Skip to main content

आस्वाद

भविष्य (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी बुधवार, 03/09/2014 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
''गेली साडेचार वर्षं तुम्ही आमच्या वाहिनीवर साप्ताहिक भविष्य सांगितलेत. अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम होता- टीआरपी पण मस्तच ! पण म्हणतात ना , प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच. आता जरा चेंज पाहिजे असं ग्रोवरसाहेब. . आय मीन लोकं म्हणतायत.'' ''पण एव्हढं वर्षं पूर्ण झालं असतं तर . . . '' ''कसं आहे काका, मला पण असंच वाटतं, पण माझ्या हातात नाही हो ते! म्हणाल तर त्रिवेदीला सांगून आमच्याच समूहात हिंदी च्यानलवर प्रयत्न करूयात.'' ''नको. . . हिंदीत नको. '' ''मग वास्तुशास्त्र, अंकशास्त्र असं काही कराल ?'' ''छेछे , भलतंच काय?'' ''ठीकाय तुमची इच्छा!

माझ्या घरचा बाप्पा!

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 31/08/2014 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काहीजणांकडे बाप्पांना पुढच्या वर्षी यायचे निमंत्रण देऊन निरोपही दिला आहे. सगळी मंडळी मोदकांवर ताव मारून सुस्त झालेली असणार! गेल्या वर्षी आपण घरोघरच्या गणेशासाठीच्या सजावटी, मखरे यांच्या फोटोंची स्पर्धा आयोजित केली होती आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी मात्र छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त "महास्पर्धा" चालू असल्याने श्रीगणेश सजावटीची स्पर्धा रद्द करत आहोत. मात्र घरबसल्या सर्वांना इतर मिपाकरांच्या घरच्या गणपतीबाप्पाचे दर्शन व्हावे म्हणून हा धागा काढत आहोत.

गणपती पूजेच्या मागची अवधारणा

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 29/08/2014 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज गणेश चतुर्थी, आज बाप्पा आपल्या घरी येतात. १० दिवस आपण बाप्पाची पूजा अर्चना करतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करतो. आपण बाप्पाची पूजा का करतो या मागची अवधारणा काय? हा प्रश्न मनात येतोच.

वर्धमान ते महावीर - भाग 2

लेखक दशानन यांनी गुरुवार, 28/08/2014 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
तो काही न बोलता डोळे बंद करून पुन्हा ध्यानमग्न झाला. वृद्ध उठला, बाजूला असलेली आपली फांदीचा आधार घेत. नंतर फक्त सुक्या पाचोळ्याचा आवाज येत येत.. नाहीसा झाला आणि पुन्हा एकदा जंगलात निरव शांतता पसरली होती, ह्याच्या चेहऱ्यावर आता आधीपेक्षा जास्त नसले तरी, थोडे अधिक तेज आले होते.

वाचनीय 'सायकॅमोर रो'

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 28/08/2014 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच जॉन ग्रीशम यांची 'सायकॅमोर रो' ही कादंबरी वाचून संपवली. ही कादंबरी बहुधा २०१३ साली प्रकाशित झाली. मी एका-दोघांच्या हातात ही कादंबरी पाहिली होती. आधी याच लेखकाचं 'अ टाईम टू किल' वाचलं होतं. आवडलं होतं. 'किल' मध्ये अमेरिकेतल्या सुप्त वर्णभेदाचे दाहक चित्रण अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैलीत केले होते. कादंबरीचा नायक जेक ब्रिगेन्स हा एक तरुण वकील आहे. स्वतः गोरा असूनदेखील माणसांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद असता कामा नये हे त्याचे तत्व असते. त्याच्या फर्मचा दारुडा मालक वैयक्तिक आयुष्यात स्वच्छंदी असला तरी त्याला कृष्णवर्णींयांविषयी आपुलकी असते.

क्षमा

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 28/08/2014 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
“तू माझी क्षमा मागितली पाहिजेस”, ती म्हणाली. डोळ्यातले अश्रू लपवत तो “आय अ‍ॅम सॉरी” म्हणाला. “सॉरी नाही, क्षमा माग”, ती तिच्या शब्दावर ठाम होती. “मला क्षमा कर,” तो थरथरत्या आवाजात म्हणाला. “तूही क्षमा मागितली पाहिजेस”, शेजारच्या उदास स्त्रीकडे वळून ती त्याच स्वरांत उद्गारली. “मी तुझी क्षमा मागते,” म्हणताना त्या स्त्रीला हुंदका आवरता आला नाही. तिथे आता सुन्न शांतता होती. एकदाही मागे वळून न पाहता, अगदी सावकाश ती छोटी मुलगी खोलीच्या बाहेर गेली. “हं!

