लुटा 'लुत्फ' उर्दू गज़ल-अशयारांचा!
एका ’इजिप्शियन’ सभासदाने मला अशी सूचना केली कीं मी दर वेळेला नवीन ’धागा’ सुरु न करता एकच धागा सुरू ठेवावा व तिथेच नवीन-नवीन गझला, शेर (खरं तर शेरचे वचन आहे 'अशयार') यांची वेळो-वेळी भर घालत जावे व तिथेच प्रतिसाद येऊ द्यावेत. यामुळे वाचकांना एकच धाग्यामागे जाणे सोपे पडेल व आपोआप चांगल्या शेरांचे एक झकास संकलनही होईल. ही कल्पना मला आवडली व आता हा धागा लोकांना आवडेल तितके दिवस किंवा याहून जास्त चांगली व्यवहार्य कल्पना सुचेपर्यंत चालू राहील. एकच उणी गोष्ट आहे की हा धागा 'ब्रॉडवे'सारखा लांsssब होईल. बघू कसे जमते ते!
सुरुवात करतो माझ्या सर्वात आवडत्या शाईरा मरहूम परवीन शाकीर या उर्दू कवियित्री पासून. कलेला सीमेचे बंधन नसते असे म्हटले जाते. जरी या विधानाशी मी १०० टक्के सहमत नसलो तरी एक अपवाद म्हणून मला त्यांचे शेर त्या पाकिस्तानी असूनही आवडतात. MA in English Literature अशा उच्चशिक्षित असलेल्या परवीनबाई पाकिस्तानी सरकारात सनदी नोकर होत्या.
त्यांचा पहिलाच काव्य संग्रह त्यांच्या वयाच्या २४ वर्षी प्रसिद्ध झाला व त्यावर रसिकांच्या उड्या पडल्या. त्यानंतर त्यांचे अनेक इतर काव्य संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना पाकिस्तानी राष्ट्रपतीकडून Pride of performance हे उच्च सन्माननिदर्शक पदक मिळाले आहे. केवळ ४२ वर्षाच्या असताना कामावर जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाला व त्यात त्या निधन पावल्या. नाहीं तर त्याना आता मिळाला आहे त्याहून खूप जास्त मान-मरातब नक्कीच मिळाला असता. मला त्यांचे शेर खूप आवडतात, पण उर्दू लिपी अद्याप येत नसल्याने आतापर्यंत त्यांचे फुटकळ देवनागरीत वाचायला मिळालेले शेर वाचूनच मी "दुधाची तहान ताकावर" भागवली आहे.
प्रणय-भावनांवर आधारित त्यांचे शेर जास्त करून शोकभावनेचे, प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमभंगावर, ताटातुटीवर आधालेले असून फारच हृदयस्पर्शी आहेत. खाली दिलेले दोदिलेलेत्यांचे सर्वोत्तम शेर नाहींत पण छान आहेत.
आपल्या प्रियकराबद्दल बाई म्हणतात.....
हल हो गया है खूनमें कुछ ऐसे (हल होना=मिसळून जाणे, dissolved)
रग-रगमें वो नाम बह रहा है|
आणि या दुसर्या शेरात त्या म्हणतात की माझा प्रियकर कितीही निष्ठाहीन असो, कुठेही जावो, पण तो परत माझ्याकडे येतो ही त्याची चांगली गोष्ट आहे!
वो कहीं भी गया, लौटा तो मेरे पास आया
बस यही बात है अच्छी, मेरे हरजाई की| (हरजाई=निष्ठाहीन)
एक विनोदी शेर शेवटी देऊन आजची पोस्ट संपवतो
'दाग़' नावाचा शायर म्हणतो कीं....
जिसमें लाखों बरसकी हूरें हो (हूर=अप्सरा)
ऐसी जन्नतको क्या करें कोई? (जन्नत=स्वर्ग)
असो. आरामात बसा आणि मजा लुटा.
सुधीर

अमा सुधीरमियाँ क्या खूब फरमाया!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
इर्शाद!
या धाग्याची आतुरतेने वाट पहात होतो. आता ब्रॉडवे झालाच पाहिजे!
शेर आवडले.
वो कहीं भी गया, लौटा तो मेरे पास आया
बस यही बात है अच्छी, मेरे हरजाई की|
यावरून पीनाझ मसानी यांनी गायलेल्या गझलेतील शेर आठवले(शायर आता आठवत नाही)
कहां थे रातको? हमसे जरा निगाह मिले
तलाश में हो के झुठा कोई गवाह मिले
असा मतला असलेल्या या गझलेचा एक शेर याच अर्थाचा होता.
असो.
काळेसाहेबांची परवानगी असेल तर मीसुद्धा काही चीजा दाखवेन म्हणतो. :>
"Great Power Comes With Great Responsibilities"
"Great Power Comes With Great Responsibilities"
माझी कशाला हरकत असेल?
माझी कशाला हरकत असेल?
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
वा भाऊ!
वा भाऊ. भन्नाट धागा बनताना दिसतो.
पण अशे रसीक लोक आहेत का इथे?
ते.रा.
धन्यवाद
..काळेसाहेब! (मला वाटले तुम्ही इथे तुमचा संग्रह खुला करताय, तर आपण विनापरवानगी लुडबूड का करावी.. म्हणून विचारले.)
असो.
असेच एकदा कुठेतरी ऐकलेले शेर. दंगलीवर काही भाष्य करू पाहणारे!
"घर मेरा जलता रहा जंगलकी तरह..
लोग देखा किये बारूदके बादल की तरह!"
एखाद्या वणव्याप्रमाणे (त्या दंगलीत) माझे घर जळत राहिले.. आणि लोक मात्र त्याच्याकडे शोभेच्या दारूची आतषबाजी पहावी, तशा निर्वीकारपणे बघत होते.
"क्या मिला उनको सुलगती हुई रातोंके सिवा,
जिंदगीभर जो फरोजां रहे मशअल की तरह..!"
जे लोक आपल्या आयुष्यभर एखाद्या मशालीप्रमाणे प्रदीप्त राहिले, त्यांना आपल्या आयुष्याच्या शेवटी एकाकी जाळणार्या रात्रीशिवाय काय बरे मिळाले.
"एक सी धूप है काबे से सनमखाने तक,
काश मिलता कोई साया तेरे आंचल की तरह!"
मंदिरापासून मशिदीपर्यंत एकच एक उन्हाची रखरख/काहिली जाणवते आहे. अशा वेळी..
काश मिलता कोई साया तेरे आंचल की तरह! आह! कसा अनुवाद करणार या ओळीचा!
"Great Power Comes With Great Responsibilities"
"Great Power Comes With Great Responsibilities"
"काबे से सनमखाने"वाला भिडला!
तीन्ही शेर आवडले. तरउतामा (terutama-खास करून) "काबे से सनमखाने"वाला!
