, संपूर्ण चाळ मात्र गडगंज असावी..
महिना अखेरच्या पगाराची आस नसावी.. meeting, appraisal, onsiteचा गंध नसावा..
मला त्या गावी जायचेय...

रेखाटनविचार

खरे सुपरमॅन - आमचे आप्पा

स्वीट टॉकरीणबाई's picture
स्वीट टॉकरीणबाई in जनातलं, मनातलं
2 Jun 2016 - 2:13 pm

नुकतंच माझ्या सासर्‍यांनी (श्री. गजाननराव गोडबोले - आमचे आप्पा) पंचाण्णव्या वर्षात पदार्पण केलं. असं म्हणतात की आपल्याच माणसाचं चारचौघांसमोर कौतुक करू नये. पण त्यांच्यामध्ये इतकी सकारात्मकता आहे की ज्येष्ठच काय, तरुणांनीदेखील कित्ता गिरवावा अशी त्यांची विचारशैली. त्याबद्दल न लिहिणं हाच गुन्हा होईल.

त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या तारखा आणि तत्सम इतर पायर्‍या मी गाळूनच टाकते. मात्र ते आम्हाला सुपरमॅन का वाटतात तेच फक्त लिहिते.

समाजजीवनमानराहणीरेखाटनलेखअनुभव

स्वप्नातली शामली

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जे न देखे रवी...
1 Jun 2016 - 10:39 pm

तुझी आठवण आता येतच नाही ,
समजावलय मी या वेड्या मनाला.
पहिल्यांदा खुप त्रास झाला ग वेडे,
पण या काळजावर दगड ठेवला ..
तुझा तो हसरा चेहरा खरच खुप आवडत होता ग मला ,
मग का नकार दिलास तु या वेड्या जीवाला.
तुझ्या डोळ्यातील ती काजळ मला क्षणात घायाळ करायची सखे.
पण हळुहळु ती काजळ फिकी पडली.
आता तुला माझी नजर नाही शोधणार ..
कारण तुझे बिन काजळीचे डोळे मला नाही आवडणार.

तुझ्या विना खरचं मी काहीच नाही .
पण आता अस वाटतय मी एकटा आहे हेच बरं आहे.
तु माझी मी तुझा हे आता होणे अशक्यच आहे.

( स्वप्नातली शामली)

कविता माझीहिरवाईमांडणीकविताप्रेमकाव्यरेखाटन

चलती का नाम…पॉम पॉम

अश्विनी वैद्य's picture
अश्विनी वैद्य in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 3:45 am

"चला रे लवकर…अकरा वाजून गेलेत…बारा पर्यंत पोहोचायचंय ना…त्यात traffic असणार…म्हणजे अजून वेळ लागणार…आवरा आता…" नवऱ्याची ही नेहमीची घाई माझ्या अंगवळणी पडलेली. "अरे जेवायलाच जायचंय ना xxx च्या घरी… पोहोचलो १०-१५ मिनिटं उशीरा तर एवढं काय…मुलांचं आवरून निघेपर्यंत इतके तर वाजणारच ना…त्यात आज रविवार….सकाळी उठण्यापासून सगळ्यांचं सगळंच निवांत…आणि त्यांना पण कुकायला जरा वेळ मिळू दे की…" खांद्याला मोठी bag लटकवून लेकाला कडेवर घेवून पायात शूज अडकवत माझा जरा चिडकाच स्वर लागला.

रेखाटन

निशाण

म्हसोबा's picture
म्हसोबा in जे न देखे रवी...
29 May 2016 - 10:17 pm

तू मला हसायला शिकवलंस
कधी धड रडलोही नव्हतो त्या आधी मी
तू मला उभं राहायला शिकवलंस
कधी धड पडलोही नव्हतो त्या आधी मी

आठवांचा पूर येतो कधी
या एव्हढ्याशा दोन डोळ्यात माझ्या
कधी वाटते लोटली युगे आता
कधी वाटतात त्याच आठवणी ताज्या

तुझा हात सुटला तो क्षण
कोरला आहे मनावर लेण्यातील शिलालेखासारखा
त्याचीही पडझड होईल कधीतरी
याच आशेवर जगतोय आता मी चातकासारखा

मिटून जातील मग निशाण सारे
तू तर नाहीसच आता इथे, मी ही नसेन तेव्हा
काय होईल याची आता क्षिती कशाला
काळ आपल्या फटकार्‍याने सारे मिटेन हे जेव्हा

काहीच्या काही कवितारेखाटन