✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्थलांतराचा धार्मिक संदर्भ

भ
भोचक यांनी
Mon, 08/31/2009 - 12:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3621 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

चांगला

नंदन
Mon, 08/31/2009 - 13:56 नवीन
विषय आणि मांडणी. युरोपात सध्या ह्या कारणावरून तणाव आहे हे खरं, पण यामागच्या कारण आणि परिणामांची जोडी ही एकच एक (धर्म आणि अशांतता अशी) नसावी. त्याउलटही असू शकते. एनपीआरवर उडतउडत ऐकलेल्या एका कार्यक्रमात ब्रिटन आणि फ्रान्सच्या अल्पसंख्याक समुदायांची तुलना केली होती. स्थलांतरितांना आपल्या संस्कृतीत सामावून घेण्यासाठी जे जाणीवपूर्वक प्रयत्न फ्रान्समध्ये गेली दोन-तीन दशके करण्यात आले, त्या स्वरूपाचे प्रयत्न इंग्लंडमध्ये झाले नाहीत असं त्या कार्यक्रमात ज्याची मुलाखत घेतली जात होती त्या समाजशास्त्रज्ञाचं म्हणणं होतं. परिणामी फ्रान्सने इराक व अफगाणिस्तानात सैन्य पाठवले तरी लंडन बॉम्बस्फोटांसारखी प्रतिक्रिया तिथे उमटली नाही. (अर्थात आता सारकोझींनी बुरख्यावर बंदी घातल्यावर मात्र वेगळे सूर उमटले आहेत.) दोन-तीन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये झालेल्या बेरोजगार युवकांच्या दंगलींनाही (बहुसंख्य अल्जिरियन मुस्लिमांचा सहभाग असूनही) धार्मिक परिमाण मिळाले नाही. याउलट इंग्लंडमध्ये मात्र कनिष्ठ मध्यमवर्गीय/गरीब घरांतील तरूणांना दैनदिन वैफल्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणून धर्माचा आसरा मिळाला असं त्यांचं प्रतिपादन होतं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

छान

ऋषिकेश
Mon, 08/31/2009 - 14:37 नवीन
चांगला विषय आणि मांडणी. स्थलांतरांच्या मागे धर्म हे कारण असणे जरी कमी असले तरी स्थलांतर केल्यानंतर निर्माण होणार्‍या नव्या धार्मिक डेमोग्राफीमुळे विविध प्रश्न उभे रहातात. अश्या प्रश्नांना स्थलांतारीतांचा प्रश्न म्हणून तो सोडवावा का? यावर अनेक ठिकाणी स्थानिक निर्णय करू शकत नाहित. धर्म म्हटला की वस्त्र, खाणे, घरे राखणे अश्या ऐहिक बाबींतील फरक व्यतिरिक्त, धर्माशी निगडीत एक प्रकारचे रहाणीमान येते, सवयी येतात, मान्यता येतात आणि शिष्टाचाराच्या-नैतिकतेच्या स्वतंत्र कल्पनाही येतात. स्थानिक लोकांच्यापेक्षा स्थलांतरीतांचे रहाणीमान सारखे किंवा वेगळे तरीही समांतर असल्यास प्रश्न कमी येतात मात्र जर ते पूर्णपणे विरोधी असेल तर मात्र आपण लेखात म्हटलेले प्रश्न जाणवू लागतात, व ते हळूहळू बिकट होत जातात. आपल्या ह्या लेखानंतर काल्डवेलचे पुस्तक वाचावेसे वाटु लागले आहे. बघु कधी योग येतो ते. जाता जाता जाहिरातः स्थलांतरीतांच्या प्रश्नावर मी इथे मुक्तक लिहिले होते.. ते मटामधे ही आले होते. हे आठवले ऋषिकेश ------------------ दूपारचे २ वाजून ३० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "दुनिया मायाजाऽऽल मनवा देख जरा...."
  • Log in or register to post comments

अस्मिता

प्रकाश घाटपांडे
Mon, 08/31/2009 - 14:46 नवीन
स्थलांतरितांच्या धार्मिक, प्रांतिक, भाषिक अस्मिता या टोकदार बनल्या तर त्यांना सामावुन घेणे जड जाते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

चांगला

अभिज्ञ
Mon, 08/31/2009 - 14:52 नवीन
चांगला विषय व सुंदर विवेचन. हे पुस्तक निश्चितच वाचायला आवडेल. पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

चांगला

अभिज्ञ
Mon, 08/31/2009 - 14:53 नवीन
चांगला विषय व सुंदर विवेचन. हे पुस्तक निश्चितच वाचायला आवडेल. पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

वा...