[भाषा इंडोनेशियात उतामा (उत्तम) वरून तरउतामा (सर्वोत्तम, खास करून) असा शब्द आहे!]
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
फार छान
चांगला लेख, सर्वच शेर आवडले.
धाग्याची कल्पना चांगली वाटतेय. एकंदरीत आपला उर्दु साहित्याचा दांडगा अभ्यास दिसतोय.
नंदू
धागा आवडला
अजून उत्तमोत्तम शेर - शायरीची वाट बघतोय !
धन्यवाद सुधीरकाका आणि ज्ञानेश.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
माझ्याकडून एक
वर्ना क्या था सिर्फ तरतीब ए अनासिर के सिवा (तरतीब ए अनासिर: पंच महाभूतांचा समुच्चय)
खास कुछ बेताबीआँका नाम इंसान हो गया
याचा अर्थ असा की :
या दुनियेमध्ये किड्या मुंग्यांसारखे अनेक प्राणी आहेत. त्यांमध्ये व मानवात फरक तो काय?
फरक असा आहे की :
आपल्या व्यथांच्या सौंदर्यावर मुग्ध होण्याचे सामर्थ्य ज्या प्राण्यामध्ये आहे, त्याला मानव असे म्हणतात.
(खास कुछ बेताबीआँका नाम इंसान हो गया)
नितीन
नितीन
लगे रहो ....
बहोत खूब ...मजा आया !!
लगे रहो ..
मिलनेका वादा तो उनके मूंहसे निकलही गया ..
पूछीं जो जगह मैंने , हंसके कहेने लगे..ख्वाबमें ..
कळस !!
कळस
----------------------------------------------
पूर्वी लोकांवर प्रेम केले जायचे , वस्तु वापरल्या जायच्या ..
आता वस्तुंवर प्रेम केले जाते , लोक वापरले जातात ...
सुरेख
सुरेख! मस्त!!
पोरी पोरांना अशीच 'शेंडी' लावतात, नाहीं का?
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
काळे साहेब
काळे साहेब अश्या धाग्याची संकल्पना खरच छान आहे.
आवडलं...
होउन जाउदे शेरो शायरी..
जगजीत प्रेमी
---------------
धनंजय बोरगांवकर
परवीन शाकीरचे दोन नवीन शेर
परवीन शाकीरचे हे दोन शेर वाचा:
उंगलियोंको तराश दूँ फिरभी (तराशना=तासणे)
आदतसे उसका नाम लिख्खेंगी
माझा (दुरावलेला) प्रियकर माझ्यात इतका भिनलेला आहे, कीं मी जरी माझी बोटें तासली तरी संवयीने ती (बोटें) त्याचेच नाव लिहीत रहातील
जुस्तजू खोये हुओंकी उम्रभर करते रहे (जुस्तजू=शोध)
चॉंदके हमराह हम, हर शब सफर करते रहे (हमराह=सहप्रवासी, शब=रात्र)
याचा अर्थ सरळ आहे! प्रियकराच्या आठवणींत तिला रात्र-रात्र झोप लागली नाहीं, "वो रातभर करवटे बदलते रहे"|
सुप्रसिद्ध अभिनेत्री मरहूम मीनाकुमारी 'गझला' लिहीत असत. त्यातली ही गझल माझ्या आवडीची आहे.
मौतही इन्सानका दुष्मन नहीं
जिन्दगीभी अक्सर जान ले जाती है!
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
अतिसुंदर
मौतही इन्सानका दुष्मन नहीं
जिन्दगीभी अक्सर जान ले जाती है!
क्या बात हैं...
नंदू
झक्कास
व्व्व्वा !!
मिपावर का कुठेतरी वाचला होता हा..
लोग काटोंकी बाते करतें है !
हमने तो फुलोंसे जख्म खायें है !!
अर्थ सोपा आणि बर्याचश्यांनी अनुभवलेला असल्याने अधिक स्पष्टीकरणाची गरज नसावी
बाकी धागा झक्कासच..
लोग काटोंकी ..
लोग काटोंकी .. हा जो शेर आहे, त्यावरच शांताबाईंनी
"काटा रुते कुणाला .. आक्रंददात कोणी,
मज फूल ही रुतावे, हा दैवयोग आहे"
हे लिहिलं.
बुवांनी (पं. जितेंद्र अभिषेकी) ते अजरामर केलं.
कृपया शायर/शाइराचे नाव लिहावे
सर्व शेर चढविणार्यांना:
जिथे शक्य असेल तिथे कृपया शायर/शाइराचे नाव लिहावे.
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
जिस्म!
'जिस्म' या जॉन- बिपाशाच्या (वेगळ्या कारणांनी!
) गाजलेल्या चित्रपटातली ही लक्षात राहिलेली शायरी-
"गर्मी-ए हसरते- नाकाम से जल जाते है,
हम चिरागों ही तरह शाम से जल जाते है!"
(दिवसभरातल्या) अपूर्ण असलेल्या इच्छा/आकांक्षांच्या धगीने माझे मन पोळले जाते, ज्याप्रमाणे संध्याकाळ झाल्यावर दिवे जळू लागतात, अगदी तसेच!
"शमा जिस आग में जलती है नुमाईश के लिये,
हम उसी आग में गुमनाम से जल जाते है!"
शमा (ज्योत) प्रसिद्धीसाठी ज्या आगीत जळते (म्हणजे ज्या आगीत जळाल्यावर तिला प्रसिद्धी मिळते), अगदी तशाच आगीत मीदेखील जळतो/ते.. पण माझी कुणी दखल घेत नाही.
"जब भी आता है मेरा नाम तुम्हारे नाम के साथ,
जाने क्यों लोग मेरे नाम से जल जाते है..!"
अर्थ स्पष्ट आहे!
"Great Power Comes With Great Responsibilities"
"Great Power Comes With Great Responsibilities"
तिसरा मस्त
तिसरा शेर मस्त आहे. आवडला.
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
सर्वसमावेशक सर्वकालीन सत्य ...
सर्वसमावेशक सर्वकालीन सत्य ...
शायर फक्त कभि कभि म्हणतोय , पण ज्याने त्याने स्वतःच खोलवर जाऊन विचार करावा ...
कभि कभि हमनें अपनेको बहलाया हैं
जिन बातोंको खुद नहीं समझें, औरोंको समझाया हैं...
दुनिया ह्यामुळेच तर चालली आहे.जो तो दुसर्याला ज्ञान शिकवित असतो ...माध्यम काहीही असेल.नाव काहीही असेल..
कोणी आत्मचरीत्र लिहिल, कोणी ब्लॉग तर कोणी धागा चालवेल..तर कोणी प्रतिक्रिया देईल..कोणी फुकटचे सल्ले देईल.दुसर्याला शिकवण्यात धन्यता वाटत असते ...
नाहीतरी मी आता काय करतोय ?
कळस !!
