✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक होती वैदेही.. (कथा)

न
नीधप यांनी
Fri, 05/15/2009 - 16:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21032 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

सेल्फ हिलिंग?

सहज
Fri, 05/15/2009 - 16:41 नवीन
थेरपी? vicarious life? का इडियट बॉक्स ची कमाल? कथा हटके / वेगळीच आहे. :-)
  • Log in or register to post comments

क्लास!

चतुरंग
Fri, 05/15/2009 - 16:49 नवीन
अतिशय सुंदर कथा! अभिनंदन नीधप!! रोज एक नवा दिवस, रोज एक नवी फँटसी!! (का कोण जाणे, कुठेसं सत्यकथेचं बीज असावं असं सारखं वाटून जातंय!) चतुरंग
  • Log in or register to post comments

(का कोण

नीधप
Sun, 05/17/2009 - 17:59 नवीन
(का कोण जाणे, कुठेसं सत्यकथेचं बीज असावं असं सारखं वाटून जातंय!)<< असेलही कुणासाठीतरी हे खरं. यातले सगळे संदर्भ वास्तवात कुठेतरी अस्तित्वात असू शकतील असेच आहेत. तेव्हा असेलही. आणि स्वप्नरंजन आपण सगळेच रोजचे रोज करतो. आयुष्यात वेळोवेळी निवडलेले/ समोर आलेले पर्याय तसे नसते तर तिथून आयुष्य कुठे गेलं असतं याबद्दल प्रत्येक जण विचार करतोच ना. कदाचित माझ्यासारखीला वाटेल की बरं झालं अमुक एक पर्याय निवडला नाही ते नाहीतर काय झालं असतं माझं.. एखाद्याला उलटं वाटेल. पण असं जरतर करून बघणं प्रत्येकजणच करत नाही का? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

कळायला

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/15/2009 - 17:18 नवीन
कळायला वेळच लागला. पण आवडली कथा! यापुढे काही लिहावं एवढी माझी समज नाही.
  • Log in or register to post comments

ज ब र द स्त

परिकथेतील राजकुमार
Fri, 05/15/2009 - 17:33 नवीन
ज ब र द स्त ! एकदम वेगळ्याच वाटेवरचे लेखन :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

सुरेख

अवलिया
Fri, 05/15/2009 - 17:58 नवीन
सुरेख वेगळ्या पद्धतीची कथा आवडली. अवांतर - कलादालनात टाकण्याचे प्रयोजन समजले नाही. शीर्षकात कथा असे लिहिले नसते तर कदाचित वाचायची राहिली असती. --अवलिया
  • Log in or register to post comments

मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/15/2009 - 18:03 नवीन
आवडली कथा !
  • Log in or register to post comments

मस्त..

मि माझी
Fri, 05/15/2009 - 18:12 नवीन
मस्त.. आपण सगळे पण क्रमातला आपला धागा पुर्ण करून पुढे जात असतो..
  • Log in or register to post comments

कथा

विनायक प्रभू
Fri, 05/15/2009 - 18:16 नवीन
खुपच आवडली
  • Log in or register to post comments

कथा फार

लिखाळ
Fri, 05/15/2009 - 18:56 नवीन
कथा फार आवडली.. एकदम मस्त ! कल्पनेत रमणे हे एकाकी पणात वरदान ठरते !! एखाद्या लहानशा चित्र-कथेप्रमाणे (एपिसोड) कथा आहे. डोळ्या;समोर प्रसंग उभे राहिले आणि फोन वाजल्यावर खाडकन भान आले. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

कथा फार

मदनबाण
Fri, 05/15/2009 - 19:15 नवीन
कथा फार आवडली. (वाचक) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

छान कथा

कपिल काळे
Fri, 05/15/2009 - 19:20 नवीन
छान कथा !! पहिला भाग मात्र थेट शुभांगी भडभडे, ज्योत्स्ना देवधर वगैरे कौटुंबिक कादंबरीतील भास होतो. पण पुढे मात्र कल्पनाविलासात रमून वेळ घालवणारी आणी त्यातून प्रेरणा मिळवणे ही कल्पना सुंदर. व्याकरणावर इथे बोलू नये पण राहवत नाही म्हणून.... तृतीया विभक्तीचा ने हा प्रत्यय आहे. प्रस्तुत कथेत नी हा प्रत्यय बरेच ठिकाणी आहे , वाचताना तो जाणवतो.. उदा. वैदूनी,वैदेहीनी,अर्चनानी,आनंदानी निळा शर्टवाल्याने, बहिणीने इथे हा ने प्रत्यय योग्यरितीने वापरला आहे. नी बोली भाषेतील प्रत्यय आहे, पण तो सर्रास वापरला जातो लेखनात. चूक की बरोबर असे मला म्हणायचे नाहे, पण मला तरी तो खटकतो.किंबहुना चांगल्या लिखाणात नी प्रत्यय असेल तर तो टोचतोच. त्यामुळे लिहिले. अवांतरः नावातच नी असल्यामुळे नी प्रत्यय वापरलाय की काय? ह. घ्या.
  • Log in or register to post comments

