मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम कविता

मानव प्रगल्भ अनसुय कधीच होणार नाही ?

माहितगार ·

कल्पनेची भरारी उत्तुंग आहे पण वास्तव काही वेगळेच आहे. एखादी स्थितप्रज्ञ व्यक्तीच आपल्या जोडीदारावर विनाअट किंवा निरपेक्ष प्रेम करु शकेल. पण मग तसे प्रेम ती व्यक्ती जगातल्या सर्व प्राणीमत्रांवर करत असेल. उदा. मजनू जर लैलाला म्हणाला "माई तुझ्यात मला आई भवानीचा भास होतो" तर ते लैला ला कितपत आवडेल? किंवा लोक जेव्हा मजनूला दगडांनी मारायला लागतात तेव्हा लैला जर म्हणाली "अरे पामरांनो तुम्ही ज्याला दगड मारत आहात ते केवळ एक शरीर आहे, ज्या आत्म्यावर मी प्रेम केले तो नश्वर आहे, अमर आहे" तर त्या वेळी मजनू तिच्या कडे मोठ्या कौतुकाने पाहिल का? तातपर्य काय तर भौतिक जगात राहून आपल्या जोडीदारावर निरपेक्ष प्रेम करण्याचा दावा करणारे गणपत वाणी सुर्यावर बसून देखिल बीडी ओढू शकतात. पैजारबुवा,

खिलजि 02/03/2020 - 14:48
मागा काका , पैंबुकाका म्हणतात त्याप्रमाणे कल्पना खरंच उत्तुंग हाय .. पण इथे विशेष भाव खाऊन गेलय त्ये म्हणजे आपल्या पैंबुकाकांचं ईशलेषण .. लाई आवडलं गेलंय.. ह्ही ह्ही ह्ही ह्ही

"असुं"या च्या जिद्दीने व्यवहार सिद्ध होतो असूया घर करते सुंदर सत्यास कडवट मानत खुले विनाअट प्रेम पारखे होते कल्पना आणि विचार करा.. एकपत्नी व्रताचे बंधन तोडून राधेकडे पाहिल्या बद्दल .. सीता रामाची अग्नी परीक्षा घेते रेणुका जमदग्नीचा प्राण मागते अहल्या गौतमास पत्थर होण्याचा शाप देते एखादा टिम मेंबर दुसर्‍या टिम मधून प्रेमाने खेळता पझेसिव्ह असुरक्षीत खोलवर जखमा ऐकलेत कधी? ऑनर पनिशमेंट्स ऑनर किलींग्स असूयेने पछाडलेली व्यवहार पूर्णत्वास नेऊनही प्राकृतिक प्रेमाचा निषेध करणारी अप्राकृतिक बंधने अटळच असावित का ?

ग चांदण्यांनो

चांदणे संदीप ·

श्वेता२४ 24/02/2020 - 12:20
जा, जा ग चांदण्यांनो जा करा काम थोडे माझ्या साऱ्या कवितांचे पाडा तिच्यापाशी सडे अप्रतिम शेवट.....

खिलजि 24/02/2020 - 15:11
पैंबू काकांना पूर्ण अनुमोदन .. सँडी भौ पुष्कळ दिवसांनी उगवलेले हैत .......

नका ग चांदण्यांनो नका येऊ खिडकीत तिच्या मनाचा ठाव सांगा येऊन पडवीत सांगा तिच्या गाण्यात का, आहे नाव माझे? माझ्याविन विरहाचे का, सोसते ती ओझे? ठावे तिलाही आहे का, रात्री कवितांचे येती जथ्थे, जाती स्वप्न गाऊन उद्याचे? आतूर प्रीत आत रोज झुरते उरात सांगा तिला हे सारे चमचमत्या सुरात तिचे चालणे बोलणे भास होऊन छळते लय श्वासांची तेव्हा आठवांशी अडखळते सारे आठव आठव युगांच्या जणू फेऱ्या रेखू पाहती नशीबाला तळहातावर कोऱ्या पसा पसा सुखाचा तिला देईन मोजून बघा चांदणझुल्याचे झोके रितेच अजून जा, जा ग चांदण्यांनो जा करा काम थोडे माझ्या साऱ्या कवितांचे पाडा तिच्यापाशी सडे - संदीप चांदणे (२४/०२/२०१९)

एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे.