कळस
----------------------------------------------
पूर्वी लोकांवर प्रेम केले जायचे , वस्तु वापरल्या जायच्या ..
आता वस्तुंवर प्रेम केले जाते , लोक वापरले जातात ...
किती खरं
किती खरं आहे!
परवीन शाकीरच्या कांहींशा गंभीर शेरांनंतर आज एक गमतीदार शेर देतोय!
एक गोष्ट सांगितली पाहिजे कीं उर्दू शायरीत स्त्रियांना खूप भाव असतो. खरं तर बरेचसे शेर स्त्री-केंद्रितच असतात, पण भूमिका मात्र वेगवेगळ्या! त्यांना कधी अत्युच्च मान दिला जातो, तर कधी त्यांच्यावर निर्दयतेचा आरोप केला जातो. (कधी-कधी हा प्रकार जास्तच होतो.)
सांगायचे कारण हे कीं 'मिपा'वरील स्त्रियांनी हे लक्षात ठेवावे कीं बायका हा उर्दू शायरांचा weak point आहे व त्यांच्या या कमजोरीकडे दुर्लक्ष करून स्त्रियांसह सर्वांनी या तर्हेच्या काव्यांचा आनंद लुटावा.
आजचा शेर असा आहे:
उस शोलारूने, ताकि पसेमर्गभी जलूँ
जलवाये दुष्मनोंसे मेरे गोरपर चिराग| (शायरः मोमीन)
शोला रू म्हणजे तेजस्वी सुंदरी, a dazzling beauty ((शोला म्हणजे वणवा/आग व रू म्हणजे चेहरा); पसेमर्ग म्हणजे 'मरणोत्तर', गोर म्हणजे थडगे, कबर!
शायर मोमीन म्हणतो कीं माझ्या रूपवती प्रेयसीने (जिच्यावर कवी एकतर्फा प्रेम करत होता) मी मरणोत्तरही 'जळावे' या हेतूने माझ्या थडग्यावर माझ्या वैर्यांकरवी पेटवलेले दिवे ठेवविले!
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
गजल-स्त्रीलिंगी
गजल मुळातच स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे त्यात स्त्रियांचे वर्णन ओघानेच येणार. मात्र काही विचारगर्भ,आशयघन आणि सामाजिक जाणिवेच्या गजला/शेर देखिल असतात. त्याही इथे पेश केल्या तर हरकत नाही.
उदा. ही मो. इब्राहिम ’जौ़क’ ह्यांची गजल पाहा.
अब तो घबराके ये कहते हैं के मर जायेंगे
मर के भी चैन न पाया, तो किधर जायेंगे?...
हम नही वो जो करे खू़न का दावा तुम पर
बल्की पूछेगा खु़दा भी तो मुकर जायेंगे...
शोला-ए-आह को बिजली की तरह चमकाऊँ
पर मुझे डर है के वो देख के डर जायेंगे...
’जौ़क’ जो मदरसे के, बिगडे़ हुए है मुल्ला
उनको मयखाने में ले आओ सँवर जायेंगे
ही गजल इथे ऐका... ग़ज़लनवाज़ भीमराव पांचाळे ह्यांच्या आवाजात.
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
व्वा! अगदी 'देवीय' (divine) गझल आहे.
व्वा! अगदी 'देवीय' (divine) गझल आहे.
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
देवीय?
मला वाटते, 'डिव्हाईन' साठी 'दैवी' हा योग्य प्रतिशब्द आहे.
"Great Power Comes With Great Responsibilities"
"Great Power Comes With Great Responsibilities"
अहो
अहो ज्ञानेश-जी, ती पोस्ट देवसाहेबांनी (श्री प्रमोद देव) पाठविली होती म्हणून मी 'देवीय' म्हटलं व कंसात divine असं लिहून ती एक 'कोटी' आहे असंही सुचवलं!
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
अच्छा अच्छा!
माफ करा.
विनोद कळला नाही. :S
"Great Power Comes With Great Responsibilities"
"Great Power Comes With Great Responsibilities"
मला वाटतं...
इथे 'बहलाना' चा अर्थ 'रिझवणे' असा नसून 'फसवणे' असा असावा.
तो म्हणतोय की ...मलाच न कळलेल्या गोष्टी इतरांना समजावून मी कधी कधी स्वतःचीच फसवणूक करत आलोय!
बरोबर आहे का?
ह्यावरून 'हम प्यारमें जलनेवालोंको' ही मदन मोहनचं एक गाणं आठवलं...त्यातलं 'बहलाए' आठवलं.
बेहलाए जब दिल नां बेहले, तो ऐसे बेहलाए...
गम ही तो है प्यारकी दौलत ये कहकर समझाए...
अपना मन छलनेवालोंको...चैन कहाँ...
झकास!
सुबक,
झकास! बरोबर!! तुझं म्हणणं "इथे 'बहलाना' चा अर्थ 'रिझवणे' असा नसून 'फसवणे' असा असावा. तो म्हणतोय की ...मलाच न कळलेल्या गोष्टी इतरांना समजावून मी कधी कधी स्वतःचीच फसवणूक करत आलोय!" तर्कसंगत वाटतं.
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
वाह
वाह !! क्या बात है .
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
मस्त धागा!
धागा खूपच आवडला काळेकाका. धाग्यातले आणि प्रतिसादातले सगळेच शेर एकसे बढकर एक आहेत. माझ्याकडच्या छोट्याशा खजिन्यातली काही रत्नं एकेक करून इथे ठेवतेय.
ही आहे अदा बदायुनी या कवयित्रीची एक रचना.
होटों पे कभी उनके मेरा नाम ही आए
आए तो सही, बर-सर-ए-इल्जाम ही आए
त्या प्रियतमाच्या ओठी माझं नाव कधीतरी यावं, भलेही ते आरोपाच्या अनुषंगानं का येईना! त्यानं कोणत्याही निमित्तानं माझं नाव घ्यावं, हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे!
हैरान हैं, लब-बस्तः हैं, दिलगीर हैं गुंचे,
खुशबू की जुबानी तेरा पैगाम ही आए
कळ्या त्रस्त, मूक, उदास आहेत. सुगंधाच्या सोबत तुझा संदेश तरी यावा, [म्हणजे कळ्या खुलतील!]
लम्हात-ए-मसर्रत हैं तसव्वुर से गुरेजां
याद आए हैं जब भी, गम-ओ-आलाम ही आए
आनंदाचे क्षण कल्पनेपासूनही दूर आहेत. [कल्पनेतही आनंदाचे क्षण आठवत नाहीत!] जेव्हा कधी आठवणी आल्या, त्या सगळ्या दु:खद क्षणांच्याच!
या छोट्याशा सुरेख गझलचा भावार्थ जसा जमला, तसा लिहिला आहे. आणखी नवं काही त्यातून उलगडत असेल, तर अवश्य लिहावं.
