विचार
बिनपाण्याची.......
प्रेषक, केदारविदिवेकर, Sat, 23/03/2013 - 14:08बिनपाण्याची होळी कशी खेळायची हो ?... कितीही काही झालं तरी पाणी लागणारच की !! मग एवढा गवगवा कशाला ?
आधी कृतीत उतरवून दाखवा म्हणावं.. आले आहेत मोठे म्हणे 'waterless होळी'....बोळक्याचं ते नुसतं.. उचलली जीभ अन लावली टाळूला...त्या बापूला रोखून दाखवा आधी !! आहे का दमडीची हिम्मत आपल्यात ?..... अहो असेलही.. पण इथे वेळ का काय म्हणतात तो नाहीये कोणाला, असूनही वेळ नाही बिझी आहे, वेळच मिळत नाही अशी उत्तर आजकालच्या पिढीची... 'आपण भलं आपला काम बरं', बाकी गेले तेल लावत....
कसं सावरणार आपण यातून ? हा एक यक्ष प्रश्न आहे आपल्या समोर आज !!
लहान मुलांच्या बाबतीत
प्रेषक, नर्मदेतला गोटा, Fri, 22/03/2013 - 14:11लहान मूल गाढ झोपलय. कविला वाटतं त्याच्या झोपेत अजिबात व्यत्यय येऊ नये.
म्हणून तो कुणाकुणाला काय काय सांगतो पहा.
चंद्राला म्हणतो,
नकोस चंद्रा येऊ पुढती, थांब जरासा क्षितिजावरती
चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू
किंवा
यक्ष-पर्यांनो स्वप्नीं नाचून नीज नका चाळवू
म्हणजे अगदी स्वप्नात जाऊन सुद्धा कुणी त्याची झोपमोड करू नये.
किती खोलवर विचार केलाय कविने.
लहान मुलांची काळजी घेताना इतका खोलवर विचार व्हायला हवा.
पण उदाहरणे मात्र उलट दिसतात.
याला न्याय कसं म्हणायचं
प्रेषक, रामबाण, Thu, 21/03/2013 - 11:58१२ मार्च १९९३ ला मुंबईत झालेल्या साखळी बाँब स्फोट खटल्याचा आता सर्वोच्च न्यायालयात निकाल देणं सुरु आहे.
तसा हा देशावरचा पहिला आणि सर्वात मोठा अतिरेकी हल्ला, २५७ लोकांचा जीव घेऊन गेला.
दाऊद, टायगर वगैरे मुख्य आरोपी पाकिस्तानात सुखरुप आहेत. बाकींच्यांना घेऊन २० वर्ष उलटली तरी खटला सुरुच आहे. बहुतांश पब्लिकला संजुबाबाचं काय होणार याचीच उत्सुकता आहे.
आता २० वषांनंतर काहीही निकाल लागला तरी, जे गेले त्यांना... ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले त्यांना... जे जखमी झाले त्यांना... ज्यांचं सगळं आयुष्यंच बदलून गेलं त्यांना.. न्याय वगैरे मिळाला असं कसं म्हणता येईल?
कॉर्पोरेटिझम, समाज आणि संशोधन
प्रेषक, नगरीनिरंजन, Wed, 20/03/2013 - 13:44काक मृत्यू
प्रेषक, मेघनाद, Wed, 20/03/2013 - 13:30एक कावळा मुंबईच्या सकाळच्या सुंदर कोमल वातावरणात आकाशात घिरट्या घालत होता. आपल्या मित्र परिवारात विहार करत असताना तो खाली उजाडत असलेल्या मुंबई नगरीचे दृश्य देखील पाहत होता.
काहीवेळात तो आणि त्याचे काही मित्र उडत उडत भायखळा रेल्वे स्थानक परिसरात आले. तिथे येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्या, त्यातून उतरणारी ठीगभर माणसे, बायका, पोर. उतरल्यावर त्यांची जिना गाठण्यासाठी होणारी धावपळ हे सर्व तो कावळा रेल्वेच्या विद्युत पुरवठा तारेवर बसून पाहत होता, आणि अचानक काही कारणास्तव त्याच्या पंखांना तारेतील विजेचा जोरदार झटका बसला तसा तो खाडकन भानावर आला आणि दुसऱ्या क्षणी जमिनीवर देखिल.
जिकड खोबर, तिकड चांऽऽगभल!!!
प्रेषक, साऊ, Wed, 20/03/2013 - 04:41प्रश्न?
प्रेषक, भावना कल्लोळ, Mon, 18/03/2013 - 15:28खुप दिवसाने आज आरशात स्वतःला न्याहाळले.चेहरावरच्या सुरकुत्या खुप काही सांगून गेल्या. संसारात रमताना विसरलेल्या आठवणी जागवून गेल्या. डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळात माझे मी पण दडपले होत. ते शोधताना डोळ्यातुन एक स्वप्न पटकन निसटून गेल होत. नात्याची अनेक रूपे जगताना स्वताला कधी जगले ते आठ्वु लागले. दाट काळ्या मोकळ्या केसातुन तो एक केस पांढरा स्वतःची अनुभूती करवून देऊ लागला. भरलेल्या घरात असुनही का हि एकटेपणाची सल जाणवली. डोळ्यात हजारो स्वप्न असताना शून्यात गेलेली ती नजर आठवली. कधी घेतला होता मी मोकळा श्वास, कधी स्वताला शोधण्याचा हा केविलवाणा ध्यास. आहे सर्वाची मी, पण माझे असे कोण?
मोजमापं आणि त्रुटी - २
प्रेषक, राजेश घासकडवी, Mon, 18/03/2013 - 00:46या लेखाचा दुसरा भाग मला चौदा मार्चला, म्हणजे पाय दिनाला प्रसिद्ध करायचा होता. इतर कामांत गुंतलेलो असल्यामुळे थोडा उशीर झाला. आता तुम्ही म्हणाल की या मोजमापांचा आणि 'पाय' चा काय संबंध? उत्तर सोपं आहे. गेल्या लेखात मी तीन आकृती दिल्या होत्या. त्यांच्यातल्या सरळ रेषेची लांबी आणि वक्राकाराची लांबी यांचं गुणोत्तर काढायला सांगितलं होतं. या गुणोत्तरातून पाय ची किंमतच अप्रत्यक्षपणे मोजली जात होती. कशी ते सांगतो.
हिंदु नावाचा धर्मच नाही....
प्रेषक, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, Sun, 17/03/2013 - 11:21हिंदु नावाचा धर्मच नाही अशा बातमीनं कालपासून अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. देवस्थान आपल्या उत्त्पन्नातील काही भाग धार्मिक कार्यासाठी वापरत असतील तर त्यास आयकरातून सुट मिळू शकत नाही, असे लवादाने मत मांडले आहे. लवाद पुढे असेही म्हणते की, '' हिंदुत्व हा धर्म किंवा समाज कधीही नव्हता. हिंदुत्व ही केवळ एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली मानणारे अनेक समूह आहेत. ते वेगवेगळ्या देवदेवतांना पुजतात. इतकेच नव्हे तर, ही जीवनशैली अंगिकारणार्यांना देवाची पूजा करण्याची कोणतीही सक्ती नसते.