Skip to main content

मुकुल शिवपुत्र मद्यधुंदावस्थेत

लेखक भोचक यांनी मंगळवार, 12/05/2009 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
मुकुल शिवपुत्रांसंदर्भातील ही बातमी वाचली नि खूप त्रास झाला. http://marathi.webdunia.com/newsworld/news/national/0905/12/1090512038_…

वाचने 6154
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

एखाद्याच्या खाजगी आयुष्याची चर्चा आपण करु नये तो आपला अधिकार नाही हे माझे वैयक्तीक मत. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

ट्रॅजिडी आहे खरीच. इतक्या थोर माणसाचा मुलगा दारुच्या इतक्या आहारी गेला हे वाचुन वाईट तर वाटलेच. पण ह्यावर चर्चा न करणंच बरं.

शीर्षक वाचून गैरसमज झाला! म्हटलं कुणी अंगारकीच्याच दिवशी गणपतीबद्दल वाईटसाईट लिहीलं की काय?

In reply to by अनंता

हा हा हा! एल ओ एल!

परिकथेतील राजकुमार + अनंता , सहमत...........

दुर्दैव! दुसरं काय? त्या शापित यक्षाच्या काही सुरेख मैफलींचा मी साक्षिदार आहे.. असो..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तो शापित यक्ष गायला लागला की याला १०० गुन्हे माफ असे मनापासून वाटते. अशा दुर्दैवी गोष्टींवर चर्चा नको. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by विसोबा खेचर

खरोखरच शापित यक्ष. कोणाच्या आयुष्यात काय घडामोडी होतील ते सांगता येत नाही, त्यामुळे एखाद्याच्या खाजगी जीवनाबद्दल चर्चा न करणे हेच शहाणपणाचे ठरते. मुकुल शिवपुत्रना कधी ऐकण्याचा योग आला नाही, मात्र एका जेष्ठ्य मित्राने त्यांना नर्मदेच्याकाठी सलग ४ तास भैरवी सादर करताना अनुभवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ४ तास समाधी अवस्थेत मुकुल गात होते. असो, फार मोठा माणूस ...... पण तात्यांनी म्हण्टल्याप्रमाणे "शापित यक्ष". त्यांच्या प्रतिभेला सलाम .......

In reply to by प्राजु

एखाद्याच्या खाजगी जीवनाबद्दल चर्चा न करणे हेच शहाणपणाचे ठरते.

ही बातमी वाचली होती, खूप वाईट वाटले होते वाचून..

अश्या माणसांना आपल्या फुटपट्ट्या लावू नयेत आणि आपण या गोष्टीची चर्चाही करू नये. असामान्य माणूस, असामान्य गायकी तेव्हा दुर्दैव आणि भोगही असामान्यच. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by श्रावण मोडक

मोडकसाहेबांशी आणि नीधपशी सहमत ... चर्चा करणारे आपण कोण ? फुटपट्ट्या लावणारे आपण कोण ? ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

बातमी वाचली होती, त्यांच्यावर दारु आणि ती पिण्यासाठी पैसे मागण्याची वेळ का यावी याचं आश्चर्य वाटलं! -संदीप. काय'द्याच बोला.

मोठ्या झाडाच्या छायेत लहान झाडे वाढत नाहीत हेच खरे.