वसुधाच्या

नीधप
Fri, 05/15/2009 - 22:16 नवीन
वसुधाच्या फँटसीची झेपही तेवढीच असणार ना? त्यामुळे ते मुद्दामूनच तसे आहे. नावाशी साधर्म्याचा संबंध नाही पण मला कथा बोलीभाषेत बरी वाटते. ने प्रत्ययाने ते अधिक पुस्तकी होतं. असं माझं मत आणि लिहिणार्‍याचे स्वातंत्र्य. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे

कथा आवडली ..

अभिरत भिरभि-या
Fri, 05/15/2009 - 21:00 नवीन
कथा आवडली. कालचक्रात उलटी जात राहिली. शेवटी समाप्त आल्यावर चुकून क्रमश: वाचल्यासारखे वाटले. कारण वर्तुळ पूर्ण होऊन ते संग्राम पाशी जाऊन थांबेल अशी माझी कल्पना होती. कालाच्या अक्षावर असे उलटे जाणे कथेला सुंदर आयाम देते.
  • Log in or register to post comments

संग्राम शी

नीधप
Sun, 05/17/2009 - 18:08 नवीन
संग्राम शी परत जाणं तर शक्य नाही. संग्राम, ढॉइंग सगळंच कल्पनेतलं. वहीचं नवं पान, नवं आयुष्य.. त्या त्या दिवशी जगायचं आणि ते तिथेच सोडून द्यायचं. वास्तव श्री मनोज पाटील एवढंच. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या

कथा आवडली..

मस्त कलंदर
Fri, 05/15/2009 - 21:27 नवीन
जरा वेगळ्या अंगाने जातेय.., आवडली मात्र!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर म्हणजे घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

कथा आवडली गं..

प्राजु
Fri, 05/15/2009 - 22:42 नवीन
कथा लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. खूप आवडली. कल्पनाविलासातून आयुष्य जगणे.. ही कल्पनाच छान आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर

पिवळा डांबिस
Fri, 05/15/2009 - 23:59 नवीन
सुंदर कथा! खूप आवडली!!!
  • Log in or register to post comments

छान!!

स्वप्निल..
Sat, 05/16/2009 - 01:17 नवीन
एकदम मस्त! बरेच दिवसांनंतर काहितरी चांगले वाचायला मिळाले! स्वप्निल
  • Log in or register to post comments

उत्तम/वैदेही

नंदन
Sat, 05/16/2009 - 01:29 नवीन
थोड्या वेगळ्या धाटणीची ही कथा अतिशय आवडली. कल्पनेतले अशारीर व्यक्तिमत्त्व म्हणून 'वैदेही' हे नावही मोठे समर्पक आहे. (वसुधा = भूमी - तिची मानसकन्या या अर्थाने वैदेही = सीता, असा विचारही डोक्यात आला होता; पण तो जरा बादरायण संबंध वाटला.)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

हेच

Nile
Sat, 05/16/2009 - 02:20 नवीन
हेच म्हणतो! कथा आवडली! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

कल्पनेतले

नीधप
Sun, 05/17/2009 - 18:15 नवीन
कल्पनेतले अशारीर व्यक्तिमत्त्व म्हणून 'वैदेही' हे नावही मोठे समर्पक आहे. (वसुधा = भूमी - तिची मानसकन्या या अर्थाने वैदेही = सीता, असा विचारही डोक्यात आला होता; पण तो जरा बादरायण संबंध वाटला.)<< हा संदर्भ मी खरंच विचारात घेतला नव्हता. योगायोगाने जुळलेलं आहे. कथाबीज डोक्यात आलं तेव्हा जिवंत 'ती' वैदेही या नावानेच समोर आली. पण खरंच आभार या वेगळ्या संदर्भासाठी. आपणच लिहितो आणि आपल्यालाच लक्षात येत नाही काय काय दडलंय त्यात ते... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

खुप छान..