क्रान्ति
अग्निसखा
क्रान्ति
अग्निसखा
तीनही अर्थपूर्ण शेर हृदयाला स्पर्शून जातात
क्रांतीताई,
तीनही दु:खी भावनांबद्दलचे शेर अर्थपूर्ण असून हृदयाला स्पर्शून जातात. "रंजिशही सही, दिलको दुखानेके लिये आ" या मेहदी हसनने अजरामर केलेल्या गझलची आठवण करून देतात. (ती गझल बहुतेक सर्वांना माहीत असेलच. नाहीं तर नंतर कधीतरी पोस्ट करेन).
त्यातल्या त्यात तिसरा शेर फारच छान आहे. (जेव्हा कधी आठवणी आल्या, त्या सगळ्या दु:खद क्षणांच्याच!)
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
गुलजा़र
खिड़कियां बंद हैं, दीवारोंके सीने ठंडे
पीठ फेरे हुए दरवाजोंके चेहेरे चुप हैं
मेज़ कुर्सी हैं, के खामोशीके धब्बे धब्बे
फर्श में दफ्न हैं सब आहटें सारे दिन की
सारे माहौलपे तालेसे पडे हैं चुप के
सारे माहौलपे पथराई हुई चुपसी लगी है
तेरे आवाज़ की इक बूंद जो मिल जाए कहींसे
रात बच जायेगी, ये आख़री सासों पे पडी है
ये शेर बडा है मस्त-मस्त!
ये शेर बडा है मस्त-मस्त! खरंच गुलजारसाहेबाचा "जवाब नहीं"!
सूचना: मागे लिहिल्याप्रमाणे शायर/शाईराचे नाव माहीत असल्यास जरूर लिहावे ही पुनश्च विनंती.
आजचा एक हलका-फुलका पण अगदी हळुवार अर्थाचा बेखुद देहलवींचा शेर!
कुछ हया, कुछ हिजाब, कुछ शोखी
नीची नजरोंमें क्या नहीं होता?
हया=लज्जा, हिजाब= (नखरेल) संकोच (coyness, coquettish), शोखी=चंचलता, खोडकरपणा (mischievousness)
कांहींशी लज्जा, कांहींसा संकोच, कांहींसा खोडकरपणा
खाली झुकलेल्या डोळ्यात काय नसतं? (सगळं असतं!)
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
बहुगुणी साहाब, बहोत बढीयाँ!
गुलजार साहेबांबद्दल काय बोलावे?
साहीर नंतर तेच!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
तरलता
हे गुलजारजींचं खास वैशिष्ट्य इथं अनुभवता येईल.
">सन्नाटा
क्रान्ति
अग्निसखा
क्रान्ति
अग्निसखा
क्रांतिजी, अतिशय सुंदर गजल!
माझी आवडती गजल.
शांत व तरल!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
विरोधाभास
गझलेच मला नेहमी भुरळ पाडणार वैशीष्ठ म्हणजे त्यात आढळणारा विरोधाभास. त्याच एक उदाहरण
इक बार दोस्तोंपे ज़रा एतबार कर
फिर देख तेरी पीठ पे खंजर भी आयेगा ।
.................
अजून कच्चाच आहे.
.................
अजून कच्चाच आहे.
जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?
सुंदर!
क्रांतीताई, सुरेख आहे गझल!
'अहमद फराज' या माझ्या आवडत्या शायराची एक सोपी गझल देतो. (सोपी म्हणजे, उर्दू शब्द फारसे नसलेली.)
"तेरी बातें ही सुनाने आए,
दोस्त भी दिल ही दुखाने आए..
फूल खिलते है तो हम सोचते है,
तेरे आनेके जमाने आए..
इश्क तनहा है सरे-मंजिले गम
कौन ये बोझ उठाने आए?
अब तो रोनेसे भी दिल दुखता है..
शायद अब होश ठिकाने आए
क्या कोई फिर कोई बस्ती उजडी?
लोग क्यों जश्न मनाने आए?
सो रही मौत के पहलू मे 'फराज'
नींद किस वक्त न जाने आए..."
"Great Power Comes With Great Responsibilities"
"Great Power Comes With Great Responsibilities"
सुरेख!
इक बार दोस्तोंपे ज़रा एतबार कर, फिर देख तेरी पीठ पे खंजर भी आयेगा ।
आणि
क्या कोई फिर कोई बस्ती उजडी? ('कोई' शब्द चुकून दोनदा आला आहे की मूळ शेरातही दोनदा आहे?), लोग क्यों जश्न मनाने आए?
वा, सुरेख!
पंकज उधासने गायलेली अशीच एक झकास गझल आठवली (शायरचे नाव आहे कैसर)
यादोंका इक झौका आया हमसे मिलने बरसों बाद
पहेले इतना रोये नहीं थे, जितना रोये बरसों बाद
लम्हा-लम्हा घर उजडा है, मुश्किलसे एहसास हुआ (लम्हा=क्षण)
पत्थर आये बरसों पहले शीशे टूटें बरसों बाद
आज हमारी खाकपे दुनिया रोने धोने बैठि है (खाक=थडगे, र्हस्व ठि 'वृत्ता'साठी आहे)
फूल हुए हैं जाने कैसे सस्ते इतने बरसों बाद
क्या सोचती हो किसने तोडा, कैसे तोडा, क्यूँ तोडा
ढूँढ रही हो क्या गलियोंमें दिलके टुकडे बरसों बाद
दस्तककी उम्मीद लगाकर कबतक 'कैसर' बैठे हम (दस्तक=दारावरची थाप, टकटक)
कलका वादा करनेवाले, मिलने आये बरसों बाद
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
वाह; जनाब!
आज हमारी खाकपे दुनिया रोने धोने बैठि है
फूल हुए हैं जाने कैसे सस्ते इतने बरसों बाद
क्या बात है!
(क्या कहीं फिर कोई बस्ति उजडी.. असे आहे ते.)
"Great Power Comes With Great Responsibilities"
"Great Power Comes With Great Responsibilities"
आखिर क्यूँ
या चित्रपटातले गाणे आठवले
दुश्मन न करे दोस्तने जो काम किया है।
उम्रभरका गम जो हमें ईनाम दिया है।।
शायराचे नांव मला ठाऊक नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
हे गाणे
हे गाणे 'देवर'मधले आहे का? "बहारोंने मेरा चमन लूटकर खिझाँको ये इल्जाम क्यूँ दे दिया?" अशी सुरुवात होणारे?
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
हे गाणे
हे गाणे 'देवर'मधले आहे का? "बहारोंने मेरा चमन लूटकर खिझाँको ये इल्जाम क्यूँ दे दिया?" अशी सुरुवात होणारे?
