टनेल व्हिजन V/S पेरिफेरल व्हिजन किंवा टनेल व्हिजन व पेरिफेरल व्हिजन चर्चा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
26 Jun 2009 - 7:21 pm
गाभा: 

http://www.misalpav.com/node/8342#comment-128443

विप्र सरांनी ''टनेलवर चर्चा करायला आवडेल' असे सांगीतल्याने या धाग्याचा उदय झाला आहे.

आता काहीजण म्हणतील की फुटकळ चर्चा आहे, हात धुवुन घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न आहे वगैरे वगैरे.
किंवा माननीय संपादकांपैकी काही जण या धाग्याला आक्षेप घेवून हा धागाच गायब करु शकतात. (माझी त्यांना तसे न करण्याची विनंती आहे. (परत्येकाचा ईगो सांबाळाया लागतू. राग याया नकू ना.) )
असो.

तर चित्रे साहेबांनी सांगीतलेले आणि अ‍ॅलन आणि बार्बरा पीस (अंतर्राष्ट्रीय ख्यातीप्राप्त) यांनी लिहिलेले "टनेल व्हिजन व पेरिफेरल व्हिजन" वरील उदाहरण खोटे कसे असेल? हेच उदाहरण काही लोकांना पटलेलेही आहे असे सांगितलेले आहे.

त्या उदाहरणात सांगितले की, "जगण्याची पद्धत बदलली पण पुरूषांची 'लांबपर्यंत बघण्याची दृष्टी (टनेल व्हिजन) विकसित होत राहिली. "
मला तरी वाटते की पुरुषांना 'लांबपर्यंत बघण्याची दृष्टी' आता जितकी आहे तितकीच आधीपासुनच होती. (म्हणजे आता ती तितकीच 'पॉवरफूल' आहे असे मला म्हणावयाचे आहे, ती क्षीण वगैरे झालेली नाही.)
आता "बायकांची 'आसपासचे बघण्याची दृष्टी '(पेरिफेरल व्हिजन) विकसित होत राहिली" यावर मतप्रवाह असू शकतात व त्यावर मिपाधर्मानूसार साधकबाधक चर्चाही होवू शकते.

"ज्याप्रमाणे पुरूषांना फ्रीजमधल्या, कपाटातल्या इ. वस्तू पटकन सापडत नाहीत त्याप्रमाणे स्त्रियांना रात्रीच्या वेळी ड्रायव्हिंग करताना दूरवरचं पहायला अडचण वाटते." हे उदाहरण तर खरोखर पटते. हा अनूभव बहूतेक स्त्रियांनी त्यांच्या नवर्‍याबद्द्ल घेतला असेल आणि बहूतेक माणसांनी ( त्यात नवरे पण आले. ते पण माणुसच असतात.) दिवसासुद्धा घेतला असेल.

प्रॅक्टिकल विचार केला तर बहुतेक ड्रायव्हर हे पुरुष असतात. ट्रक, बस, रिक्षा, मो. सायकल चालवणार्‍यांमधे सांखीकीय द्रुष्ट्या पुरुष हे आघाडीवर आहेत.

आता एकूणच 'टनेल व्हिजन' व 'पेरिफेरल व्हिजन' चा विचार 'एखाद्या खरोखरच्या टनेल' बाबतीत केला आणि त्याच्या बाबतीत "स्त्रि आणि पुरूष" यांत बदल केला तर केवढा मोठा अपघात होवु शकतो याची कल्पना येवु शकते. (म्हणजे विचार करा - स्त्रियांना 'टनेल व्हिजन' आलीय आणि पुरूषांना 'पेरिफेरल व्हिजन' आलीय. खरोखरच्या टनेलमध्ये पुरुष ड्रायव्हर आहे. नुसती कल्पना करा, किती मोठे अपघात होवु शकतात, नाही?)

म्हणुनच माणसांना 'टनेल व्हिजन' आहे तेच बरे आहे.

आता आपण यावर विप्र सरांना आवडेल अशी चर्चा करू शकतात. धन्यवाद.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

26 Jun 2009 - 7:44 pm | चिरोटा

बर्‍याच कथांमध्ये 'त्याने दूरवर नजर टाकली' पण 'तिने कटाक्ष टाकला' असे असते का?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

पाषाणभेद's picture

26 Jun 2009 - 7:49 pm | पाषाणभेद

बघा. बोलताबोलता (वाचतावाचता) तुम्ही पण एक चांगलाच 'पुरावा ' शोधलाय, शॅरलॉक होम्स.
वा.

'टनेल व्हिजन' व 'पेरिफेरल व्हिजन' 'ईफेक्ट' दुसर काय.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

सूहास's picture

26 Jun 2009 - 8:49 pm | सूहास (not verified)

<<<आता काहीजण म्हणतील की फुटकळ चर्चा आहे, हात धुवुन घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न आहे वगैरे वगैरे.>>>
आ॑घोळ करुन घेण्याचा म्हणायच का ???

असो..

स्त्री -पुरुष आणी त्या॑चे एकमेका॑शी स॑बध ह्या वर पन्नास पुस्तके वाचली आहेत...
तरी ही अक्कल आली नाही...अजुन काय बोलतो..आता हेच बघ ना मी हे का लिहीतोय आणी तु हा धागा का ऊघडला तेच समजत नाही..
जर का आपल्याला स्त्री समजली तर काय मजा रहाणार आहे का ??

सुहास

विनायक प्रभू's picture

27 Jun 2009 - 9:20 am | विनायक प्रभू

टनेल विजन आणि परत पेरीफेरल विजन
माझे वाढले कन्फ्युजन.