माहितगार ·

खिलजि 19/02/2020 - 16:50
================== राधेचा कृष्ण कि कृष्णाची राधा खरंच हे प्रेम कि गेमाची बाधा कलियुगात बहू भेटती कृष्ण सबला नारी व्यभिचाराने जीर्ण कळी उमलता खुडण्यात येते भुलवून तिजला भासवुनी कृष्ण कृष्ण थोर कि थोर त्या लीला आजही दुभंगती अबला राधा अलगद त्यांचे यौवन शोषूनी कृष्ण राहतो नामानिराळा राधा साजरी परी गोजिरी कुटुंबा कृष्णकृत्य जे कलियुगी , कृष्ण वेगळा तो कृष्ण वेगळा =================================

कविता आवडली पण पटली नाही विशेषतः ज्या कृष्णांना राधा असतात आणि ज्या राधांना कृष्ण असतात त्यांचे मनोमन कौतुक करावे हे अजिबात पटले नाही. पैजारबुवा,

ज्या कृष्णांना राधा नसतात आणि ज्या राधांना कृष्ण नसतात त्यांनी काय करावे ? ज्या कृष्णांना राधा असतात आणि ज्या राधांना कृष्ण असतात त्यांचे मनोमन कौतुक करावे त्यांच्या प्रेमाच्या पावित्र्याचा आदर करावा किमान राधेच्या चारित्र्याचे उगाचच जज बनू नये. ज्या कृष्णास राधा भेटत नाही ज्या राधेस कृष्ण भेटत नाही त्यांनी काय करावे? न मिळालेल्या जोडीदाराच्या निवड स्वातंत्र्याचे कौतुक करावे किमान न मिळालेल्या जोडीदाराच्या जोडीदाराची इर्षा करु नये.

एका उदास संध्याकाळी

पाषाणभेद ·
एका उदास संध्याकाळी कोणी गात होती विराणी || शब्दांत अशी आस नव्हती चाल नव्हती अशी कोणती धारही नव्हती त्या शब्दांना तरी काळीज जाय चिरूनी || संधीप्रकाश निळा जांभळा खालून गेला वर आभाळा कुंद हवा अन वारा पडला हवेत सूर राही भरूनी || धिरगंभीर सूर कवळूनी गीत हृदयीचे आळवूनी उलगडे आर्त सरगम भरूनी राहिली कानी || - पाषाणभेद ०५/०२/२०२०

वणवा

चांदणशेला ·
गाव माझं सारं पेटलं फुलांचं रान होरपळून गेलं कुणी घातला हा विषारी विळखा सोडूनी गेला कुठे दूर सखा पापण्यांकाठी दु:ख ओलं थरथरलं सुना झाला हा हिरवा मळा जाळला कुणी माझा सुर्य कोवळा डोळ्यांत आभाळ निळं गहिवरलं केला तुझ्यासाठी प्राणाचा आडोसा उरात भडकलेला वणवा विझवू कसा देहात साऱ्या आठवणींचं जहर पांगलं

चांदणं चाहूल

चांदणशेला ·
सांगू कशी मी खुळी प्रीत मोडू कशी उभ्या जगाची रीत तुझ्या वाटेवर धावते ही नजर येशील का शोधीत माझे घर अनोळखी सुरांचे उमलून आले गीत लागली तुझीच रे काळीजओढ ह्रदयाला झाला वेदनेचा स्पर्श गोड चंद्रसावल्यांनी मोहरली काळोख्या मिठीत रात हळूच आली तुझी चांदण चाहूल स्वप्नातल्या पाखराची पडली वेडी भूल दडवू कसे हसऱ्या ओठांतले गुपित

माहेर, सासर

पाषाणभेद ·
माहेर, सासर नदीच्या त्या किनारी साजण माझा उभा कधीचा वाट बघतो माझी जीवाचा तो सखा अल्याड गाव माझे त्यात मी राहिले पल्याड त्याचे गाव कधी नाही पाहिले चिरेबंदी साचा भक्कम असे माझे घर नाही दिसत येथून घर त्याचे आहे दूर मनात त्याची सय मध्येच जेव्हा येते त्याचाकडची वाट नजरेला खुणावते मनी लागली हुरहुर कसे असेल सासर कसे का असेना मी शेवटी सोडेन माहेर - पाषाणभेद ०८/१२/२०१९

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर

पाषाणभेद ·

खिलजि 11/12/2019 - 18:15
पाभे हि दुसऱ्या वळणाची वाटतेय .. बरोबर ना .. मी तरी तशीच वाचलीय.. शेमटूशेम जुळतेय .. ओळ अन अर्थही