काजुकतली
Sat, 05/16/2009 - 11:19 नवीन
कथा म्हणुन आवडली, पण खुप वाईट वाटले वाचुन.. आपल्याला हवे तसे आयुष्य का मिळत नाही, जे मिळते ते असे विचित्र का असते, केवळ स्वप्नामध्येच हवे तसे जगुन घ्यावे असेच का लिहिलेले असते काहींच्या नशिबी?? कल्पनाविलासातून आयुष्य जगणे.. ही कल्पनाच छान आहे. मला भयाण वाटते असे जगणे :( साधना
  • Log in or register to post comments

भवतेक

परिकथेतील राजकुमार
Sat, 05/16/2009 - 12:18 नवीन
भवतेक सुशींच्या दुनियादारी मध्ये असे काहिसे वाक्य आहे की, "आयुष्यात माणसाला हवे ते सगळे काही मिळते, फक्त ते मिळण्याची वेळ चुकलेली असते." सुशीभक्त ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काजुकतली

खरे

पर्नल नेने मराठे
Sat, 05/16/2009 - 14:10 नवीन
खरे आहे. चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मला

रामदास
Sat, 05/16/2009 - 12:11 नवीन
कथा आवडली.अजून नियमीत कथा लेखन येऊ द्या.
  • Log in or register to post comments

कथा आवडली

भडकमकर मास्तर
Sat, 05/16/2009 - 13:20 नवीन
(सरळ गोष्ट सांगण्यापेक्षा )वापरलेल्या वेगळ्या फॉर्ममुळे अधिक मजा आली... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments

असेच

स्वाती दिनेश
Sun, 05/17/2009 - 19:50 नवीन
(सरळ गोष्ट सांगण्यापेक्षा )वापरलेल्या वेगळ्या फॉर्ममुळे अधिक मजा आली... मास्तरांसारखेच म्हणते, नंदनने लावलेला वसुधा, वैदेहीचा अर्थही भावला. स्वाती
  • Log in or register to post comments

सुंदर!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 05/18/2009 - 00:28 नवीन
अतिशय सुंदर गोष्ट. मांडणी पण छानच, नाविन्यपूर्ण. निवांतपणे वाचायची होती म्हणून इतके दिवस बाजूला ठेवली होती, सार्थक झाले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

अनरियलिस्टिक

मिसळभोक्ता
Tue, 05/19/2009 - 14:33 नवीन
९९.९९% अनरियलिस्टिक. भारतात राहून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या स्त्रीजगतावर होणारे अत्याचार अशा भ्रमात स्वतः राहणार्‍या आणि इतरांना ठेवणार्‍या लेखक/लेखिकांचे पोट भरण्याचे हमखास साधन. टुकार ! -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
  • Log in or register to post comments

९९.९९%

नीधप
Sat, 05/30/2009 - 20:44 नवीन
९९.९९% अनरियलिस्टिक. << शक्य आहे तुम्हाला असे वाटणे. भारतात राहून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या स्त्रीजगतावर होणारे अत्याचार अशा भ्रमात स्वतः राहणार्‍या आणि इतरांना ठेवणार्‍या लेखक/लेखिकांचे पोट भरण्याचे हमखास साधन.<< माझ्याबद्दलचे दोन्ही अंदाज चूक. अमेरीकेतील भारतीय वंशाच्या स्त्रीजगतावर अत्याचारच होतात इत्यादी भ्रमात मी नाही. आणि असले भ्रम इतरांसाठी तयार करण्यात मला रस नाही. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नेटवर लिखाण करून मला पैसे मिळत नाहीत वा लिखाणावर माझे पोट अवलंबून नाही. (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)<< कशाबद्दलची अधिक माहीती? कोण प्रभूमास्तर? बाकी टुकार तर टुकार.. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

वेगळी कथा

सुमीत
Tue, 05/19/2009 - 16:06 नवीन
कल्पनाच फार छान वाटली, तसे कल्पनेत सर्व काही शक्य असते अगदी वेगळे आयुष्य सुद्धा
  • Log in or register to post comments

..

