आईन्स्टाईनचा विशेष सापेक्षतावाद आणि व्यापक सापेक्षतावाद (Special & General Theory of Relativity) - १ - बालपणीचा काळ सुखाचा(?)

टायबेरीअस's picture
टायबेरीअस in काथ्याकूट
27 Apr 2009 - 10:49 pm
गाभा: 

लहानपणची गोष्ट आहे.. आम्ही शाळेत असताना दूरदर्शन वर दोन मालिका सुरु होत्या.. पहिली पं. नेहेरुंची! ’भारत एक खोज’.. छान असायची मालिका. तो ओम पुरी चा खरोखर ऐतिहासिक वाटणारा आवाज, सुंदर चित्रिकरण, त्या दिवसांमधे घेऊन जाणारे वेष, भव्य सेट, वनराज भाटियांचं 'गूढ-रम्य' संगीत, वसंत देवांचं ' च्यायला हे हिंदी शिकलं पाहिजे' असं वाटायला लावणारं कर्णमधुर हिंदी, श्याम बेनेगलांचं दिग्दर्शन सगळं सगळं काही 'गारुड' करून जायचं.. 'भूतकाळ' जगवायचं,,,!

दुसरीकडे आतुरतेने वाट पहायचो 'स्टार ट्रेक' ची.. तो 'कधीही न चुकणारा' कॅप्टन कर्क, 'लॉजिकल कॅप्टन!' म्हणणारा, टोकेरी लांब कानाचा मि. स्पॉक, माणुसकी जिवंत ठेवणारा डॉ. मेकॉय, 'If Scotty cannot do it, it cannot be done!' अशी ख्याती असलेला इंजीनीअर 'स्कॉट' हे सगळे आणखीन एका 'भविष्यातल्या' जगात घेऊन जायचे. ' Space! The Final Frontier,... To Boldly go where NO MAN has gone before!' हे शब्द ऐकल्यावर प्रत्येक वेळी अंगावर रोमांच उभे रहायचे...

बरं, त्यावेळेस शाळेत आमचे शिक्षण 'मार्कान्वेषी' असल्यामुळे, 'कळत नाही? मग पाठ करा' असे होते.. त्यावेळेस यापुढे जाऊन एखद्या गोष्टीची चिकित्सा करावी किंवा प्रश्न विचारावेत ही अक्कल नव्हती आणि जिज्ञासा ही! महाभारत , रामायण या मालिकानी आमचे वैज्ञानिक प्रश्न बाजुला टाकले होते आणि हरीष भिमाणी च्या 'मै समय हू!' मधे आम्ही गुरफटलो होतो..

दर वेळेस मात्र 'भारत एक खोज' मधल्या वेदांच्या ऋचा ऐकताना मात्र मन फार विषःण्ण व्हायचे.. अर्थ कळायचा नाही. पण या काळा संबंधी, देव दानव या संकल्पनांसंबंधी काहीतरी 'गूढ' आहे असे नेहेमी वाटायचे...

"
हिरण्यगर्बस-समवर्तत-आग्रे
भूतस्य जातः पतिर-एक आसीत
स दाधार-पृथिवी-द्याम-उतेमा.म
कस्मै देवाय हविषा विधेम

सृष्टि से पहले सत नहीं था, असत भी नहीं
अन्तरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था
छिपा था क्या, कहाँ, किसने देखा था
उस पल तो अगम, अतल जल भी कहाँ था

सृष्टि का कौन है कर्ता
कर्ता है वा अकर्ता
ऊँचे आकाश में रहता
सदाअ अध्यक्ष बना रहता
वही तो सच-मुच में जानता, या नहीं भी जानता
है किसी को नहीं पता
नहीं पता

वह था हिरण्यगर्भ सृष्टि से पहले विद्यमान
वही तो सारे भूत-जात का स्वामी महान
जो है अस्तित्वमान धरती-आसमान धारण कर
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर

जिस के बल पर तेजोमय है अम्बर
पृथ्वी हरी-भरी स्थापित स्थिर
स्वर्ग और सूरज भी स्थिर
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर

गर्भ में अपने अग्नि धारण कर पैदा कर
व्यापा था जल इधर-उधर नीचे-ऊपर
जगा चुके वो कई एकमेव प्राण बनकर
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर

ॐ! सृष्टि-निर्माता स्वर्ग-रचयिता पूर्वज, रक्षा कर
सत्यधर्म-पालक अतुल जल नियामक, रक्षा कर
फैली हैं दिशायें बाहु जैसी उसकी, सब में, सब पर
ऐसे ही देवता की उपासना करें हम हवि देकर
ऐसे ही देवता की उपासना करें हम हवि देकर
"

क्रमशः .... !
-टायबेरीअस

प्रतिक्रिया

प्रमेय's picture

27 Apr 2009 - 11:18 pm | प्रमेय

उत्तम...उत्तम...
हर.. हर.हर...

लिखाळ's picture

27 Apr 2009 - 11:20 pm | लिखाळ

छान सुरुवात .. पुढे वाचण्यास उत्सुक !
-- लिखाळ.

घाटावरचे भट's picture

27 Apr 2009 - 11:23 pm | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

चकली's picture

28 Apr 2009 - 12:22 am | चकली

आहे पण त्रोटक आहे. अजून जास्त लिखाण असेल पुढच्या भागात तर मजा येइल.
चकली
http://chakali.blogspot.com

वर ऋग्वेद १०.१२१ प्रजापतिसूक्त (किंवा कःसूक्त - कोण देव?) यातील एक ऋचा उद्धृत केली आहे, आणि हिंदी अनुवादात नासदीय सूक्तातील (ऋ. १०.१२९ मधील) ऋचांचासुद्धा अनुवाद आहे.

