फोटो नाही म्हणून रेसिपी वाचू नये...असे करू नये...
आता तुम्ही रेसिपी करून फोटो टाकावा ही अपेक्षा. :)
साहित्य:
१/२ किलो मटण
५ टे.स्पून सुके खोबरे
२ टे.स्पून तीळ
१ टे.स्पून खसखस
१/४ टी.स्पून हळद
२ टी.स्पून मीठ
१ टे.स्पून गरम मसाला
१ टे.स्पून तिखट (मिरची पूड)
१/४ टी.स्पून आलं पेस्ट
१/४ टी.स्पून लसूण पेस्ट
अर्धी जुडी कोथिंबीर
तेल
१ लिंबू
कृती:
१.हळद, मीठ व अगदी थोडे पाणी घालून मटण शिजवून घ्यावे.
२.खोबरे, तीळ व खसखस कोरडेच भाजून घ्यावे.
३.हाताने खोबरे कुस्करून घ्यावे, तीळ खसखस बारीक कुटावे.
४.भाजलेले खोबरे, तीळ, खसखस, गरम मसाला, तिखट, हळद, मीठ, आले-लसणाची पेस्ट, कोथिंबीर हे सर्व घालून चांगले मिक्स करावे.
५.मटण शिजल्यावर ते काढून घेऊन, कढईत थोडे तेल घालून थोडे थोडे मटण घालून तळून घ्यावे.
६.नंतर तळलेले मटण आणि वरील सर्व मसाला घालून त्यावर लिंबू पिळावे. वरून कोथिंबीर घालावी.
मी अजूनी ही रेसिपी केली नाही, माझ्या एका कोल्हापूरच्या मैत्रिणीने सांगितली आहे....
वाचने
9521
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी अजूनी
तुम्ही
In reply to मी अजूनी by अवलिया
अहो, लोणच
मट्णाची
धन्यवाद
काजुकतली,
इथे चिकन
चिकनचं
In reply to इथे चिकन by मितालि
मट्णाचे
काय ताई ...
फोटू?
मटणाचं
मग तुम्ही
अहो, आम्ही
In reply to मग तुम्ही by काजुकतली
मग काय
हे लोणच
सुन्दर पाकक्रिया आहे.