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
इथे पहा
हे गाणे आखिर क्यूँ मधलेच आहे. यू ट्यूबवर
इथे पहा
पूर्ण गाणे असे आहे
स्मिता पाटीलः
दुश्मन न करे दोस्तने जो काम किया है।
उम्रभरका गम हमें ईनाम दिया है।।
तूफाँमें हमको छोडके साहिलपे आ गये ।
नाखुदाका हमने जिन्हे नाम दिया है।।
पहले तो होश छीन लिये जुल्मोसितमसे ।
दीवानगीका फिर हमें इल्जाम दियाहै ।।
राजेश खन्नाः
अपनेही गिराते हैं नशेमनपे बिजलियाँ ।
गैरोंने आके फिरभी उसे थाम दिया है।।
गाण्यातली यमके आणि प्रत्येक कडव्यातील दोन ओळीतला विरोधाभास पहाता मला तरी ही गजल असावी असे वाटते.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
इंदीवर शायर आहे
असं दिसतं इथे आणि इथे पाहिलं त्यावरून.
नाज़
अर्थात मीनाकुमारीची ही एक गझल.
आगाज़ तो होता है, अंजाम नहीं होता
जब मेरी कहानी में वो नाम नहीं होता
जब जुल्फ की कालिख में घुल जाए कोई राही,
बदनाम सही लेकिन गुमनाम नहीं होता
हंसहंसके जवां दिल के हम क्यों न चुने टुकडे?
हर शख्स की किस्मत में ईनाम नहीं होता
बहते हुए आंसू ने आंखों से कहा थमकर
जो मय से पिघल जाए, वो जाम नहीं होता
दिन डूबे हैं या डूबी बारात लिये कश्ती
साहिल पे मगर कोई कोहराम नहीं होता!
क्रान्ति
अग्निसखा
क्रान्ति
अग्निसखा
ज्ञानेश-जी,
ज्ञानेश-जी,
सगळ्यात चांगला शेर निवडलात.
पण "कलका वादा करनेवाले, मिलने आये बरसों बाद" ही ओळही मस्त आहे!
एक चूक दुरुस्त करतो!
क्या सोचती हो किसने तोडा, कैसे तोडा, क्यूँ तोडा
ढूँढ रही हो क्या गलियोंमें दिलके टुकडे बरसों बाद
हा शेर असा आहे
भूल भी जाओ किसने तोडा, कैसे तोडा, क्यूँ तोडा
ढूँढ रही हो क्या गलियोंमें दिलके टुकडे बरसों बाद
चुकीबद्दल क्षमस्व!
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
"जो मय से पिघल जाए, वो जाम नहीं होता" Wonderful!
क्रांती-जी,
जब जुल्फ की कालिख में घुल जाए कोई राही,
बदनाम सही लेकिन गुमनाम नहीं होता
आणि
बहते हुए आंसू ने आंखों से कहा थमकर
जो मय से पिघल जाए, वो जाम नहीं होता
हे दोन शेर लाजवाब आहेत.
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
अरे वा...
इतका सुंदर धागा कसा 'मिस' केला? मी पण एकेका शेर वर लिहायचा विचार करत होतो, पण इतर कित्येक गोष्टींप्रमाणे ते राहूनच गेले.
सध्या मला आठवणारे काही अहमद फराज ह्यांचे अशआर -
मी प्रेमात पडलो होतो पहिल्यांदा ह्या कल्पनेच्या. ह्या गजल मधले इतर अशआरही अती सुंदर आहेत.
(माज़ी - भूतकाळ, सराब - भास)
#२ सारखाच कतिल शिफाई ह्यांचा हा शेर -
अहमद फराज ह्यांचा अजून एक -
(तकल्लूफ - औपचारीकता, इकलाख - सद्गुण, चांगिलपणा असा ठोबळ अर्थ घेता येईल)
- मनिष
(नुक्ता, अर्धचंद्र कसे करायचे?)
नुक्ता
ग़=gaJ
ज़=jaJ
अर्धचंद्र
कँ=kEM
काँ=kOM
बाकी चर्चा इथे वाचा.
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
माफ किजियेगा ...
माफ किजियेगा , काही शेर कोणाचे आहेत हे माहिती नाही.
आठवले तसे लिहीले आहेत.पूरानीं यादें ताजा़ कर दी आप लोगोंने ..
शिकायत किस जुबां से मैं करुं ,उनके न आने की
यही एहसान क्या कम हैं कि मेरे दिलमें रहते हैं ..
जुल्फ बिखरकें न आना तुम ज़नाजे पे मेरें
रुह तडपेगी मेरी जुल्फें परेशां देखकर ..
देखा किये वो मस्त निगाहोंसे बार -बार
जब तक शराब न आए, कई दौर हो गए ..
-शाद अजी़माबादी
जान लेनी थी, साफ कह देते
क्या ज़रुरत थी मुस्कुराने की ..
- अनवर
कळस !!
मुस्कराना कली की आदत हैं, खून हो कर भी मुस्करायेगी ..
कळस
----------------------------------------------
पूर्वी लोकांवर प्रेम केले जायचे , वस्तु वापरल्या जायच्या ..
आता वस्तुंवर प्रेम केले जाते , लोक वापरले जातात ...
क्या ज़रुरत थी मुस्कुरानेकी?
जान लेनी थी, साफ कह देते
क्या ज़रुरत थी मुस्कुरानेकी?
सुरेख!
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
धन्यवाद प्रमोड काका
फराज़ चा अजून एक -
मनिष-जी, शेर एकदम निवडक आहे. खूप आवडला.
मनिष-जी,
शेर एकदम निवडक आहे. खूप आवडला.
सुधीर
------------------------
गमका तूफाँ तो गुजरही जायेगा, बस मुस्कुरा देनेकी आदत चाहिये|
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
'अब्रू'वरील एक गमतीदार शेर!
अब्रू न संवारो कहीं कट न जाये उंगली, (अब्रू=भिवई)
नादान हो, तलवारसे खेला नहीं करते| (निजाम रामपुरी)
शायर आपल्या प्रेमिकेच्या तलवारीसारख्या रेखीव भिवईकडे बघून म्हणतो:
बोट फिरवून रेखू नकोस भिवई. बोट कापलं जाईल ना!
अजून अजाण आहेस. कुणी असं तलवारीबरोबर खेळतं का?
वाचकांनी 'अब्रू' (भिवई) आणि 'आबरू' (इज्जत) यामधील फरक लक्षात घ्यावा!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
भ्रूधनु सरसावुनि
मस्त शेर. सुकांत चंद्रानना पातली भ्रूधनु सरसावुनि... आठवले. भ्रू (संस्कृत), अब्रू (उर्दू) आणि brow (इंग्रजी) या साम्यामागचा कोणी उलगडा केल्यास फारच उत्तम.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सईद राही
सईद राही यांची खालील गझल सदाहरित प्रतीची आहे. 'ललत' रागात सुरावट बांधलेली ही गझल जगजीत सिंग गातात.