पैकी प्रजापतिसूक्तातील प्रथम ऋचा (मुद्रणदोष दूर करून) अशी :

हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् ।
स दाधार पृथिवीं द्यामुतेमां कस्मै देवाय हविषा विधेम ॥ ऋ. १०.१२१.१

याचा अर्थ देऊन लेखक बहुधा पुढील लेख लिहिणार आहेत, असे गृहीत धरून इतकेच.

लेखमालेबद्दल कुतूहल वाटत आहे.

अवलिया's picture

28 Apr 2009 - 1:15 pm | अवलिया

धनंजय यांच्याशी सहमत.

प्रजापति-हिरण्यगर्भसूक्त (१०.१२१) आणि नासदीय सूक्तापासुन सुरवात करुन 'सापेक्षतावाद' कसा मांडला जाईल याचे कुतुहल आहे. पुढिल भाग वाचण्यास उत्सुक आहे.

टायबेरिअस यांच्या या आईनस्टाईनरचित सापेक्षतावाद उपनिषदावरील लेखमालेने आमची ज्ञानपिपासा पूर्ण होवो ही मनोमन कामना!

ॐ आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुः श्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि ।
सर्वं ब्रह्मौपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा मा ब्रह्म निराकरोत,
अनिराकरणमस्त्वनिराकारणं मेऽस्तु ।
तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः

(माझे सर्व अवयव, वाणी, प्राण, नेत्र, कान, आणि सर्व इंद्रिये तसेच शक्ती परिपुष्ट होवो.
मी या ब्रह्माचा अस्वीकार करु नये, आणि ब्रह्माने माझा परित्याग करु नये.
माझ्याबरोबर त्याचा अतुटसंबंध असो. उपनिषदांमधे प्रतिपादित जो धर्मसमुह आहे,
तो धर्मसमुह या परमात्म्यात निरत असणा-या माझ्यामधे असो. त्रिविध तापांची निवृत्ती होवो.)

--अवलिया

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Apr 2009 - 8:17 pm | बिपिन कार्यकर्ते

मम

बिपिन कार्यकर्ते

घाटावरचे भट's picture

28 Apr 2009 - 8:30 pm | घाटावरचे भट

मम की तथास्तु?

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Apr 2009 - 8:32 pm | बिपिन कार्यकर्ते

मम = असेच म्हणतो...

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

28 Apr 2009 - 1:04 am | प्राजु

पुढील भागांची वाट पहातो आहोत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री's picture

28 Apr 2009 - 9:20 am | आनंदयात्री

टायबेरिअस भाउ पोतडीतुन काय काढणार हे जाणणासाठी उत्सुक आहे.

विसुनाना's picture

28 Apr 2009 - 10:43 am | विसुनाना

या विषयात रस आहे. लेखक वेदातील तत्त्वज्ञान आणि आईनस्टाईनचे तत्त्वज्ञान यातील साम्य दाखवणार आहे किंवा कसे?
उत्सुकता आहे.

मला वाटले - (सिरियसली)- आईनस्टाईनने रिलेटिव्हिटी थियरी (सापेक्षता सिद्धांत) समजावून सांगताना रेल्वे कॅरेजचा इतक्यांदा वापर केला आहे की -
"झुकझुकझुकझुक आगीनगाडी - धुराच्या रेषा हवेत काढी - पळती झाडे पाहू या - मामाच्या गावाला जाऊ या" असे गाणे बालपणात तो म्हणत असेल आणि मोठेपणी त्याला कळले असेल की जमिनीवरून आगगाडी पळताना दिसते आणि आगगाडीतून झाडे पळताना दिसतात यात सृष्टीचे काही महनीय गूढ दडले आहे. :)

स्वाती दिनेश's picture

28 Apr 2009 - 11:41 am | स्वाती दिनेश

सुरुवात आवडली, पुढे वाचण्यास उत्सुक आहे.
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

28 Apr 2009 - 12:31 pm | परिकथेतील राजकुमार

पुढचा भाग वाचायला उत्सुक आहे.
भारत एक खोजचे शिर्षक गीत येथे पाहता व ऐकता येईल.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मेघना भुस्कुटे's picture

28 Apr 2009 - 1:12 pm | मेघना भुस्कुटे

हे प्रकरण काही वेगळेच दिसते. लवकर लिहा हो पुढे. उत्सुकता आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Apr 2009 - 1:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

असेच म्हणते. टायबेरिअस, पुढच्या भागांबद्दल उत्सुकता आहे.

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

अनंता's picture

28 Apr 2009 - 2:00 pm | अनंता

बालपणाचा काळ सुखाचा आणि आईन्स्टाइनचा सापेक्षवाद, यांमधील संबंध कळाला नाही.

हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Apr 2009 - 1:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डोक्यावरुन चाल्लंय पण काही हरकत नाही, लेख आणि प्रतिसादातून समजून घेऊ.
पुढील भागासाठी शुभेच्छा !

-दिलीप बिरुटे

टायबेरीअस's picture

28 Apr 2009 - 6:35 pm | टायबेरीअस

वयस्यहो,
सर्व्प्रथम धन्यवाद! कवतुक भावले. सूचना पावल्या. :) होपफुली पुढल्या भागांमधे,एक एक कोडे सुटत जाईल सर्वांचे!

-टायबेरीअस

मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"

चतुरंग's picture

28 Apr 2009 - 7:44 pm | चतुरंग

पुधील भागाची उत्सुकता वाढली आहे.

चतुरंग