तिथे कोणी नि:शब्द
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about तिथे कोणी नि:शब्द
- Log in or register to post comments
नव्या अंतरिक्षी पुन्हा प्राणपक्षी
जसा झेप घेण्यास सरसावतो...
....खगोलातल्या अद्भुताच्या स्वरांनी
चिदाकाश व्यापून झंकारतो
...स्थलाच्या त्रिमितीत कालाक्ष थोडा
उगा विरघळावा तसा भासतो
.....जिथे चुंबिते पाणरेषेस व्योम
तिथे कोणी नि:शब्द झंकारतो