श्रावण मोडक
Mon, 08/31/2009 - 14:57 नवीन
अगदी योग्यवेळी लिहिले आहे. 'आपण सारे...', 'हिंदू म्हणजे कोण' या दोन धाग्यांच्या पाठोपाठ या अर्थाने योग्यवेळी. पुस्तक वाचावे लागेल किंवा किमान वाचलेल्याकडून काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील हे नक्की. धर्म हा संदर्भ असलेल्या या तिन्ही धाग्यांच्या जोडीने जीवनशैली (वे ऑफ लाईफ) या अर्थाने असा एक धागा आला तर या सगळ्या चर्चांना एक 'चौकट' लाभेल. त्या सगळ्यातून मग मानवाची संस्कृती असा पाचवा धागा सुरू होऊ शकेल. आणि मग किमान काही गोष्टींमध्ये वैयक्तिक स्तरावर अनेकांना एकेक पाऊल पुढे किंवा मागे टाकणे सोपे जाईलही. हे हलके घेऊ नये. उपरोधीक किंवा उपहासात्मक नसून गंभीरच आहे.
  • Log in or register to post comments

अजून एक...

जीएस
Mon, 08/31/2009 - 17:48 नवीन
उत्तम विषय व परिचय. इस्लामची स्वतःची न्याय व शासनप्रणाली आहे. ती प्रणाली आणि ज्या देशात रहातात तिथली प्रणाली यात तो देश इस्लामिक नसेल तर नेहेमीच संघर्ष होतो. मुसलमान कुठल्याच देशात शांततेने नांदत नाहीत असे एक विधान आपण ऐकतो, त्याची ही पार्श्वभूमी असावी.. 'व्हाईल युरोप स्लेप्ट : हाउ रॅडिकल इस्लाम इज डिस्ट्रॉयिंग युरोप फ्रॉम विदिन' हेहि एक चांगले पुस्तक आहे. मला थोडे अमेरिकेच्या बाजूने पक्षपाती वाटले पण तरीही चांगली माहिती आहे.
  • Log in or register to post comments

चांगला लेख

नितिन थत्ते
Mon, 08/31/2009 - 21:20 नवीन
चांगला लेख विषय. काही मते मांडतो. बांगला देशासारखे स्थलांतरित सोडले तर भारतातील बहुसंख्य मुसलमान हे मुसलमान म्हणून स्थलांतरित झालेले नाहीत. ते त्या त्या ठिकाणचे स्थानिक धर्मांतरित मुसलमान आहेत. आज उत्तरप्रदेशातून किंवा बिहारमधून मुंबईला आलेले मुसलमान स्थलांतरित आहेत (तरीही ते मूळचे भारतातलेच आहेत). तसेच कोकणातले, नगर औरंगाबादचे मुसलमान हेही स्थानिक आहेत. कदाचित त्यामुळे तितका संघर्ष उद्भवला नसावा. (तसेच भारतातले ख्रिश्चनही आहेत). स्थलांतरित नाहीत याचा अर्थ ते स्थलांतरित राज्यकर्त्या तुर्की, इराणी, मंगोल यांचे वंशज नाहीत. उलट हे ब्रिटनमधील / फ्रान्समधील मुसलमान हे तेथील हिंदूंप्रमाणेच खरोखरचे स्थलांतरित आहेत. ते मुसलमान किंवा हिंदू संस्कृती आपल्याबरोबर घेऊन तेथे गेले आहेत. त्यामुळे कदाचित संघर्ष उद्भवत असावा. >>त्यामुळे स्थानिक विरूद्ध उपरे हा संघर्षही तीव्र झाला आहे. तिकडेही 'राज ठाकरे' उभे ठाकू लागले आहेत याच्याशी मुसलमान असण्याचा काही संबंध नसावा. उपरे ख्रिश्चन असते तरी संघर्ष उद्भवला असता. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा