||कोहम्|| भाग 4
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about ||कोहम्|| भाग 4
- 19 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
कोहम्
भाग 4
जर आपल्याकडे आज (किंवा भविष्यात) टाइम मशीन असेल आणि त्यात बसून जर आपण लाखभर वर्षांपूर्वीच्या पूर्व आफ्रिकेत गेलो तर आपल्याला आपल्यासारख्या दिसणाऱ्या मानवांचे अनेक समूह दिसतील, लहान लहान मुलं आईच्या कडेवर बसलेली असतील, काही मागे फिरत असतील, पुरुष शेकोटीभोवती किंवा नुकत्याच मारलेल्या शिकारीभोवती बसून तिचे वाटे करत असतील, काही तरुण तरुणी स्वतःत मश्गुल असतील तर काही वृद्ध शांतपणे हे सगळं बघत, आपलं दुखर शरीर घेऊन बाजूला बसले असतील..
पण मग अगदी असंच चित्र तुम्हांला लांडग्यांच्या, म्हशींच्या, हत्तीच्या आणि माकडांच्या कळपातही दिसेल.