ही माझी आवडती गझल असून ती मी खासगी बैठकींत बर्याचदा 'गातो'! माझं गायन 'भयंकर' असले तरी हे शेर इतके सुंदर आहेत कीं खूपदा श्रोते (त्या शेरांना) दाद देतात!
वाचा तर ती गझल.
कोई पास आया सवेरे सवेरे
मुझे आजमाया सवेरे सवेरे.....धृ
मेरी दास्ताँको जरासा बदलकर
मुझेही सुनाया सवेरे सवेरे....१
जो कहता था कल शब सम्हलना सम्हलना (शब=रात्र)
वही लडखडाया सवेरे सवेरे....२
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे....३
यातील पहिल्या कडव्यातल्या बाबीचा अनुभव आपल्याला आपल्या व्यवसायिक आयुष्यात कधी-कधी येतो. आपली एकादी चांगली कल्पना आपण आपल्या (खडूस) बॉसला किंवा (खडूस) सहकार्याला सांगतो व ती कल्पना ढापून स्वतःची असं दडपून एकाद्या मीटिंगमध्ये त्यांच्याकडूनच आपल्यालाच ऐकायला मिळते तेंव्हां कसं "धन्य-धन्य" वाटते!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
तमाम शहर में..
नसीम रिफ़अत ची ही अजून एक मस्त गज़ल.
तमाम शहर में तनहा दिखाई देता है
ये शख्स़ कितना अधुरा दिखाई देता है
अब उसकी प्यास पानीसे बुझ नही सकती
वो अपने खु़न का प्यासा दिखाई देता है
जलाओ और जलाओ अभी लहू के च़राग
अभी फ़जा मे अंधेरा दिखाई देता है
मिटा दो दहर से ऐसी बलंदियो के निशां
जहां से आदमी छोटा दिखाई देता है
भीमरावांच्या आवाजात ही गजल ऐका.
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
हर गीत को
हर गीत को कह दो वो साज ना दे
हर साज को कह दो वह राग ना दे
दुनियावलो मुझे जीना आता है
मौत से कह दो वह आवाज ना दे
नवा शेर नाहीं आला
काय भाऊ, कामात आहात जणू? दोन दिवस झाले. नवा शेर नाहीं आला म्हणुन विचारतोय!
आता जरा चटक लागलीय!
भापू
खरंच
कितीतरी नवे, तर काही विस्मरणात गेलेले शेर, गझला या निमित्तानं वाचायला मिळताहेत!
"ही एक सुरेख गझल.
स्व. जयदेव यांनी संगीतबद्ध केलेली आणि आशाजींनी गायिलेली ही "ग़ालिब" यांची अजरामर गझल भैरवी रागात बांधलेली आहे. पर्शियन संगीताची झलक असलेल्या या गझलची अलौकिक गोडी ऐकूनच अनुभवावी!
कभी नेकी भी उसके जी में गर आ जाए है मुझसे
जफाएं करके अपनी याद शरमा जाए है मुझसे
ख़ुदाया जज़्बा-ए-दिलकी मगर तासीर उल्टी है
कि जितना खींचता हूं और खींचता जाए है मुझसे
वो बदख़ू और मेरी दास्तान-ए-इश्क़ तूलानी
इबारत मुख़्तसर, क़ासिद भी घबरा जाये है मुझसे
उधर वो बदगुमानी है, इधर ये नातवानी है
ना पूछा जाये है उससे, न बोला जाये है मुझसे
सम्हलने दे मुझे ऐ नाउम्मीदी, क्या क़यामत है?
कि दामान-ए-ख़याल-ए-यार छूटा जाए है मुझसे
हुए हैं पाँव ही पहले नवर्द-ए-इश्क़ में ज़ख़्मी
न भागा जाये है मुझसे, न ठहरा जाये है मुझसे
क़यामत है कि होवे मुद्दई का हमसफ़र "ग़ालिब"
वो काफिर जो ख़ुदा को भी न सौंपा जाए है मुझसे
जफाएं :- जुलूम, अत्याचार. बदख़ू :- वाईट स्वभावाचा. तूलानी :- लांबलचक, कंटाळवाणी. इबारत :-मजकूर. मुख़्तसर :- थोडा, संक्षिप्त. बदगुमानी :-दुराग्रह. नातवानी :- दुर्बळपणा. नवर्द-ए-इश्क़ :- प्रेमातील मार्गक्रमण. मुद्दई :- शत्रू.
क्रान्ति
अग्निसखा
क्रान्ति
अग्निसखा
क्रांतिजी,
क्रांतिजी,
लतादिदींनी पण ही गझल गायली आहे. मला वाटतं दिदींनी गायलेली, आणि हृदयनाथांनी संगीत दिलेली ही चाल फारच छान आहे.
अल्बमः 'लता सिंग्ज गालिब'
गझलेच्या अर्थानुरूप गायलेल्या भावपूर्ण गझल्स.
प्रत्येक गझलप्रेमीच्या संग्रहात असलाच पाहिजे असा अल्बम.
My all time favourite.
लता भक्त,
नंदू
खरं तर 'इ' चा उपयोग मला कळलेलाच नाहीं!
I must admit that I find Ghalib too difficult to understand because of his overuse of 'e' like in "दामान-ए-ख़याल-ए-यार"!
मी तर गालिब वाचताना डिक्शनरी असूनही घामाघूम होऊन जातो!
ज्या गझलियातांत किंवा अशियारांत खूप 'इ' किंवा 'ए' असतात त्या मी 'ऑप्शन'ला टाकतो!
खरं तर 'इ' चा उपयोग मला कळलेलाच नाहीं. मुघल-ए-आझम मध्ये ए काय दर्शवतो? खरं तर त्याचा अर्थ "न्यायाचे मुघल" कीं "मुघलांचा न्याय" हेच कळत्र नाहीं.
एका पाकिस्तानी मित्राच्या आईला मी हा प्रश्न विचारला. तीही घोटाळून गेली!
कुणी जर उलगडून सांगितलं तर आभारी होईन!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
इ म्हणजे ऑफ ?
माझ्या अंदाजाप्रमाणे इंग्रजीत लिहितात तसा (दर्देदिल म्हणजे दर्द ऑफ दिल म्हणजेच दिलाचा दर्द) असा नेहमी होतो, पण मुघलेआजमचा घोळ समजत नाही. कदाचित दोन्ही बाजूंनी विचार करून जो योग्य वाटेल तो घ्यायचा असेल.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
त्या पाकिस्तानी बाईने मला अगदी हेच सांगितले होते!
त्या पाकिस्तानी बाईने मला अगदी हेच सांगितले. मी तिच्याशी तिच्या मुलाच्या (माझ्या मित्राच्या) फोनवरून बोलत होतो. मग ती म्हणाली, "कभी घर आ जाना तो सामने-सामने जादा ठीकसे समझा पाऊंगी".
त्यानंतर ते कुटुंब पाकिस्तानला परत गेले व हा मुद्दा तसाच राहिला!