In reply to by खिलजि

पाषाणभेद 11/12/2019 - 18:50
याला काय अर्थ ये राव? म्हंजे पेशंट रिकव्हर होतो आहे. चांगला उड्या मारून पलंगाची कुरकुर ऐकायला डॉक्टरला बोलावतो आहे. लॅब टेस्ट न करता आपल्या शरीराची नासाडी अन पैसे वाचवायचं बघत आहे तर तुम्हाला दुसरंच सुचतंय. हे म्हंजे आम्ही कान्हेगावला जायचं म्हणतो अन तुम्ही कोपरगावच्या गाडीत बशवीता व्हय. याला काय अर्थ ये राव?

खिलजि 11/12/2019 - 18:53
या पलंगावरच्या उद्यानींच तर गुदगुल्या केल्या , कविता वाचताना ...

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर अहो डॉक्टर काढा की माझे वेंटीलेटर मला काही झाले नाही बघा मी लिहीन सुद्धा लव लेटर (कोरस: हिला द्या हो डिसचार्ज लेटर) न मी आजारी न मी बेचैन डोकेदुखी नाही मला न तापाची कणकण पण मग का देता मला तुम्ही इंजेक्शन? काढा की माझे वेंटीलेटर थोडे औषध मी घेते थोडे तुम्हीपण घ्या ना माझ्या हृदयाची धडधड कान देवून ऐकाना सलाईन ऑक्सीजन दुर करा अन घ्या माझे टेंपरेचर काढा की माझे वेंटीलेटर इसीजी नका करू तुम्ही पल्सही नका पाहू कोणी लॅब टेस्ट नका सांगू, बंद करा तो समोरचा मॉनिटर काढा की माझे वेंटीलेटर पलंगावर स्पेशल रूमच्या, मी आहे झोपलेले काळजी घेण्या

कव्वाली: तुला पाहिले की

पाषाणभेद ·
कव्वाली: तुला पाहिले की किती तुझी आठवण यावी किती मी तुझ्यासाठी झुरावे काही बंधन नाही त्याला तुझ्यासाठी मी मरावे दुर जरी असशील तू माझ्या मनाला तू ओढून नेते पण तुला पाहिले की काळजात धकधक होते किती तू वार केले माझ्या हृदयावर खोल जखमा वरून केल्या त्यावर नाही कधी जरी रक्ताचा थेंब त्यातून वाहीला तुझ्या नजरेचा बाण तेथे गुंतून राहिला त्या कत्तलीने मी कसा मेलो ते माझे मला ठावूक पाहिले एकवार तू अन मी जळून गेलो खाक नको आता तरी तू वेळ लावू पुन्हा सामोरी ये ग ये तुला पाहिले की काळजात धकधक होते सागरामध्ये असते पाणी, पाण्याचीच वाहते नदी मी तुझाच आहे अन तुझ्याविना राहिलो का कधी? तुझा चेहेरा समोर जेव्हा जे

ती सर ओघळता..

आनंदमयी ·

राघव 03/12/2019 - 07:19
ती सरीसारखी चंचल आर्त प्रवाही तिज धरू पाहता मीच दिवाणा ठरतो मस्त! चांगली रचना. गीत म्हणणं जास्त योग्य आहे. कुणी चाल लावली तर आणिक छान वाटेल. अवांतर : दिवाणा या शब्दाला चपखल मराठी प्रतिशब्द काय असावा बरे?

ती सर ओघळता सोबतीस मी झरतो तो मेघ झुरावा तैसा मीही झुरतो आपुलेच काही तुटुन ओघळून जावे खेदात तशा मी कणा कणाने विरतो... ती सर ओघळता विझती स्वप्नदिवेही अन दिवसासंगे विझून जातो मीही अन लख्ख काजळी गगनी दाटून येता मी आशेचे कण शोधित भिरभिर फिरतो ती ओघळता मी सुना एकटा पक्षी पंखांच्या जागी असाह्यतेची नक्षी शेवटास मीही काव्यपंख लेवून आठवांभोवती तिच्या नित्य भिरभिरतो ती सर ओघळता उरे न काही बाकी सहवास सरे अन अंती मी एकाकी ती सरीसारखी चंचल आर्त प्रवाही तिज धरू पाहता मीच दिवाणा ठरतो ©अदिती जोशी