वर्धमान ते महावीर

लेखक दशानन यांनी मंगळवार, 26/08/2014 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
सुवर्णमयी पालखीतून मुलायम असा गौरवर्णीय हात बाहेर आला, व पालखी जागेवरच थांबली. पालखीतून तो खाली उतरला, नगर खूप मागे राहिले होते, समोर हिरवेगार जंगल दोन्ही हात पसरून जसे याच्या स्वागतासाठी उभे होते.. पश्चिमेला मावळत असलेल्या सूर्याला त्याने मनलावून नमस्कार केला व मागे वळून त्याच्या मागोमाग आलेल्या जनसमुदायाला देखील विनम्रपणे नमस्कार केला. आपल्या जन्मभूमीला वंदन केले आणि अंगावरील दागिने एक एक करून काढून बाजूच्या दगडावर ठेवले, शरीरावरील रेशमी, राजेसी वस्त्रे तेथेच त्याने काढून ठेवली. चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवताना सहजच हात कानापाशी थबकले...

सिग्नल - लघुकथा

लेखक विशाल चंदाले यांनी मंगळवार, 26/08/2014 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
सिग्नल पडला तशी त्याने बाईक झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबवली.त्याच्या मागोमाग एक दोन बाईक्स येउन झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडेच थांबल्या. पण 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' प्रमाणे जसं वेळ जात होता तसं येणारी वाहणं क्रॉसिंग पार करत होती. एका काकांनी त्याच्या उजव्या बाजूने जाऊन त्याच्या समोरच बाईक लावली.एक मुलगी, ती आली तिथून तिला उजवीकडे वळण शक्य नसल्याने डाव्याबाजूला वळून झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येउन थांबली. अस करत अर्धे अधिक लोक झेब्रा क्रॉसिंग वर आले. त्याच्या मनात विचारांनी गर्दी केली. ह्या लोकांना नियम पाळायला काय होतं?

मैत्रीण

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 26/08/2014 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
(पात्र: ताई: उमेश ची मोठी बहिण, उर्मी: उमेशची बायको, उमेश) उर्मी: वन्स, तुम्ही समजवा न उमेशला, तुमच ऐकेल तो. मी पुष्कळ प्रयत्न केला माझं ऐकतच नाही. एकच रट लाऊन बसला आहे, पहिले मुलगा पाहिजे, मुलीचं नंतर बघू. वन्स, लग्नानंतर पहिल्यांदा गर्भार राहिली आहे मी. पहिले मुलगी झाली तर काय झालं. मी त्याला म्हंटले, पुन्हा गर्भात मुलगी आली तर मी नाही म्हणणार नाही गर्भपाताला. भावाला बहिण पाहिजेच. मग बहिण मोठी असेल तर काय फरक पडतो. ताई: पुष्कळ फरक पडतो, तुला माहित आहे, बाबांनी माझ्यासाठी इंजिनिअर मुलगा बघितला. सालंकृत कन्यादान केल, सव्वा लाख हुंडा दिला वर २० तोळे सोन ही.

कष्ट होताती जीवासी (ज्ञानेश्वर)

लेखक शरद यांनी रविवार, 24/08/2014 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
कष्ट होताती जीवासी (ज्ञानेश्वर) संत साहित्याशी आवड तशी जरा लवकरच लागली म्हणावयास हरकत नाही. कॉलेजात असतांना एक मित्र गुणगुणत होता "उड उड रे काऊ. तुझे सोन्याने मढवीन पाऊ " मी खुश होऊन विचारले ’कोण कवी रे ?" तो म्हणाला "ज्ञानेश्वर" मी म्ह्टले " काय थापा मारतोस ! संत असे कधी लिहितील काय ?" तो म्हणाला, "खरेच ". मी लायब्ररीत जाऊन कविता (हो, कविताच, अभंग नाही ) शोधून काढली व असा प्रथम वाचनातच प्रेमात पडलो. तो पर्यंत वसंत बापट. मंगेश व विंदा, बोरकर यांच्याबरोबर म.वा. धोंड (मराथी लावंणी) हेच आमच्या वाचनात व पाठांतरात होते.