असो. माझ्यासारखाच गोंधळ इतरांनाही आहे हे वाचून अंमळ बरे वाटले हे मात्र खरे!
आज शायर सीमाब यांचा एक छान शेर देत आहे.
हम उस निगाहे-नाज़को समझे थे नेशतर (निगाहे-नाज़=चंचल नजर, नेशतर=टोचणारा)
तुमने तो मुस्कुराके रगे-जाँ बना दिया! (रगे-जाँ= aorta, मुख्य रक्तवाहिनी)
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
मुघले आझम
नमस्कार,
आझमचा अर्थ महान. मुघल-ए-आझम म्हणजे मुघलांमधला सर्वात महान.
चुकले असल्यास क्षमा असावी.
जयंत कुलकर्णी.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
धन्यवाद नंदू
दुवा आवडला.
काळेकाका, खरंच गालिब वाचणं आणि समजणं कठीण आहे! त्यांचे बरेच शब्द डिक्शनरीच्या कक्षा ओलांडून जातात!! मला तर वाटतं, गालिबच्या गझल संगीतामुळे जास्त गाजल्या असाव्यात. तमाम संगीतकार, गायक, गायिका यांना त्या गझलांनी इतकी भुरळ घातली आहे, की एकेक गझल कित्येक वेळा वेगवेगळ्या तर्हांनी गायिली गेली आहे!
ए किंवा ई हा प्रत्यय पण शब्दांच्या अर्थानुरूप जवळजवळ सगळ्या विभक्तींसाठी असतो, असं बरेचदा वाटतं!
क्रान्ति
अग्निसखा
क्रान्ति
अग्निसखा
ए/इ' चा अर्थ 'आणि' असाही होत असावा!
खरं आहे. गझ़ल वाचतांना अशाही 'जागा' मला भेटल्या आहेत कीं जिथे 'ए/इ' चा अर्थ 'आणि' असाही होत असावा!
आज शायर अदम यांचा एक गमतीदार शेर!
मेरी और उसकी निगाहोंका तसादुम कुछ न पूछ (तसादुम=टक्कर, collision)
बेखुदीमें आइनेसे आइना टकरा गया| (बेखुदी=निश्चेष्टता, senselessness, delirium)
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
लतादिदींनी गायलेली एक सुंदर गजल..
हाले दिल यूं उन्हे सुनाया गया..
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
हा धागा उर्दू भाषेच्या शब्दसौंदर्यांसाठी!
हा धागा मी सुरू केला तो उर्दू भाषेतील शेर-शायरी व गज़लियातांच्या शब्दसौंदर्यांसाठी, गाव्यस्वरूपासाठी नव्हे.
तरी माझी अशी विनंती आहे कीं गाणी न टाकता त्यातले शब्द लिहावेत. गाणी टाकायची असतील तर एक वेगळा गाव्य शायरीचा धागा सुरू करावा.
ही एक नम्र विनंती आहे.
सुधीर काळे
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
गाव्य?
'देवीय' प्रमाणेच हा शब्दही खटकला. यात काही श्लेष्/विनोद दडलाय का?
अन्यथा स्वरबद्ध/संगीतबद्ध हे शब्द चालावेत..
"Great Power Comes With Great Responsibilities"
"Great Power Comes With Great Responsibilities"
चूक मान्य!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
आजचा शेर "मंज़ूरेनजर"!
हा एक शायर हसरत मोहानी यांचा एक छान शेर आहे:
थे पास तो मंज़ूरे-नज़र, राहते-दिल थे,
अब जाने-तमन्ना हो,जो तुम हमसे जुदा हो!
मंज़ूरे-नज़र=beloved, darling!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
वा!
मस्त शेर!
मज़हर इमाम यांची एक छोटीशी गझल
एक गुजारिश है, बस इतना कीजिए
जब कभी फुर्सत हो, आया कीजिए
लोग इसका भी ग़लत मतलब न लें,
अजनबी बनकर न देखा कीजिए
खुद को अपनी आंख से देखा तो है,
अब मेरी आंखॉ से देखा कीजिए
इल्तिजा थी, एक सादा इल्तिजा,
आप तनहाई में सोचा कीजिए !
क्रान्ति
अग्निसखा
क्रान्ति
अग्निसखा
इल्तिजा
क्रांतीताई,
फारच सुंदर गज़ल आहे. "रंजिशही सही" या अजरामर गज़लची आठवण झाली!
बर्याचदा एकाद्या शब्दाचा अर्थ माहीत नसतो. उदा. मलाही इल्तिजाचा (विनंती, प्रार्थना) हा अर्थ माहीत नव्हता. म्हणून मी देतो तसे "प्रथमदर्शनी" अवघड वाटणार्या शब्दांचा अर्थ देत जावे ही विनंती!
इल्तिजाचा अर्थ डिक्शनरीत पहाताना हा शब्द वापरलेला फैज़ अहमद फैज़ यांचा एक शेर वाचनात आला.....!
हिम्मते-इल्तिजा नहीं बाकी
दर्दका हौसला नहीं बाकी
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
उफ्फ!
हिम्मते-इल्तिजा नहीं बाकी
दर्दका हौसला नहीं बाकी
कातिल शेर आहे.
या गझलेतील इतर शेर असल्यास द्यावेत.
"Great Power Comes With Great Responsibilities"
"Great Power Comes With Great Responsibilities"
या गझलेतील इतर शेर असल्यास द्यावेत.
हे घ्या.
हिम्मत ए इल्तिजा नहीं बाकी
जब्त का हौसला नहीं बाकी ।
इक तेरी दीद छिन गई मुझसे
वर्ना दुनिया में क्या नहीं बाकी ।
अपनी मश्क ए सितम से हाथ ना खेंच
मैं नहीं या वफ़ा नहीं बाकी ।
तेरी चश्म ए आलम नवाज की खैर
दिल में कोई गिला नहीं बाकी ।
हो चुका ख़त्म अहदे हिज्र ओ विसाल
जिंदगी में मज़ा नहीं बाकी ।
-- फैज अहमद फैज.
दोन परस्परविरोधी शेर
दोन परस्परविरोधी व गमतीदार शेर देत आहे!
पहिला शेर आहे शायर मजहर इमाम यांचा:
छूके एक शक्सको देखा तो मुलम्मा निकला,
उसको मैं कैसा समझता था, वो कैसा निकला!
मुलम्मा=मुलामा, गिलिट, coating
दुसरा आहे एका अज्ञात कवीचा!
कुछ लोगोंसे जब तक न मुलाकात हुई थी
मैंभी ये समझता था , खुदा सबसे बडा है!
एक शेर आहे एकाद्या फालतू पण दिखाऊ माणसाचा व दुसरा आहे एकाद्या महान माणसाबद्दल!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
परवीन शाकिर
यांचे काही शेर नुकतेच वाचनात आले.
कांप उठती हूं मैं ये सोच के तनहाई में,
मेरे चेहरे पे तेरा नाम न पढ़ ले कोई!
उंगलियों को तराश दूं फिर भी
आदतन् उसका नाम लिखेंगी!
[तराशना - कापणे, आदतन् - सवयीने]
अब तो इस राह से वो शख़्स गुजरता भी नहीं,
अब किस उम्मीद पे दरवाजे से झांके कोई?
क्रान्ति
अग्निसखा
क्रान्ति
अग्निसखा
शकील बदायूनी
शकील बदायूनी यांचा एक झकास शेर वाचा!
सुकूँ पाने लगा हूँ ग़मे-महब्बतमें
कहाँ गयी मेरी बेताबियाँ, नहीं मालूम!
सुकूँ = मनःशांती, संतोष, बेताबी = व्याकूळता, restlessness
उपरोधिकपणे शायर म्हणतो:
प्रेमभंगाच्या दु:खांतच मला मनःशांती मिळू लागली आहे
माझ्या मनाची व्याकूळता कुठं गेली कुणास ठाऊक
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
निकल जाये दम
जनाजा़ रोक के रोया,वो ईस अदा से बोले
गली हमने कहीं थी , तुम तो दुनिया छोड जातें हो ..
- सफी़
मुझे याद करनेसे ये बद्दुआ थी
निकल जाये दम हिचाकियां आते आते ...
कळस !!
पूर्वी लोकांवर प्रेम केले जायचे , वस्तु वापरल्या जायच्या ..
आता वस्तुंवर प्रेम केले जाते , लोक वापरले जातात ...
कळस
----------------------------------------------
पूर्वी लोकांवर प्रेम केले जायचे , वस्तु वापरल्या जायच्या ..
आता वस्तुंवर प्रेम केले जाते , लोक वापरले जातात ...
मी 'गल्ली सोडून जा' म्हणाले होते, तर तू हा इहलोकच सोडून गेलास!
काय मस्त व अर्थपूर्ण शेर आहे!
जनाजा़ रोक के रोया,वो ईस अदा से बोले (जनाजा=शवयात्रा)
गली हमने कहीं थी , तुम तो दुनिया छोड जातें हो ..
--------------------------
व्वा!
एका पोरीनं तिच्यावर 'लाईन मारणार्या' तरुणाला "माझ्या गल्लीत पाऊल नाहीं टाकायचं" असा सज्जड दम मारल्यामुळे तो पोरगा हाय खाऊन मृत्यू पावला. त्यावर हा शेर आहे.
ती बिचारी त्याच्या शवयात्रेत धाय मोकलून रडली व म्हणाली, "मी फक्त 'गल्ली सोडून जा' म्हणाले होते, तर तू या इहलोकालाच सोडून गेलास!"
वा भाई वा! सुरेख!!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
अश्रू
बनून डोळ्यांत रहाणारा प्रियतम ही कल्पनाच किती वेगळी! इथे पहा ही कशी मांडली आहे.
वो अश्क बनके मेरी चश्म-ए-तर में रहता है
अजीब शख्स़ है, पानी के घर में रहता है!
चश्म-ए-तर :- अश्रूभरले डोळे, शख्स़ :- व्यक्ती
क्रान्ति
अग्निसखा
क्रान्ति
अग्निसखा
अहाहा....
मस्तच आहे!
व्वा क्रांतीताई! सुंदर शेर आहे तुम्ही आज दिलेला!
व्वा क्रांतीताई! सुंदर शेर आहे तुम्ही आज दिलेला!
जय हो!
सुधीर
------------------------
असेल हिंमत व आवड, तर ऐका हे मुळात पंकज उधासने गायलेले गीत! http://www.youtube.com/watch?v=4HUwuNk0Tc4
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
हा धागा मी
:T
हा धागा मी सुरू केला तो उर्दू भाषेतील शेर-शायरी व गज़लियातांच्या शब्दसौंदर्यांसाठी, गाव्यस्वरूपासाठी नव्हे.
तरी माझी अशी विनंती आहे कीं गाणी न टाकता त्यातले शब्द लिहावेत. गाणी टाकायची असतील तर एक वेगळा गाव्य शायरीचा धागा सुरू करावा.
ही एक नम्र विनंती आहे.
सुधीर काळे
:?
सुकूँपर्वर = शांतीपूर्ण, peaceful
शायर अजीज़ लिहितातः
वो बज़्ममें थे तो हर साँस थी सुकूँपर्वर
वो उठ गये तो उठी हैं कयामतें क्या क्या!
बज़्म=महफिल, गाण्याची/काव्यगायनाची बैठक
कयामत=प्रलय, doomsday
शायर म्हणतातः
ती (माझी प्रियतमा) बैठकीत हजर होती तोवर माझा प्रत्येक श्वास कसा शांतीपूर्ण होता.
ती उठून गेली आणि जणू प्रलयच झाला!
सुधीर
------------------------
असेल हिंमत व आवड, तर ऐका हे मुळात पंकज उधासने गायलेले गीत! http://www.youtube.com/watch?v=4HUwuNk0Tc4
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
शायर दाग़ यांचा हा सुरेख शेर वाचा!
शायर दाग़ यांचा हा सुरेख शेर वाचा! सारे शब्द सोपे आहेत!! (बंदगी म्हणजे प्रार्थना.)
नाराज हो खुदा तो करें बंदगीसे खुश
माशूक रूठ जाये तो क्यों कर मनाये हम! दाग़
सुधीर
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
शायर माहिरुल कादरी यांचा एक मस्त शेर
हा शायर माहिरुल कादरी यांचा एक मस्त शेर!
उनके कूचेसे इक शाम गुजरा था मैं
फिर यही रोजका मश्ग़ला बन गया!
कूचा=गल्ली; मश्ग़ला=संवय
एकदा मी तिच्या गल्लीतून एक चक्कर मारली
आणि मग ती रोजची संवयच होऊन गेली
सुधीर
------------------------
ही लिंक वाचा: http://tinyurl.com/yf7l59q
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll
सीमाब अकबराबादी यांची रचना:
नामा गया कोई न कोई नामाबर गया
तेरी ख़बर न आयी ज़माना गुजर गया
[नामा = पत्र/संदेश, नामाबर= निरोप्या/संदेशवाहक]
हंसता हुआ यूं की हिज्र की रातें गुजर गयीं
रोता हुआ यूं की लुत्फ-ए-दुआ-ए-सहर गयीं
[हिज्र- दुरावा, लुत्फ = आनंद, सहर = सकाळ]
अब मुझको है करार तो सबको करार है
दिल क्या ठहर गया के जमाना गुजर गया
या रब नही मैं वाकिफ-ए-रुदाद-ए-जिंदगी
इतना ही याद है की जिया और मर गया
[वाकिफ = ओळख, रुदाद = गोष्ट]