शक्तिमान
Tue, 05/19/2009 - 23:52 नवीन
:P एकदम डेंजर कथा आहे... विचित्र वाटली आधी.. पण हळुहळू उमगली कथा मांडण्याची शैली अप्रतिम....
  • Log in or register to post comments

सुन्दर कथा

चतूराक्ष
Wed, 05/20/2009 - 00:36 नवीन
नीधप, कालचक्रातील कथा मांडण्याची शैली अप्रतिमच! लगे रहो.. चतूराक्ष नावातच सर्व काहि आहे .....
  • Log in or register to post comments

सुंदर कथा

धनंजय
Wed, 05/20/2009 - 02:02 नवीन
विमनस्क स्वप्नरंजन वाचताना वाईट वाटले. लेखन उत्तम झाले आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर कथा.

अगोचर
Wed, 05/20/2009 - 06:14 नवीन
सुंदर कथा. आवडली. (थोडीफार रिचर्ड बा़ख यांच्या "वन" ह्या कादंबरीची आठवण झाली) - आगंतुक (उद्यापासुन नविन आयुष्य जगायला तयार)
  • Log in or register to post comments

आत्ताच

नीधप
Sun, 09/27/2009 - 11:16 नवीन
आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार माझ्या या कथेला 'साप्ताहिक सकाळ कथास्पर्धेत उत्तेजनार्थ (का होईना!) बक्षिस मिळालंय. या वेळच्या सा. स. मधे रिझल्ट प्रकाशित झालाय. पुढच्या कुठल्यातरी अंकात माझी कथा प्रकाशित होईल. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

अरे वाह

गणपा
Sun, 09/27/2009 - 11:25 नवीन
अभिनंदन, मस्त आहे कथा, नजरेतुन सटकली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

अभिनंदन

श्रावण मोडक
Sun, 09/27/2009 - 11:33 नवीन
अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

अभिनंदन!!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 09/27/2009 - 14:09 नवीन
मनःपुर्वक अभिनंदन. अशाच अजून उत्तम कथा कविता येऊ दे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

+१

राजू
Sun, 09/27/2009 - 11:42 नवीन
अतिशय सुंदर कथा! _________________ आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.
  • Log in or register to post comments

अभिनंदन.....

JAGOMOHANPYARE
Sun, 09/27/2009 - 11:48 नवीन
अभिनंदन..... सा स साठी अभिनंदन....
  • Log in or register to post comments

आत्त्ताच वाचली...

प्रभाकर पेठकर
Sun, 09/27/2009 - 11:48 नवीन
नीधप, आधी ही कथा वाचली नव्हती. (म्हणजे 'नेट' वरील कमी वावराने नजरेतून सुटली होती.) आत्ताच वाचली. कथा आणि शैली दोन्ही उत्तम आहे. अभिनंदन. तसेच, 'साप्ताहिक सकाळ' मधल्या प्रकाशनाबद्दल आणि मिळालेल्या बक्षिसाबद्दलही मनःपूर्वक अभिनंदन. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे

नीधप
Sun, 09/27/2009 - 14:07 नवीन
सगळ्यांचे आभार. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

क्रान्ति
Sun, 09/27/2009 - 14:52 नवीन
हार्दिक अभिनंदन. कथा आवडली. लेखनशैली खासच.:) क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

मस्त

मीनल
Mon, 09/28/2009 - 02:04 नवीन
आधी वाचायची राहून गेली होती. निसटलीच म्हण डोळ्यातून. कथा आवडली. वेगळ्या प्रकारे लिहिली आहे. `ढॉइंग टुक ` ची मजा वाटली. ढॉइंग नाव आणि टुक आडनाव हे नंतर कळल. ती वसुधा आता गायन सुरू करेल अस वाटतय. तेही मनोज च्या नकळत. स्वतः पुरत. मीनल.
  • Log in or register to post comments

चांगली कथा

मी_ओंकार
Mon, 09/28/2009 - 11:40 नवीन
छान. कथा आवडली. बक्षिसाबद्दल अभिनंदन. - ओंकार
  • Log in or register to post comments

बर्‍याच दिवसानी आपली कथा

गणेशा
Wed, 02/09/2011 - 20:04 नवीन
बर्‍याच दिवसानी आपली कथा वाचायला मिळाली. खुपच छान लिहिली आहे. मनातली पाणे आणि आयुष्याचा बाँयडींग केलेला ग्रंथ यातील जमीन अस्मानाचा फरक पाहुन खुप वाईट वाटले. तुम्ही खुप छान लिहिता.
  • Log in or register to post comments

छान कथा! आवडली!

रुपी
Fri, 05/22/2015 - 05:54 नवीन
छान कथा! आवडली!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा