शताब्दी हौतात्म्याची

विकास's picture
विकास in काथ्याकूट
18 Aug 2009 - 5:24 am
गाभा: 

आज, १७ आँगस्ट, २००९ ला, हुतात्मा मदनलाल धिंग्रा यांना फासावर जाऊन १०० वर्षे झाली. १ जुलै १९०९ ला इंडीयन नॅशनल असोसिएशनच्या कार्यक्रमात त्याने लॉर्ड कर्झन वायलीवर गोळीबार केला. त्यात कर्झन वायलीस मरण आलेच पण त्या गडबडीत मधे येऊन थांबवू पहाणारा एक पार्सी डॉक्टर, कोवास्जी लल्काका पण मारला गेला. २३ जुलैस त्याची कोर्टात सुनावणी झाली. कोर्टातील सुनावणीच्या वेळेस एकाही भारतीयास हजर रहाण्याच परवानगी देण्यात आली नव्हती. १७ आँगस्ट १९०९ ला त्याला फाशी देण्यात आले. त्यावेळेस त्याचे वय फक्त २२ वर्षाचे होते...

मदनलाल धिंग्रा हा भारतीय क्रांतिकारकांच्या विश्वातील प्रथम क्रांतिकारक ठरला ज्याने, एका ब्रिटीश अधिकार्‍यास ब्रिटनमधे मारले. जर जर्मनीस ब्रिटनवर सत्ता करण्याचे हक्क नसतील तर ब्रिटनला भारतावर का आहेत? असे त्याने विचारले. फाशीच्या वेळेस पॅरीसमधे असलेल्या ग्यानचंद वर्मा यांच्या सांगण्यावरून सरदार सिंग राणा यांनी त्याचे शेवटचे विधान "Challenge" पोस्टकार्डावर त्याच्या फोटोसहीत प्रकाशीत केले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ती कार्डे भारतात पाठवली. त्या कार्डावरील मजकूर खालील प्रमाणे:

Challenge

"I admit the other day; I attempted to shed English blood as an humble revenge for the inhuman hangings and deportations of patriotic Indian youths. In this attempt, I have consulted none but my own conscience; I have conspired with none, but my own duty.
"I believe that a nation held down in bondage with the help of foreign bayonets is in a perpetual state of war. Since open battle is rendered impossible to a disarmed race, I attacked by surprise; since guns were denied to me, I drew forth my pistol and fired.
"As a Hindu I felt that a wrong done to my country is an insult to God. Her cause is the cause of Sri Ram! Her services are the services of Sri Krishna! Poor in health and intellect, a son like myself has nothing else to offer to the Mother but his own blood and so I have sacrificed the same on her altar.
"The only lesson required in India at present is to learn how to die and the only way to teach it, is by dying ourselves. Therefore I die and glory in my martyrdom! This war of Independence will continue between India and England, so long as the Hindu and the English races last (if the present unnatural relation does not cease!)
"My only prayer to God is: May I be reborn of the same Mother and may I redie in the same sacred cause, till the cause is successful and she stands free for the good of humanity and the glory of God!"

-Vande Mataram

त्यावेळेस ब्रिटीश सरकारने त्यांचा मृतदेह दहनविधीसाठी देण्याची याचीका फेटाळून लावली आणि कारागृहाच्या भिंतीआड त्याचे दफन करण्यात आले. १२ डिसेंबर १९७६ ला ब्रिटन मधील तत्कालीन भारतीय हाय कमिशनर नटवरसिंग यांच्या उपस्थितीत मदनलालची शवपेटीका बाहेर काढण्यात येऊन सन्मानाने भारतात पाठवण्यात आली.

-------------------------

तळटीपः आत्ताच एका मित्राने पाठवलेल्या इमेलमधून आजच्या दिवसाचे हे महत्व लक्षात आले. यातील माहीती ही अनेक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मी त्यातील काही माहीती इथून घेतली. तसेच वरील छायचित्र इथे मिळाले...

प्रतिक्रिया

सुनील's picture

18 Aug 2009 - 6:21 am | सुनील

ह्या दिवसाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शाहरुख's picture

18 Aug 2009 - 6:54 am | शाहरुख

२२ वर्षाच्या मदनलालचे इतके तेजस्वी विचार वाचून सुन्न झालो आणि स्वतःची लाज वाटली..

दशानन's picture

18 Aug 2009 - 7:44 am | दशानन

निशब्द !

ह्या दिवसाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

आशिष सुर्वे's picture

18 Aug 2009 - 9:30 am | आशिष सुर्वे

इतिहासाचे हे सोनेरी पान उलगड्याबद्दल आपले शतश: आभार.
हुतात्मा मदनलाल धिंग्रा आणि अशा असंख्य हुतात्म्यांचे, अगणित स्वातंत्र्यसैनिकांचे आपण सर्व भारतीय आजन्म ॠणी राहू!

"My only prayer to God is: May I be reborn of the same Mother and may I redie in the same sacred cause, till the cause is successful and she stands free for the good of humanity and the glory of God!"

.. निशब्द!

-
कोकणी फणस

जय हिंद!!

विशाल कुलकर्णी's picture

18 Aug 2009 - 9:42 am | विशाल कुलकर्णी

विकासजी, मी ही असेच म्हणेन !
या महान हुतात्म्यांच्या ऋणातुन आपण कधीही उतराई होवु शकणार नाही आणि तशी इच्छाही नाही !
जयहिंद !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

सातारकर's picture

18 Aug 2009 - 10:39 am | सातारकर

हुतात्मा मदनलाल धिंग्रांना प्रणाम.

त्यांनी इतक्या कष्टाने - परिश्रमाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचे चीज करण्याची शक्ती आणि बुद्धी आम्हाला मिळो ही इश्वरचरणी प्रार्थना.

-----------------------------------------------------------------------------------------
I have seen GOD. He bats at no. 4 for India
Matthew Hayden

मिसळभोक्ता's picture

18 Aug 2009 - 12:03 pm | मिसळभोक्ता

तुम्ही कधी जाणार चीन मध्ये ?

-- मिसळभोक्ता

लिखाळ's picture

18 Aug 2009 - 4:59 pm | लिखाळ

लेख आवडला.

-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

अवलिया's picture

18 Aug 2009 - 5:11 pm | अवलिया

हुतात्मा मदनलाल धिंग्रांना प्रणाम.

--अवलिया

स्वाती२'s picture

18 Aug 2009 - 5:41 pm | स्वाती२

हुतात्मा मदनलाल धिंग्रांना प्रणाम.

ऋषिकेश's picture

18 Aug 2009 - 5:43 pm | ऋषिकेश

हुतात्मा मदनलाल धिंग्रा यांना सादर प्रणाम

विकासराव, या दिवसाची आठवण करून दिल्याबद्दल तसेच नवीन उत्तम माहिती बद्दल आभार.

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ५ वाजून ४२ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "ए मेरे वतन के लोगो...."

मन's picture

18 Aug 2009 - 10:31 pm | मन

आणि त्यांच्या शौर्याला मनःपुर्वक नमन.
शतक भरापुर्वीही जखडलेल्या परतंत्र भारतात स्वतंत्र मन घेउन राहणार्‍याचं कौतुक आनि आणि आदर वाटतो.

शतकभरानंतरही उलट आपण स्वतंत्र राश्टर्‍ म्हणवुन घेत असलो तरी विविध कल्पनांखाली सध्या भारत राष्ट्र म्हणुन पाश्चात्त्य मताला नको इतकी किंमत देतो.(कधी कधी वाटातं स्वातंत्र्यापुर्वी भारतीय नेत्यानी ब्रिटिशांची दखल घेतली नसेल तितकी आपण अमेरिकेची घेतो.)
म्हणुनच जो विचार आला तो इथ (http://www.misalpav.com/node/8997) लिहिलाय.

आपलाच,
मनोबा